शनिवार, २ मे, २०२०


दिलासादायक ! कोरोनामुळे मृत महिलेच्या जवळच्या संपर्कातील दोन्ही मुलांचे अहवाल निगेटिव्ह

नांदेड( भगवान कांबळे):- राज मोहल्ला परिसरातील एका ५५ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा नांदेडात गुरूवारी रात्री मुत्यू झाला.मात्र या महिलेच्या सोबत नांदेड येथे असलेल्या दोन्ही मुलांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे  वैघकीय अधिक्षक डाॅ संजय हरबडे यांनी दिली आहे .त्यामुळे  सेलूकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. शहरातील राज मोहल्ला परिसरातील एक महिला दुर्धर आजार असल्याने उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेऊन लाॅकडाऊन मुळे औरंगाबाद येथील एका भागात राहत होती. २७ एप्रिल रोजी एका खाजगी वाहनाने ही महिला  घरी परतली होती. प्रकृती अतिशय नाजूक असल्याने सदरील महिलेला उपचारासाठी परभणी येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर या महिलेला नांदेडात हलविण्यात आले होते. तेथे त्या महिलेचा स्वॅब घेऊन चाचणी केली असता कोरोना पाॅझेटीव्ह अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर सेलू शहरात दोन दिवसाची संचारबंदी लागू केली आहे.
दरम्यान, या महिलेच्या  सोबत नांदेडात असलेल्या दोन्ही मुलांचे स्वॅब घेण्यात आले होते. गुरूवारी रात्री या महिलेचा मृत्यू झाला असला तरी शुक्रवारी सकाळी या दोन्ही मुलांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे.  या महिलेच्या सेलू येथील कुटूंबातील १९ आणि सहवासात आलेल्या १७ आशा ३६ व्यक्तीचे स्वॅब अहवाल येणे बाकी आहे. नांदेडात महिला कोरोना पाॅझेटीव्ह आढल्याने प्रशासनाने बुधवारी रात्रीच राज मोहल्ला परिसर सील केला आहे. या परिसरातील एक हजार घरे कंनटमेंट झोन मध्ये घेतली आहेत. तसेच आरोग्य विभागाच्या २० पथकाकडून सर्व्हेक्षण सुरू केली आहे. सदरील महिलेच्या कुटूंबात १९ आणि सहवास आलेल्या १७ आशा ३६ व्यक्तीचे स्वॅब घेऊन चाचणी साठी औरंगाबाद येथील प्रयोग शाळेत पाठवले आहेत. तसेच या सर्व व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. आता या ३६ व्यक्तीचे स्वॅब अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शनिवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेऊन शनिवारी रात्री पर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे.४ हजार नागरिकांचे सर्व्हक्षण
राज मोहल्ला आणि परिसरातील ६६८ घराचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून शुक्रवारी दुपारी पर्यंत ४ हजार ४९ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे पथक या भागातील घरोघरी जाऊन लक्षणा बाबत विचारणा करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...