सोमवार, १५ जून, २०२०

कृषि विभागाचे भरारी पथकाकडुन भोकरदन येथील बोगस

कापुस बियाणे विक्री प्रकरणी गुन्हा दाखल.


जालना,ब्युरोचीफ:- कृषि विभागाच्या जिल्हास्तरीय गुणनियंत्रण भरारी पथकाने रविवारी दि. 14 जुन 2020 रोजी भोकरदन येथील तेजल कृषि सेवा केंद्रावर अचानक छापा टाकला असता बोगस कापुस बियाणे Honey 4-G आणि RC- 659 BT-4G रिर्सच हायब्रीड कॉटन सीड असा उल्लेख असलेले कापुस बियाणांचे 6 पॅकेट आढळुन आले. त्या पॅकेटवर उत्पादक कंपनी, उत्पादन तारीख, लॉट नंबर व एम. आर. पी. किंमत छपाई केलेले आढळुन आले नाही. त्यामुळे पथकाने सदर विक्रेत्याकडे खरेदी केलेल्या बियाणाचे बिलाची मागणी केली असता विक्रेत्याने कोणतीही माहिती दिली नाही. हे बियाणे बोगस आढळुन आल्यामुळे तेजल कृषि सेवा केंद्र भोकरदनचे मालक अनिल खेमचंद पारिख यांनी बोगस संशयीत कापुस बियाणे शेतक-यांना विक्रि करत असल्याने बियाणे कायदा  1966 व अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 मधील नियमांचे उल्लंघन केल्यामुळे जिल्हा परिषद जालनाचे मोहिम अधिकारी सुधाकर कराड यांनी विक्रेत्या विरुध्द भोकरदन पोलीस स्टेशन येथे दि. 14 जुन 2020 रोजी FIR क्रं. 347 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या भरारी पथकामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी भिमराव रणदिवे, कृषि अधिकारी राजेश तांगडे व भोकरदन पंचायत समितीचे कृषि अधिकारी धर्मराज काकडे हे सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...