शुक्रवार, १९ जून, २०२०

झोरे यांना उप अभियंता पदाचा पदभार देण्यास जि.प.प्रशासनाकडून टाळाटाळ.झोरे हे ओबीसी प्रवर्गातील असल्याने त्यांना डावलले जाते - चंद्रकांत कारके



जालना / प्रतिनिधी :- जिल्हा परिषद प्रशासनात रिक्त पदाच्या पदोन्नती मध्ये सद्या मनमानी कारभार सुरू असुन जेष्ठता यादी डावलुन उप अभियंता पदाचे अतिरिक्त पदभार राजकीय दबावा पोटी दिल्या जात असल्याने व झोरे हे ओबीसी प्रवर्गातील असल्याने त्यांना डावलले जात आहे असा आरोप करत या जि.प.च्या सर्व मनमानी कारभाराची वरीष्ठा मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील नेते तथा बहुजन भारत पार्टी चे महासचिव चंद्रकांतजी कारके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
        पुढे श्री कारके म्हणाले की, श्री.टि.डी.झोरे हे उच्च विद्या विभूषित बी.ई. ऐवजी एम.ई. उच्च शिक्षीत शाखा अभियंता असून यांची उप अभियंता पदाची सर्व शौक्षणिक पात्रता परिपुर्ण आहे.श्री. झोरे यांनी तसा विनंती अर्ज ही जालना जिल्हा परिषद प्रशासनाला कालमर्यादेच्या आत केला होता. मात्र राजकीय दबावा पोटी जाणीवपूर्वक त्यांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून वेळोवेळी डावलले जात आहे. तेव्हा त्यांना जातीची आडकाठी न टाकता जेष्ठता यादी प्रमाणे उप अभियंता पदाचा तात्काळ पदभार देण्यात यावा. नसता जिल्हा परिषद प्रशासनाच्या रिक्त पद भरती प्रक्रियेच्या मनमानी कारभाराची मा. विभागीय आयुक्तांकडून तसेच मंत्रालयीन मा. सचिवांकडून चौकशीची मागणी करण्यात येईल. असे सांगत येणाऱ्या काळात सर्व ओबीसी .एस्सी. अभियंत्यांना सोबत घेऊन त्यांच्या हक्क व अधिकारासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शेवटी चंद्रकांतजी कारके यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...