शनिवार, १८ एप्रिल, २०२०

शिवसेनेच्या वतीने दहा हजार घरापर्यंत भाजीपाला देण्याच्या                                       मोहिमेचा शुभारंभ.
कोरोना विषाणू संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉक डाऊन कालावधित जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केलेले सर्व कार्य लोकोपयोगी : माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर
जालना,प्रतिनिधी:- शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी दहा हजार घरापर्यंत मोफत भाजीपाला वितरित करण्याचा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाचा
शुभारंभ आज (दि.18) शनिवार रोजी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार संतोष सांबरे, उपजिल्हाप्रमुख पंडीतराव भुतेकर, शहरप्रमुख विष्णू पाचफुले,  युवासेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, माजी शहरप्रमुख बाला परदेशी, शहर संघटक दीपक रणनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी वरील उद्गार काढले.पुढे बोलतांना ते म्हणाले की, सध्या लॉक डाऊन असल्यामुळे नागरिक अत्यंत अडचणीत आहेत.यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. कारोना संसर्गाच्या राज्यातील गंभीर स्थितीमुळे वाढलेलं गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेच्यावतीने शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सुरुवातीपासूनच मुकाबला कोरोनाचा ही मोहीम हाती घेऊन त्या अंतर्गत हॅण्डबील वाटप करणे,शहरातील प्रमुख चौकात होर्डीग लावणे, ऑटो रिक्षामधून आवाहन करून जनजागृती करणे व नंतर प्रत्यक्ष मदतकार्य करण्यास सुरुवात केली असून मास्क वाटप, अन्नदान वाटप, अन्नधान्य वाटप व आता घरपोच भाजीपाला वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे आणि हे सर्व कार्य अखंडपणे सुरू आहेत.  एवढे सगळे उपक्रम राबविणारा जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्यासारखा कार्यकर्ता अभावानेच असेल असे गौरवोद्गार यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काढले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, जनतेने आम्हाला खूप दिले त्याची परतफेड करण्याची ही वेळ असून अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. अशा या लॉक डाऊन कालावधीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी घरात बसण्यापेक्षा लोकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक हेही आपल्या भागांमध्ये मदत करीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांनी सेवाभावी संस्था त्याचप्रमाणे पदाधिकारी यांना कळकळीचे आवाहन करून अडचणीत असलेल्या लोकांना मदत करण्यास सांगितले असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेने हे कार्य अखंडपणे सुरू ठेवलेले आहे. अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी सांगितले. यावेळी उपशहरप्रमुख घनश्याम खाकीवाले, युवासेनेचे शहरप्रमुख दुर्गेश काठोटीवाले, उपशहरप्रमुख किशोर नरवडे, संतोष जमदडे,  गणेश लाहोटी, गणेश तरासे, मदन खरात, राजू इंगळे, सुभाष पितांबरे, रामेश्वर कुरील, यांच्यासह शिवसेना पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...