सोमवार, ४ मे, २०२०
ज्ञानेश्वर शेजुळ यांनी सॅनिटाझर व मास्क वाटप करून साजरा केला वाढदिवस.
जालना प्रतिनिधी:- भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ कार्येकर्ते जालना तालुका भाजपाचे मा. तालुकाध्यक्ष व जालना रो.ह.यो. अध्यक्ष
श्री.ज्ञानेश्वर पाटील शेजुळ यांनी कोरोना विषाणूच्या पाश्वभूमी वर वारेमाप खर्चाची उधळपट्टी न करता सोनदेव गावातील गरजू नागरिकांना सॅनिटाईझर व माँस्कचे वाटप करत अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.आज दि. ४ मे रोजी ज्ञानेश्वर शेजुळ यांचा वाढदिवस होता गेल्या अनेक वर्षांपासून श्री शेजुळ हे सामाजिक कार्यात अग्रेसर असते ग्रामिण भागातील जनतेवर भूकंप गारपीट अतिवृष्टी सारखे प्रसंग सर्व सामन्यावर उधवल्यास ज्ञानेश्वर शेजुळ हे मदतीसाठी अग्रस्थानी असतात त्यांना सर्वं सामन्याची काळजी वाटत असते.त्या पाश्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवत व शासनाच्या नियमांचे पालन करत आज शेजुळ यांनी आपल्या निवास स्थानी थांबनेच पसंत केले व जालना जिल्ह्यातील सर्व हितचिंतकांना सुद्धा घरातच थांबण्याचे व सुरक्षित राहून कोरोना थांबण्याचे आवाहन करत श्री ज्ञानेश्वर शेजुळ यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केल्याने त्यांचे परिसरात स्वागत करण्यात येत आहे.
रविवार, ३ मे, २०२०
जिल्ह्यात एकुण 1105 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 74 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 748 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 137 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1043 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 08 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 894, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 221, एकुण प्रलंबित नमुने-137 तर एकुण 674 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 16, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 421 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 00, सध्या अलगीकरण केलेल्या व्यक्ती -260, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-28, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 74, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 18, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 230 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 260 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-23, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-19, पोलीस प्रशिक्षण केंद्र-112, परतुर-08, जाफ्राबाद-6 तर भोकरदन येथे 03 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यात अडकुन पडलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत असुन दि. 1 मे, 2020 पर्यंत जालना तालुक्यामध्ये सांगली येथुन 15 व सातारा येथुन 04 असे एकुण 19 कामगार, बदनापुर तालुक्यामध्ये बीड येथुन 11 व पुणे येथुन 28 एकुण 39 कामगार, परतुर तालुक्यात सांगली येथुन 51 व कोल्हापुर 37 एकुण 88 कामगार, मंठा तालुक्यात सांगली-72 कोल्हापुर 19, व सातारा येथुन 6 असे एकुण 97 कामगार, घनसावंगी तालुक्यात सांगली-66,पुणे-36, कोल्हापुर-50 व सातारा-150 असे एकुण 302 कामगार, तर अंबड तालुक्यात बीड-28, पुणे-45,सांगली 176,कोल्हापुर-119, सातारा-354, सोलापुर-73, लातुर-2 व अहमदनगर येथुन 07 असे एकुण 804 कामगार दाखल झाले आहेत. जालना जिल्ह्यात परजिल्ह्यातुन आतापर्यंत 1 हजार 349 कामगार दाखल झाले आहेत.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 464 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 79 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 539 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 59 हजार 400 असा एकुण 2 लाख 86 हजार 208 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत https://jalna.gov.in/tofromjalna/ लिंक तर पोलीस विभागाचा प्रवासासाठी परवाना मिळण्यासाठी http://covid19.mhpolice.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असुन या मध्ये माहिती भरावी. परराज्यात व परजिल्ह्यात जाण्यासाठी दोन्ही प्रकारच्या परवानग्या आवश्यक आहेत. या परवाग्या केवळ ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाणार असल्याने कोणीही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करुन नयेत. तसेच जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंदणी करुन नये. नोंदणी केल्याचे आढळल्यास संबंधितावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.
जालना/प्रतिनिधी:- मातोश्री स्व.भुदेवी किसनराव गोरंटयाल अन्न छत्राच्या माध्यमातून गरीब व कष्टकर्यांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबवून गरजू लोकांची भूक भागविण्यासाठी चालवलेला उपक्रम कोतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राजेशभय्या टोपे यांनी येथे बोलतांना केले. कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य शासनाने प्रथम राज्यात संचारबंदी लागू केली होती.राज्य शासनाच्या या निर्णया पाठोपाठ केंद्र सरकारने देखील देशभरात लॉकडाऊनचे आदेश जारी केल्यामुळे उद्योग, व्यवसाय,कारखानदारी,अगदी छोटे मोठे व्यवसाय बंद करण्यात आले. परिणामी यासर्व व्यवसायांवर अवलंबून असलेला कामगार,मजूर, गोरगरीब,आणि कष्टकर्यांची आर्थिक अवस्था बिकट होऊन जालना शहरातील हजारो कुटुंब आणि या कुटुंबातील सदस्यांच्या दररोजच्या अन्न पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. ही बाब लक्षात घेऊन जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल आणि नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल या दाम्पत्याने जालना शहरातील गरीब व कष्टकर्यांच्या मदतीला धावून जात प्रारंभी जालना शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून पोळी भाजी,पुरी भाजी,खिचडी पुलाव वाटप करून त्यांना आधार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दि 9 एप्रिल रोजी असलेला वाढदिवस साजरा न करता कोरोनाचे संकट लक्षात घेऊन आ.कैलास गोरंटयाल यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि सहकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जालना शहरातील सुमारे 25 हजारपेक्षा अधिक गरजू कुटुंबाना अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून मदतीचा उपक्रम राबविला. संचारबंदी सह दोनवेळा लॉकडाऊन वाढविल्यानंतरही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने जालन्याचे आ.कैलास गोरंटयाल आणि नगराध्यक्षा सौ.संगीताताई गोरंटयाल या दाम्पत्याने गोरगरीब व कष्टकरी लोकांच्या अन्न पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या मातोश्री स्व.श्रीमती भुदेवी गोरंटयाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ जालना शहरात आठ दिवसापूर्वीच अन्न छत्राचा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील मंगलबाजार भागात असलेल्या मोतीबंगला येथे सुरू करण्यात आलेल्या या अन्नछत्राच्या उपक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राजेशभय्या टोपे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार कैलास गोरंटयाल यांनी पालकमंत्री श्री टोपे यांना या उपक्रमाविषयी विस्तृत माहिती देऊन शहरातील जवळपास तीन ते चार हजार गरजूंना पाकिटबंद अन्न घरपोच पुरवठा केले जात असल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्री श्री राजेशभय्या टोपे यांनी याउपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की,जालना शहरातील सामाजिक कार्यात गोरंटयाल परिवाराने सातत्याने पुढाकार घेतला आहे. उदोजक स्व.किशनराव गोरंटयाल,स्व.श्रीमती भुदेवी गोरंटयाल यांनी गोरगरिबांना नेहमीच मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन आ.कैलास गोरंटयाल व नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल यांनी सामाजिक कार्याचा हा वारसा जपला असून आज कोरोना सारख्या संकटाच्या कठीण परिस्थितीत नातेवाईक एकमेकांपासून दूर होत असतानाही गोरंटयाल दाम्पत्याने मात्र स्व.भुदेवी गोरंटयाल अन्न छत्राच्या माध्यमातून जालना शहरातील प्रत्येक भागात गरजू व्यक्तींपर्यंत अन्नाचे पाकीट पोहचवून दररोज गरजूंची भूक भागविण्याचा केलेला प्रयत्न अत्यंत कोतुकास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे उदगार पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी काढले.लॉकडाऊन संपेपर्यंत शहरातील इतर सामाजिक संघटना, त्यांचे सर्व पदाधिकारी, व्यापारी,उद्दोजकांनी अशा पध्दतीने अन्नछत्र सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा देखील श्री टोपे यांनी व्यक्त केली. यावेळी राम सावंत, शहराध्यक्ष शेख महेमुद,नगरसेवक रमेश गौरक्षक, संजय भगत, हरिष देवावाले,विनोद यादव,योगेश पाटील, योगेश भोरे,अरुण घडलिंग,गोपाल चित्राल,गणेश चौधरी, दीपक जाधव, सोनू सामलेटी, पांडुरंग शिंदे, शंकर साळवे,संतोष चांदणे, मंगल मापारे, राजू घाटेकर,किरण सगट, समाधान शेजुळआदींची उपस्थिती होती.
यानुसार अंत्योदय अन्न योजना , प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी, एपीएल केसरी शेतकरी लाभार्थी आणि उर्वरित केसरी शिधापत्रिकाधारक लाभार्थी परिमाण प्रत्येक महिन्यासाठी नियतन मंजूर करून पोहोचवण्यात येत आहे
नांदेड (भगवान कांबळे) :-पिरबुऱ्हाणनगर भागातील त्या कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला कोणामुळे कोरोनाची लागण झाली, हा प्रश्न आजही अनुत्तीर्ण आहे. असे असतांना देगलूरनाका भागातील रहमतनगर येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान रहेमतनगर परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू असून हा परिसर शहरातील चौथा 'कंटोंमेंट झोन ' होणार आहे.
रहेमतनगर येथील ही महिला काही दिवसांपूर्वी डॉक्टर लेन भागातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाली होती. उपचार सुरू असताना तिला श्वास घेण्यास त्रास होत होत होता आणि दमही लागत होता. त्या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते असे सांगितले जात आहे. त्या ठिकाणी त्या महिलेचे स्वाब घेतले असता त्याचा अहवाल आज पॉझीटिव्ह आल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान स्वब चाचणीच्या अहवालात खाजगी रुग्णालय,नांदेड असा उल्लेख असल्याने संबंधित महिला नेमक्या कुठल्या भागातील रहिवासी आहे, असा प्रश्न सुरुवातीला प्रशासनाला पडला होता. शेवटी शोधाशोध केल्यानंतर ती महिला रहमतनगर भागातील रहिवासी असल्याचे समोर आले. दुसरीकडे ती कोरोनाबाधित महिला सुरुवातीला डॉक्टर लेन भागातील ज्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती त्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या असून या रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.
रहमतनगर भागातील त्या महिलेचा अहवाल पॉझीटिव्ह आल्यानंतर हा संपूर्ण भाग सील करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर. महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...
-
मादळमोहीच्या अंखड हरीनामस सप्ताहाचीउत्साहत सांगता संपन्न. मादळमोही | प्रतीनिधी . दि.11..संत सम्राट जगतगुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्या...
-
औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव. गणेश आठवले | औरंगाबाद आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने औरंगाबादच...
-
मादळमोहित सार्वजनिक रक्तदान शिबीरास उत्षपुर्त प्रतीसाद.45 युवकांचे दानत्व मादळमोहि (हँलो रिपोर्टर .न्युज )दि.24. :- महाराष्ट्रात ...





