सोमवार, २७ जुलै, २०२०

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पात येणाऱ्या बौद्ध लेण्यांचे भारतीय पुरातत्व खात्यातर्फे संरक्षण करणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले



सिडको ने पाडलेल्या केरुमाता बौद्ध लेणी ला ना रामदास आठवलेंनी दिली भेट

बौद्ध लेण्यांच्या पुरातन अवशेषांचे लेण्यांचे जतन करण्यासाठी भव्य बौद्ध स्तूप उभारण्याची ना रामदास आठवले यांची सिडको ला सूचना;मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठविणार



मुंबई,ब्युरो चीफ  :- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी 1हजार 100 हेक्टर जागेत पनवेल तालुक्यातील 10 गावांचे पूर्वसन करण्यात आले असून त्यात  येणाऱ्या बौद्ध लेण्यांचे संरक्षण करावे.  विमानतळाला आमचा विरोध नाही मात्र  बौद्ध लेण्यांचे संरक्षण झाले पाहिजे. त्यासाठी 
भारतीय पुरातत्व खात्यामार्फत आपण प्रयत्न करू. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ 5 एकर जागेत भव्य बौद्ध  स्तूप उभारून बौद्ध लेण्यांचे अवशेष जतन करावे या मागणी साठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. 

उलवे पनवेल येथून जवळ असणाऱ्या वाघिवली वाडा येथील कोंबडभुजेमधील केरुमाता बौद्ध लेणी सिडको ने पाडल्यानंतर तेथे आज ना रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली.

पाडण्यात आलेल्या केरुमाता  बौद्ध  लेणीचे पुरातन अवशेष सुरक्षितरित्या उत्खनन करून जतन करावेत. त्यासाठी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ  भव्य बौद्ध स्तुप उभारावा अशी सूचना सिडको प्रशासनाला ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.यावेळी पनवेल चे उपमहापौर आणि रिपाइं चे रायगड जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड; सुरेश बारशिंग; नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओव्हाळ; महेश खरे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 

  नवी मुंबई विमानतळ उभारण्यात येणाऱ्या परिसरात केरुमाता बौद्ध लेणी तसेच कुंडेवहाळ येथील कुलुआई मंदिर; ओवळा पाणेरी आई लेणी आणि दापोली येथे राणू आई  लेणी या बौद्ध लेण्यांचे संरक्षण करावे. त्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याला मार्फत प्रयत्न करणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...