शुक्रवार, २४ जुलै, २०२०

                          अण्णाभाऊंना भारतरत्न का मिळावा

मित्रहो
         बहुतांश पुढारी नेते अण्णाभाऊं कडे फक्त एक महान लेखक व कवी या दृष्टिकोनाने पाहतात पण याच्या पलीकडेही अण्णाभाऊंचे योगदान हे फार मोलाचे आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊंनी येथील शेतकरी कष्टकरी कामगार यांची व्यापक चळवळ उभी केली व एक मोठा निकराचा लढा अण्णाभाऊंनी दिला लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून अण्णा भाऊंनी आपल्या पहाडी आवाजाने शाहिरी सादर करून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून जनजागृती केली त्यामध्ये शाहीर शंकर भाऊ साठे शाहीर अमर शेख शाहीर गव्हाणकर शाहीर पट्टे बापूराव कुलकर्णी यांनी अण्णाभाऊंना मोलाची साथ दिली आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी ही मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी अण्णाभाऊंनी एक मोठा क्रांतीचा लढा या महाराष्ट्रात उभा केला व अखेर ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली 15 ऑगस्ट 1947 साली हा भारत देश स्वातंत्र्य झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 16 ऑगस्ट 1947 साली अण्णाभाऊंनी आझाद मैदान मुंबई येथे 20 हजार लोकांचा मोर्चा काढला व त्यामध्ये यह आझादी झुठी है देश कि जनता भुकी है ही प्रमुख घोषणा देण्यात आली अण्णाभाऊ आपल्या वैजयंता कादंबरीच्या प्रस्तावनेत असं म्हणतात ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून येथील दलित कष्टकरी कामगार यांच्या तळहातावरती तरलेली आहे बंगालच्या फाळणीनंतर बंगालची हाक हा पोवाडा लिहून अण्णाभाऊंनी मानवतेचे दर्शन या जगाला घडवलं तसेच गोवा मुक्तिसंग्राम व हैदराबाद मुक्तिसंग्राम यामध्ये अण्णाभाऊंचे अमुलाग्र योगदान आहे तसेच छत्रपती शिवबांचा पोवाडा रशियाच्या चौकाचौकात डफावरची थाप मारून गाणारे अण्णाभाऊ होते छत्रपती शिवरायांचे चरित्र जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे अण्णाभाऊ साठे होते अण्णाभाऊ हे महान लेखक व कवी होतेच पण त्याच्याही पलीकडे जाऊन अण्णाभाऊ हे एक थोर महान समाजसुधारक थोर महान क्रांतिकारक होते. अण्णा भाऊंनी आपल्या लेखनातून येथील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांच्या वरती घाव घातला व जे नायक-नायिका काळाच्या पडद्याआड गेले होते त्यांना अण्णाभाऊंनी पुन्हा जिवंत केलं अण्णाभाऊंनी ज्या प्रकारे आपल्या फकीरा कादंबरीत फकिराला जे स्थान दिलं तसेच स्थान शंकर पाटील व विष्णुपंत कुलकर्णी यांनाही दिले या भारताची संस्कृती खर्‍या अर्थाने कोणी जगासमोर मांडली असेल तर ती आण्णाभाऊंनी मांडली आहे आणि म्हणूनच भारतरत्न या पुरस्काराचे खरे हक्कदार साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे हेच आहेत 2019-20 हे अण्णाभाऊंचे जन्मशताब्दी वर्ष आहे देशभरातून अण्णाभाऊंच्या अनुयायांकडून अण्णा भाऊंना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात भारतरत्न ची मागणी केली जाते व शासनाने या मागणीला अनुसरून अण्णा भाऊंना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन अण्णाभाऊंचा गौरव करावा अशी मी शासनास विनंती करतो

          सुरज साठे
सत्यशोधक अण्णाभाऊ साठे
       जन्मभूमी वाटेगाव
         9370626619

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...