मंगळवार, १२ मे, २०२०

राज्य राखीव पोलीस दलाचा जवान व परिचारिकेच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह


जालना,प्रतिनिधी :- राज्य राखीव बलगट क्र. ३ येथील एका जवानाच्या स्वॅबचा तसेच आनंदनगर, नुतन वसाहत परिसरात राहणाऱ्या व जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिकेच्या स्वॅबचा अहवाल आज दि. 11 मे, 2020 रोजी पॉझिटीव्ह आला असुन कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या सहवासितांची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.


            दि. 10 मे रोजी रंगनाथनगर, पाण्याची टाकी परिसर,जालना येथील महिला कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत खबरदारीची उपाययोजना म्हणुन पाच तालुकास्तरीय आरोग्य पथकाने परिसरातील 124 कुटूंबातील699 नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण केले. या कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील ३ हायरिस्क तसेच कानडगाव ता.अंबड येथील दोन कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कातील पाच हायरिस्क व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असुन त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही.
            जिल्ह्यात एकुण 1376 व्यक्ती संशयित असुन सध्यारुग्णालयात 31 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्याव्यक्तींची संख्या 810 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणीकेलेली संख्या 78 एवढी तर एकुण तपासणी केलेल्याव्यक्तींची संख्या 1222 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने-02 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 13 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1127, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यातआलेल्या नमुन्यांची संख्या 240, एकुण प्रलंबित नमुने-78 तरएकुण 779 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींचीसंख्या 24, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींचीसंख्या 595 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांचीसंख्या 01, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-283, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेलेसंशयित-10, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या31, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या02, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या268 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढीआहे.  
        जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात जाण्यासाठी आजपर्यंत उत्तरप्रदेश-4140,बिहार-2681,मध्यप्रदेश-898, राजस्थान-658, पश्चिम बंगाल- 424, यासह उर्वरीत 14 राज्यातील एकुण -10118 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 3352 अशा एकुण 13470 नागरीकांना पास उपलब्ध  करुन देण्यात आले आहेत.
आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन 84 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 1596 असे एकुण-1680 नागरीक दाखल झाले आहेत. या सर्वाना 14 दिवस होम क्वांरटाईन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन  आजपर्यंत             बिहार-20,आंध्रप्रदेश-46,ओरिसा-83,मध्यप्रदेश-687,छत्तीसगड-08,उत्तर प्रदेश- 1317,झारखंड -03,राजस्थान-59, तेलंगणा- 2 असे एकुण 2225 नागरीकांना परराज्यात पाठविण्यात आले आहेत.कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 283 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुनयामध्ये मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-15, मोतीबागयेथील शासकीय मुलींचे वसतीगृह-28, पोलीस प्रशिक्षणकेंद्र-90, मॉडेल स्कुल, अंबा रोड, परतुर-27, जिजाऊ इंग्लिशस्कुल जाफ्राबाद-15, हिंदुस्थान मंगलकार्यालय,जाफ्राबाद-06, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, भोकरदन-23,डॉ. बाबासाहेब आंबेडकरभवन इमारत क्र. 1-64, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड-6, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे 9 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
     लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 524 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 87 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 571 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 81 हजार 300 असा एकुण 3 लाख 8 हजार 108 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...