रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

रुग्ण हक्क परिषदेच्या प्रदेश सचिव पदी संध्याराणी निकाळजे आणि सोहनी डांगे यांची निवड* 
ता.प्रतीनीधी गेवराई 
*पुणे -* रुग्ण हक्क परिषदेच्या प्रदेश कार्यकारणीतील सचिवपद हे प्राधान्याने महिलांसाठी आरक्षित केलेले आहे. रुग्ण हक्क परिषदेच्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात, तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये , विदर्भातील नागपूर जिल्ह्यात रुग्ण हक्क परिषदेची संघटनात्मक बांधणी करून अल्पावधीत आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या सातारा जिल्हा सचिव संध्याराणी निकाळजे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या सचिव पदी बढती मिळाली  आहे . त्यांच्या कडे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याची जबाबदारी परिषदेचे  संस्थापक  अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सोपवली आहे . परिषदेच्या प्रधान कार्यलयामध्ये आज त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले .
सातारा जिल्ह्यातील संध्याराणी निकाळजे यांच्या सोबतच पुणे येथील सोहनी डांगे यांचीही प्रदेश सचिव पदी वर्णी लागलेली आहे. रुग्ण हक्क परिषदेमध्ये स्थापने पासून कार्यरत राहून विविध उपक्रम,  शाखा उदघाटने,  तसेच हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराच्या विरोधात झालेल्या अनेक आंदोलनामध्ये सोहनी डांगे यांनी सहभाग घेतला आहे . सोहनी डांगे यांच्याकडे मुंबईसह कोकण आणि उत्तर महाराष्ट्रची जबाबदारी सोपविण्यात आली आहे . प्रधान कार्यलयामध्ये संस्थापक  अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते प्रदेश सचिव पदी नियुक्तीचे पत्र त्यांना देण्यात आले.
जालना slug : अंबड जवळ लालवाडी येथे तीन दिवसीय रहमती पीर उरस 
 प्रतिनिधी/अंबड रस्त्यावर लालवाडी पाटी जवळ असलेल्या रहमती पीर यांच्या तिसऱ्या उरसासाठी राज्यभरातून भाविकांनी हजेरी लावली आहे. सोमवारपासून (दि. 27 जानेवारी) सुरू झालेल्या या तीन दिवसीय उरुसाचा आज समारोप आहे.रब्बानी फाउंडेशनच्या वतीने या उरुसाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी कवालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते...तर येथील पीरवर चादर चढविण्यासाठी राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी इथे हजेरी लावली आहे...बाहेरगावाहून आलेल्या भाविकांच्या निवासाची व्यवस्था देखील रब्बानी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असल्यामुळे जालना-अंबड रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना ही विद्युत रोषणाई एक सुखद अनुभव देऊन जाते... या उरुसाला सुरुवात होण्यापूर्वी सोमवारी जालना शहरातून भव्य मिरवणूक ही काढण्यात आली होती. या कार्यक्रमाला रब्बानी पीर साहब सज्जादा नशीन रहमती पीर यांसह मोईन अजमेरी साहब शहजादा रंगीले पीर मुंबई, सुहेल खंडवणी साहब ट्रस्टी मगदूम साहब चारिटेबल ट्रस्ट मुंबई, यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.

मंगळवार, २८ जानेवारी, २०२०

वाळुज बजाज नगर येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौक लोकार्पण सोहळा पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला
वाळुज महानगर :-आज वाळूज बजाज नगर येथे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब  चौक चा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी उपस्थित माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे,संघटन मंत्री प्रविण दादा घुगे,

जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, डॉ भागवत कराड साहेब,सतिष भाऊ नागरे,दिपक भाऊ बडे,रमेश गायकवाड,या मान्यवर च्या हस्ते सकाळी 11:00 वाजता पार पडला यावेळी आयोजक लोकनेते फाऊंडेशन व जय भगवान महासंघा पदाधिकारी यांनी मान्यावराचे स्वागत केले व  सर्व जमलेल्या मुंडे भक्तचे आभार मानले व लोकनेते फाऊंडेशन चे उपाअध्याक्ष भगवान नागरे यांनी जमलेल्या मुंडे भक्तचे आभार मानले यावेळी उपस्थित आप्पासाहेब खेडकर,बाबासाहेब घुगे,भगवान नागरे,समाधान घुगे,बाबाराम मिसाळ,विजयकुमार खेडकर,सुभाष केदार, सुदर्शन वाघ,गणेश आव्हाड, अक्षय पालवे,डि एम घुगे,किरण बारगजे, नारायण घुगे,पत्रकार केशव मुंडे आदी उपस्थित होते.

*अंबड - प्रतिनिधि *  *नगर परिषद अंबड़  भारतीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण करण्यात आला.* भारतीय संविधान घेण्यात आले  व  मोठ्या उत्साहात पार पडला . यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी घोलप साहेब व इतर नगर सेवक, पदादिकारी अवर्जून उपस्तिथ होते_
प्रजाकसत्तादिन26_जानेवारी_2020.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज नगर परिषद स्वच्छता कर्मचारी, यांना स्वच्छता बूट,कपड़े,मास्क,गम बूट, जॉकेट वाटप करन्यात आले,तसेच दिव्यांग बांधवांना,व्हिलचेअर,कुबड़ी, वाटप करन्यात आले, तर रमाई आवास,पंतप्रधान आवास योजना,बचत गट अश्या सर्वच लाभर्थ्यांना नीधि, चेक,कपड़े साहित्य वाटप करन्यात आले,

 🇮🇳सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा !
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

अंबड़ येथे ग्लोबल इंग्लिश स्कूल गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा*.

अंबड प्रतिनिधि**ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे गणतंत्र दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्लोबल इंग्लिश स्कूल चे अध्य्क्ष खुर्शित जिलानी साहेब तसेच कर्यक्रमाचे अध्य्क्ष पंचायत समितिचे विपुल रमेश भागवत सर हे होते. व या कार्यक्रमास प्रमुख पाहुने म्हणून लागलेले केदारदादा कुलकर्णी, गंगाधर वराडे, जाकेर डावरगांवकर, अशोक लांडे, शकील शहा मोहम्मद, शेख केसर, हे अवर्जून उपस्थित होते. तसेच ग्लोबल इंग्लिश स्कूल चे प्रिंसिपल खान मँडम,  सिरान सर, व सर्व शिक्षण वृंद यांच्या सह्याने कर्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

शनिवार, २५ जानेवारी, २०२०


अंबड़ शहरात वाहतूक कोंडवाडा*  जालना-बिड रोड वरील अंबड़ मंडी बाजार या रूठ वरील येणाऱ्या जाणाऱ्या ओकांची गर्दी व वाहतूक कोंडवाडा  शहरातील दर हाप्ति असलेल्या गुरुवार मंडी बाजार ......(छायाचित्र)

गुरुवार, १६ जानेवारी, २०२०

सावित्री बाई फुले यांची जयंती व बालिका दिन मोठय़ा उत्साहात मानेवाडी जि.प.प्रा.शाळा येथे साजरा :- पांडुरंग आवारे-पाटील
बीड.(प्रतीनिधी)दि.3/01/ रोजी सकाळी 9.45 वाजता जि.प.प्रा.शाळा.मानेवाडी.ता.जि.बीड येथे जि.प.प्रा.शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
व चावडी वाचन घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शिवसंग्राम युवा नेते मा.पांडुरंग आवारे-पाटील होते व प्रमुख अतिथी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मा.अनुरध माने हे होते. सावित्रीबाई फुले यांचे कार्य व महिला शिक्षणांची चळवळ या विषयी पांडुरंग आवारेंनी यांनी मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या भाषणातून मुलींना जगू द्या आणि शिकू दया हे सावित्रीबाईचे विचार समाजा पर्यंत पोहोचवले व महिला म्हनजे दोन्ही घराचा ऊदघार करणारी माऊली आहे तिचे रक्षण हेच आपले कर्तव्य असे स्पष्ट केले.व सावञीबाई फुले यांच्या जयंती निमीत्त सर्व विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना आवारेंनी शुभेच्छा दिल्या यावेळी समाजसेवक मा. डिंगाबर (तात्या) आवारे,मा.सरपंच पोपट माने,साहेबराव माने,दत्ता माने,अंकुश माने,संदिपान माने,बाबु इंगोले,महादेव माने व अन्य मानेवाडी ग्रामस्थ,शिक्षणप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.शाळेचे मुख्यध्यापक श्री जाधव सर यांनी पांडुरंग आवारे पाटील यांचे कवतूक करून व उपस्थितांचे आभार व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता चावडी वाचनाने करण्यात आली.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...