मंगळवार, १२ मे, २०२०

भाजीपाला आणि हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणामध्ये बदनापूर शहरासहित आजूबाजू परिसरात मागणी...



भाजीविक्रेता विक्रेता युवकांनी लॉकडाऊनच्या  सुरुवातीपासून करतोय शहरातील नागरिकांच्या घरपोच सेवा...


कोई धंदा छोटा नही होता/ धंदे से बडा कोई धर्म होता.. (कैलास खैरे )

बदनापूर प्रतिनिधी :- बदनापूर शहरात राहणारा भाजी विक्राता कैलास खैरे  सर्वसामान्य कुटुंबात  राहणारा युवक याने लॉकडाऊनच्या सुरवातीपासून सोशल दिस्टर्शन ठेवून आपला व्यवसाय करत आहे. शहरातील वासियांना रोज ताजा भाजीपाला प्राप्त करून देतोय विशेष म्हणजे तो ऑर्डरनुसार प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन घरपोच सेवा देत आहे व्यवसाय मध्ये पारदर्शकता पणाने योग्य तो भाव शहरवासियांना परवडेल अशाच किमतीमध्ये भाजीपाला विक्री करतो. तसेच चांगल्या प्रकारे त्याच्या भाजीपाला आणि हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणामध्ये शहरातून मागणी येते त्याचप्रमाणे शहराच्या आजूबाजूच्या खेडेगावात जाऊन ऑर्डर प्रमाणे भाजीपाला हापूस आंबे पोहोच करतो.या युवकाने कोणतेही नोकरीच्या शोधात न लागता बेरोजगार म्हणून घरी बसून कारण दाखवायच आयुष्याला दोष द्यायचा आशा  गोष्टीला धुडकावून लावून  थेट आपली भूमिका या व्यवसायात उतरविली आणि छोट्या भांडवला  पासून मोठा भांडवल व्यवसाय कसा उभा राहील याकडे त्याची ओढ आहे.विशेष म्हणजे व्यवसायात जिद्द आणि कष्ट आणि प्रामाणिक पणा असला की कोणताही व्यवसाय

 न परवडणारा असु शकत नाही.  फक्त तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवला की नक्कीच कोणत्याही व्यक्तीला आपलंस करून घ्यायला वेळ लागत नाही हे ताज उदाहरण कैलास खैरे या तरुणाने बघितले लक्षात येते.आज कालच्या सुशिक्षित तरुणाईला कैलास खैरे यांच्याकडून आदर्श घेण्यासारखं नक्कीच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...