शुक्रवार, १९ जून, २०२०

नाभिक समाजासाठी ॲड प्रकाश आंबेडकर यांचा पुढाकार!


           जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट; दुकाने न उघडू दिल्यास  आंदोलनाचा इशारा


अकोला,ब्युरोचीफ :- सध्या लॉकडाउनच्या काळात अनेकांचे व्यवसाय व रोजगार बंद पडले आहे. नाभिक समाजाला त्याची सर्वात जास्त झळ पोहचत आहे. सध्या जवळपास सर्वच दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे परंतु केशकर्तनालय, ब्युटिपार्लर यांना मात्र परवानगी देण्यात आली नाही. यामुळे अकोला जिल्ह्यातील नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. या अनुषंगाने आज वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी नाभिक समाजाच्या प्रतिनिधी सोबत जिल्हाधिकारी यांची भेट घेउन जिल्ह्यातील केशकर्तनालय ब्युटी पार्लर  सुरू करण्यासाठी चर्चा केली. यावेळी पिंप्री चिंचवड महानगरपालिकेने केशकर्तनालाय सुरू करण्याचा दिलेल्या परवानगीच्या धरतीवर अकोला जिल्ह्यातीलही सर्व केशकर्तनालय व ब्युटि पार्लर उघडण्याची परवानगी द्यावी असे सुचविले.
नाभिक समाज या लॉकडाउनमुळे  विपन्नावस्थेत आला असून अकोट येथे उपासमारी व आर्थिक विवंचनेतून आत्महत्या देखील झाली आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. सदर समस्येतून बाहेर पडण्यासाठी नाभिक समाजाला तात्काळ दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच तोपर्यंत नाभिक समाजातील लोकांना मोफत अन्नधान्य व आर्थिक मदत करावी  अशी आग्रही भुमिका ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडली. अन्यथा लवकरच नाभिक समाज रस्त्यावर उतरून व्यवसाय करतील असा इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या आठ दिवसात यावर निर्णय घेण्यासंदर्भात मान्य केले. तसेच  याप्रसंगी बाळापूरमधील करोनाग्रस्त भागातील आरोग्य तपासणी करिता  वंचीततर्फे डॉक्टर उपलब्ध करून देण्याचा मानस ऍड बाळासाहेब आंबेडकर व्यक्त केला. ज्याचे जिल्हाधिकारी यांनी स्वागत केले.
याप्रसंगी प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख डॉ प्रसन्नजित गवई, युवा नेता पराग गवई, नाभिक समाजाचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर इंदुरकर, प्रशांत भातखडे, गजानन ओलोकार, संतोष पंडित, हरीहर पळसकर, गजानन येवतकर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...