शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

मराठी भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे
            जालनादि. 27 - जागतिकीकरणाच्या आजच्या युगात इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत आहेअशामध्ये अनेक प्रादेशिक भाषा हरवत चालल्या आहेतमराठी भाषा बोली भाषेतलिखाणातश्राव्य साहित्याच्या स्वरुपात टिकवणे आवश्यक आहेमराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले.
          
  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री हजारे बोलत होते
यावेळी माहिती सहाय्यक अमोल महाजनतांत्रिक सहाय्यक ज्ञानेश्वर पैठणेशंकर पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            श्री हजारे म्हणालेदरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज  यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिनम्हणून साजरा केला जातोया माध्यमातुन मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न केले जातातशालेय स्तरापासून प्रशासकीय स्तरावर विविध स्पर्धाकार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतेबदलत्या काळानुसार भाषेवर भौगोलिक,राजकीयसंस्कृतिक बदलाचे परिणाम होतातमराठी भाषेवरही ते होत आहेतत्यामुळे ते स्वीकारत भाषा टिकवली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत ती पोहचू शकते असे सांगत मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.  
            माहिती सहाय्यक श्री महाजन म्हणाले भारत देशातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक भाषा आहेमहाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये मराठी ही अधिकृत राजभाषा म्हणून ओळखली जातेमहाराष्ट्र शासनासोबतच अनेक मराठी भाषा प्रेमींकडून 27 फेब्रुवारी दिवशी 'मराठी राजभाषा दिनाचंऔचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपायमोहिमा राबवल्या जात असल्याचे सांगत प्रत्येकांने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे फित कापुन उदघाटन करण्यात आलेतसेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलीयावेळी उपस्थितांना मराठी भाषेची प्रतिज्ञा देण्यात आली.
        कार्यक्रमास नागरिक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
           पालकमंत्री राजेश टोपे यांचा जालना जिल्हा दौरा

जालना, प्रतिनिधी :- राज्याचे  आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राजेश टोपे  यांचा जालना जिल्हा दौरा
पुढीलप्रमाणे आहे.शनिवार दि. 29 फेब्रुवारी 2020 रोजी  सकाळी 5.30 वाजता देवगिरी एक्सप्रेसने जालना येथे आगमन व अंजिक्य बंगला येथे राखीव सकाळी 10.00 वाजता जालना येथुन अंकुशनगर ता.अंबडकडे प्रयाण, सकाळी 11.00 वाजता अंकुश नगर येथे आगमन व नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोखरा) बाबत बैठक ( स्थळ- कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर) दुपारी 1.00 वाजता कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना येथुन सोयीनुसार प्रयाण व मुक्काम. 

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

वंचितांना न्याय देण्यासाठी पुन्हा रिपब्लिकन सेनेत सुधाकर निकाळजे मराठवाडा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्याच्या रिपब्लिकन सेनेत प्रवेश.
  जालना (प्रतिनिधी) ः- सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा मंगळवार दि. 25 रोजी घेण्यात आला.
  यावेळी मराठवाडा अध्यक्ष सुधाकर निकाळजे, पश्‍चिम जालना जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहुळकर, पुर्व जालना जिल्हाध्यक्ष रोविदास गंगातिवरे, जालना स. प. प्रमुख दिनेश आदमाने, जालना जिल्हा महासचिव एक्स आर्मी मेजर चंद्रकांत खरात, पुर्व जालना जिल्हा महासचिव अ‍ॅड. कैलास रात्नपारखे, जिल्हा संघटक मच्छिंद्र खरात आदींची उपस्थिती होती.यावेळी कार्यकर्त्यांना संबोधीत करतांना मराठवाडा अध्यक्ष सुधाकर निकाळजे म्हणाले की, नव्या जोमाने काम करण्यासाठी आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळून देण्यासाठी आपण पुन्हा रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला असून जालना जिल्ह्यामध्ये नव्या उमेदीने पक्ष वाढविण्यासाठी सर्व समाजघटकांना सोबत घेवून काम करण्यात आहे.या प्रसंगी श्री. निकाळजे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये  उपाध्यक्ष अरुण म्हस्के, जिल्हा सचिव भानुदास साळवे, जिल्हा सहसचिव नवनाथ ठोके, पुर्व जालना जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव आंभोरे, जालना तालुकाध्यक्ष भिमराज खरात, तालुका उपाध्यक्ष बबन खरात, जालन शहर अध्यक्ष कैलास बनसोडे, जालना तालुका युवा महासचिव सुमेध हिवाळे, जालना शहर महासचिव महेश घोरपडे, वाघरुळ सर्कल अध्यक्ष कैलास लाहाने, युवा तालुकाध्यक्ष कृष्णा जाधव, जिल्हा युवा महासचिव राज रत्नपारखे, शहर युवाध्यक्ष संतोष ऊनाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला.

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करणार -शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
मुंबई, / प्रतिनिधी :- राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी इयत्तेत मराठी भाषा हा विषय शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अनिवार्य करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजूरीसाठी मराठी भाषा दिनानिमित्त मांडण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.
आज राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत सदस्य मंगेश कुडाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला. त्यास उत्तर देताना मंत्री श्रीमती गायकवाड बोलत होत्या. यावेळी  सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, सुनील प्रभु, आशिष शेलार, भास्कर जाधव यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.मंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या, सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याबाबतचे विधेयक उच्च सभागृहात मांडले जाणार असून, मराठी भाषा दिनानिमित्त ते विधानसभेत उद्या मंजूरीसाठी मांडण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी, केंद्रीय, आंतरराष्ट्रीय या सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून, ज्या शाळा या नियमाची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, प्राथमिक आणि माध्यमिक अशा वर्गवारीत टप्प्याटप्प्याने या मराठी भाषा सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री गायकवाड यांनी दिली.त्याचबरोबर, ज्या खाजगी शाळा शैक्षणिक शुल्काबाबत नियम पाळत नाहीत अथवा गरजेपेक्षा जास्त शुल्क वापरतात अशा शाळांबाबत तक्रारी आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी उपस्थित उपप्रश्नास दिली.
                 सावता परिषदेच्या मराठवाडा विभाग 
              उपाध्यक्षपदी विष्णूभाऊ पुंड यांची निवड.
जालना/प्रतिनिधी :- सावता परिषदेच्या मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी अंबड येथील विष्णुभाऊ पुंड यांची निवड करण्यात आली.
 सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या सुचनेनुसार प्रदेश महासचिव मयुर वैद्य यांनी ही निवड एका नियुक्तीपत्राव्दारे केली.  तसेच मराठवाडा विभाग संघटकपदी गणेश वाघमारे (जालना), महिला आघाडी जालना जिल्हाध्यक्षपदी सौ. सुषमा खरात, युवक आघाडी जालना जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

हरीनाम हे मानव जीवनाचे उध्दार करणारे नाम आहे- ह.भ.प
बद्रीनाथ महाराज यज्ञेकर जोशी
सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी):-भगवंताच्या नाम चिंतनाने मोह,मध,मत्सर, या सर्व गोष्टीचा नाश होतो तसेच मानव जीवनाचा उध्दार होतो असे प्रतिपादन रामनगर येथील बाल कीर्तनकार बद्रीनाथ महाराज यज्ञेकर-जोशी यांनी मौजपुरी येथे सुरू असलेल्या 
 अखंड हरिनाम सप्ताह प्रसंगी पहिल्या दिवशी कीर्तन रुपी सेवेत केले.किर्तनरुपी सेवेसाठी घेतलेल्या ज्ञानदेव राय यांचा अभंग रामकृष्ण नामे हे दोनी साजिरे हृदय मंदिरी स्मरा कारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा रुदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया या अभनगवर पुढे निरुपम करताना ते म्हणाले की एकदा मनुष्य मोह पाश्यात अडकला गेला की त्याला काही कळत नाही त्याचप्रमाणे मद्यपान केलेला माणूस मद्यपान केल्यानंतर आपले श्रेष्ठत्व व स्थान विसरून जातो पण मद्याची नशा ही काही काळापुरती मर्यादित असते पण मोहाची नशा ही जन्मोजन्मी उतरत नाही त्याच बरोबर ज्ञानी मनुष्य मोहपाश्या अज्ञानी होतो सदाचारी हा दुराचारी होतो अशा मोहतून जर सुटका करायची असेल तर भगवंतांचे नामसमरण जीवनात केले पाहिजे त्याचबरोबर तारुण्य हे माणसाला नको त्या गोष्टीकडे घेऊन जात जाते तेव्हा तरुणपणात भगवंताचे नामचिंतन करणे आवश्यक आहे आपुलिया आपण करा सोडवणं या अभंगतील उकतीप्रमाणे आपली जर दुःखातून सोडवणं करावयाची असेल तर ते आपणच सोडवू शकतो कीर्तन श्रवणासाठी मौजपुरी सह पंचक्रोशीतील भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणात उपस्तीती होती
                                          दुःखद वार्ता
अंबड (प्रतिंनीधी) :- अंबड येथील आंबेडकर नगर येथील रहिवासी
बबनराव खरात वय 67 वर्ष,रा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर
यांचे अल्पशा आजाराने आज दि.26/02/20  रोजी दुःखद निधन झाले आहे. आयु.सुनिल बबनराव खरात,अनिल बबनराव खरात,किशोर बबनराव खरात,राहुल बबनराव खरात,राजु बबनराव खरात यांचे ते वडील होते,व आयु.मती ज्योतीताई खरात यांचे ते सासरे  होते.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...