रविवार, १४ जून, २०२०

मेहनत व प्रामाणिकते च्या जोरावर त्याने केली परस्तितीवर मात..


विशेषप्रतिनिधी :- संजीवकुमार गायकवाड 
बारड येथे राहणाऱ्या महेश श्रीरामवार या युवकाला लहानपणापासूनच व्यवसायाची आवड.घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणात अडचणी आल्या.
       त्यांनंतर महेश याने मिळेल ती छोटी मोठी कामे करायला सुरुवात केली. त्याला केळी व इतर फळपिकांच्या व्यापाराची आवड असल्यामुळे सुरुवातीला फ्रूट व कमिशन एजंटकडे नोकरी केली. या क्षेत्रात अनेक राज्यातील व्यापाऱ्यांशी व शेतकऱ्यांशी त्याच्या ओळखी झाल्या.
  यातूनच मग त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहिले. काही काळ फिरुन ऑर्डर घेत सचोटी व प्रामाणिकतेच्या बळावर व्यवसायात जम बसविण्यास सुरुवात केली. आंध्र प्रदेश व कर्नाटक मधूनही ऑर्डर मिळवल्या. सध्या त्याचा माल महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा, दिल्ली व काश्मीर राज्यात जातो.
      आज अर्धापूर येथे तिरुपती फ्रूट मर्चंट अँड कमिशन एजंट या नावाने कार्यालय सुरु केले. या कार्यालयाचे आज उद्घाटन केले यावेळी माझ्यासह माजी जि.प.सदस्य बाळासाहेब बारडकर,जि.प.सदस्य बबन बारसे,ज्येष्ठ मार्गदर्शक धर्मराज देशमुख, नगराध्यक्ष अर्धापूर शेख लायक,संजय लहानकर, दत्ता पाटील पांगरीकर,संतोष पाटील कपाटे,समद भाई,मनसुक सेठ,रनजित सिंगजी,आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...