मंगळवार, २३ जून, २०२०

लक्ष्मी कॉटेक्स कापुस खरेदी केंद्रास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांची भेट

एकाही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडून राहणार नाही याची दक्षता घ्या


जालना,ब्युरोचीफ :– जालना येथे सीसीआयच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या लक्ष्मी कॉटेक्स या कापूस खरेदी केंद्राला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज प्रत्यक्ष भेट देत खरेदी करण्यात येत असलेल्या कापसाची पहाणी करुन एकाही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधितांना यावेळी दिले.या पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसमवेत अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हाउपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण, जिनिंगचे मालक रमेशजी मुंदडा, ग्रेडर हेमंत ठाकरे  आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, जिल्ह्यामध्ये विक्रीविना पडून असलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाचे दोनवेळेस सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातुन जिल्हयात चार ठिकाणी अशाच पद्धतीचे कापुस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असुन या केंद्राच्या माध्यमातुन कापसाची खरेदी करण्यात येत आहे.  जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याचा कापूस विक्रीवाचुन पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.  जिनिंग मालकांच्या असलेल्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...