मंगळवार, १२ मे, २०२०

*औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील सौंदलगाव येथील घटना*


रुग्णवाहिकाचा दुचाकीला मागून धडक; एकाचा मृत्यू.

अंबड/प्रतिनिधी : प्रेत घेऊन जाणाऱ्या भरभर धाव रुग्णवाहिकेला दुचाकीला मागून धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना दिनांक ११ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील सौंदलगाव येथील देविदास रामदास खोमणे वय ४५ आपल्या गावावरून दुचाकीवर वडीगोद्री गावाकडे जात असताना एम.एच २० ए.क्यू ७९३१ पाठीमागून संभाजीनगर हुन बीड कड़े प्रेत घेऊन जाणारी रुग्णवाहिका क्रमांक एम.एच १६ बी.सी ००७२ या रुग्णवाहिका ने जोराची धडक दिल्याने देविदास खोमणे गंभीररीत्या जखमी झाल्याने वडीगोदरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले परंतु रस्त्याने मरण पावले असून प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. धडक दिल्याने रुग्णवाहिका ग्रामस्थांनी गोंदी पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले. घटनास्थळी गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे व पोलीस कर्मचारी यांनी येऊन घटनास्थळी पाहणी केली व घटनास्थळी पंचनामा करून वाहिका ताब्यात घेऊन. रुग्णवाहिका मधील प्रेत दुसऱ्या गाडीत पाठवण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...