शुक्रवार, १० एप्रिल, २०२०


             पोलीसांनी तयार केली सॅनिटायझर व्हॅन
             पोलिसांसाठी देखील सॅनिटायझर व्हॅन!
पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली झाली निर्मिती
जालना,प्रतिनिधी :- जीव धोक्यात घालून 
ही रक्षण करणाऱ्या पोलीसांचे संरक्षण व्हावे म्हणून जालना पोलीसांनी सॅनिटायझर व्हॅनची निर्मिती केली आहे. एका पोलीस व्हॅनचे रुपांतर सॅनिटायझर व्हॅनमध्ये केले असून कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांसाठी या व्हॅनमधून सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखेकडून या व्हॅन ची निर्मिती करण्यात आली आहे.कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना एका प्रकारे सुरक्षा कवच मिळाले आहे.पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही व्हॅन तयार केली आहे. जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, प्रशांत महाजन आणि बिनतारी संदेश यंत्रणेचे पोलीस निरीक्षक संजय व्यास या तिघांच्या प्रयत्नांमधून ही व्हॅन तयार झाली आहे.व्हॅनच्या आतमधील सर्व बाजू प्लास्टिकने बंद करुन शेती आणि यंत्र अन्य कारखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्पिंकलरच्या साह्याने यांमधून सॅनिटाझरची शरीरावर फवारणी होते. शहरातील सर्व भागांमध्ये फिरून त्याठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांसाठी ही व्हॅन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जिल्हा विशेष शाखेने केलेल्या या उपक्रमाबद्दल पोलीस प्रशासनातून त्यांचे कौतुकही होत आहे. अतिरीक्त पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी बोलताना या व्हॅनची माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...