बुधवार, ६ मे, २०२०

पत्रकारांना विमा संरक्षण मिळावे या साठी माणगांव प्रेस क्लबचे तहसिलदारांना लेखी निवेदन


बोरघर  / माणगांव (प्रतिनिधी)  :- लोकशाहीचा चौथा स्तंभ आज वैश्विक कोरोना संकटात सापडला असून तो कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदीत स्वतः च्या जीवाची पर्वा न करता, कोरोना मुक्तीच्या राष्ट्रीय लढ्यात जीवाची बाजी लावून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता काम करतोय. कोरोना संकटात सापडलेल्या जनतेचे वास्तव स्थिती, शासनाच्या सूचनांचे पालन करण्यासाठी समाजप्रबोधनपर माहिती आपल्या लेखणी द्वारे जनते पर्यंत पोहचविणे, गोरगरीब, दीन दूबळ्यांची आर्थिक परिस्थिती जगासमोर आणण्यासाठी, भूकेलेल्यांना अन्न, मदत मिळवून देण्यासाठी पत्रकार अहोरात्र आवाज उठवित आहेत. अनेकांना त्यांनी केलेल्या सत्कर्मांचे आपल्या लेखणीद्वारे कौतुक करुन प्रोत्साहीत केले.परंतु स्वतःसाठी मात्र कसलीच अपेक्षा केली नाही. एवढे सर्व करूनही आज लोकशाहीचा चौथा स्तंभ सर्व प्रकारच्या सरकारी सुविधांपासून वंचित आहे. शासन आणि जनता या मधील दुवा असलेल्या पत्रकारांना विमा संरक्षण मिळावे या करीता रायगड प्रेस क्लब संलग्न माणगांव प्रेस क्लबच्या सर्व पत्रकार सदस्यांनी या संदर्भात एकमुखाने निर्णय घेतला असून राज्याचे मा. मुख्यमंत्री यांना माणगांव तहसिलदार श्रीमती प्रियंका आयरे यांच्या मार्फत लेखी निवेदन सादर केले आहे. 
       राज्याचे माननीय संवेदनशील  मुख्यमंत्री श्री. उद्धव जी ठाकरे साहेब आणि संबंधित प्रशासकिय अधिकारी यांनी पत्रकारांची ही रास्त मागणी लक्षात घेऊन त्या अनुषंगाने अंमलबजावणी करावी. तसेच पत्रकारांना सुद्धा इतरांप्रमाणे तातडीने मदत देण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी. यासाठीच पत्रकारांना कमितकमी विमा संरक्षण तरी मिळावे या मागणीचा विचार व्हावा. म्हणुन आज दि. ६ मे रोजी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांना विनंती वजा मागणीचे निवेदन माणगांव तालुका प्रेसक्लब च्या वतिने तहसिलदारांना सादर केले आहे. कोव्हिड १९ संदर्भात तातडीच्या सभेसाठी तहसिलदार बाहेर गेल्या असल्या कारणे माणगांव नायब तहसिलदार बि. वाय. भाबड यांच्याकडे सदर निवेदन देण्यात आले.
       या प्रसंगी माणगांव तालुका प्रेसक्लबचे पत्रकार अध्यक्ष उत्तम तांबे, माजी अध्यक्ष गौतम जाधव, जेष्ठ सल्लागार रविंद्र कुवेसकर या तिघांनी प्रातिनिधीक स्वरूपात माणगांव प्रेसक्लबच्या सर्व पत्रकार सदस्यांच्या वतिने निवेदन दिले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...