रविवार, ८ मार्च, २०२०

त्या काळात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दगडधोंडे अंगावर झेलले म्हणून आज महिला उच्च पदावर-जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर
    जालना, (प्रतिनिधी)- आज महिला पुरुषांबरोबर खांद्याला खांद्या लावून प्रत्येक क्षेत्रात काम करतांना दिसतात.
याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. त्यांनी त्या काळामध्ये अत्यंत विपरित परिस्थितीत मुलींना शिक्षण देवून सुज्ञ केले व मुलींसाठी शिक्षणाचे दारे उघडी केली असल्याचे प्रतिपादन जालना जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी बोलतांना केले.
ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृती ज्योत माँ जिजाऊंचे स्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथून सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळ असलेल्या नायगावकडे जाणाया ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. त्यावेळी अंबेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अविनाश ठाकरे, माजी आमदार तोताराम कायंदे, सिंदखेडचे नगराध्यक्ष सतिश तायडे, जळगाव जामोदच्या नगराध्यक्षा स्वातीताई वाकीकर, स्मृतीज्योती समितीचे प्रमुख दिपक ठाकरे, माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे, संतोष खांडेभराड, संतोष जमधडे, संजय मेहेत्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन स्मृती ज्योत समिती सिंदखेड राजा व माळी कर्मचारी महासंघ बुलढाणा यांनी केले. पुढे बोलतांना अंबेकर म्हणाले की, ही ज्योत ज्या-ज्या ठिकाणाहून प्रवास करणार आहे. त्या-त्या ठिकाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचार नेणार असल्याचे सांगितले. तसेच पुरुषांनी आपली मानसिकता बदलल्यास ५० टक्क्यांने असलेल्या महिला समाजाला खNया अर्थाने पुढे जाता येणार आहे. तसेच बुध्दीमत्तेने महिला या पुरुषांच्या मानाने काकण भर सरसच असतात. परंतु दुर्देवाने समाजात त्यांना त्यांचे कर्तुत्व सिध्द करण्याची पुरेशी संधीच मिळत नाही. शिक्षणाशिवाय कोणत्याही समाजाचा, व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही. समाजात परिवर्तन होवू शकत नाही, हे त्या काळात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांनी ओळखले व समाजाचा तीव्र विरोध झुगारुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना सुशिक्षित करुन त्यांनी स्त्रीयांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. या थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सावित्री सृष्टी निर्माण करण्यात यावी, या मागणीसाठी दिपक ठाकरे व त्यांचे सहकारी सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे अंबेकर यांनी सांगितले.
यावेळी माळी महासंघाचे राज्याचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व महिला दिनाच्या औचित्याने सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...