शुक्रवार, २९ मे, २०२०

जालना जिल्ह्यात संचारबंदी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे सुधारित आदेश जारी.






जालना दि. 29 (ब्युरोचीफ) :- कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जालना जिल्ह्यात 100 पेक्षा अधिक कोरोना विषाणुमुळे व्यक्ती पॉझिटीव्ह आढळुन आल्याने याचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच या विषाणुची साखळी खंडीत करण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दि. 28 मे, 2020 रोजी जालना जिल्ह्यातील संपुर्ण ग्रामीण,नागरी क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया सहिंता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये संचारबंदीचे आदेश जारी केले होते.  परंतु नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार करुन आज दि. 29मे, 2020 रोजी सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले असुन या आदेशानुसार खालील बाबींना सुट देण्यात आली आहे.वैद्यकीय सेवा, सर्व शासकीय व खाजगी रुग्णालये, दवाखाने, रुग्णवाहिका सर्व औषधी दुकाने, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, खत, बी-बियाणे यांची दुकाने, खत वाहतुक व त्यांचे गोदाम, तसेच कापुस, गहु, हरभरा खरेदी, अत्यावश्यक सेवांची शासकीय कार्यालये महसुल, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, ग्रामविकास, अग्निशमन, कोविड- 19 कोरोना संबंधित कर्तव्यावर असणारे अधिकारी, कर्मचारी, औद्योगिक कारखाने, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॅानिक मिडिया यांचे संपादक, वार्ताहार, प्रतिनिधी , वितरक इत्यादी, पेट्रोल पंप वितरक, कर्मचारी व त्यांची वाहने यांना या संचारबंदीधुन सुट देण्यात आली आहे. तसेच  दुध विक्रेते गल्ली, कॉलनी व सोसायट्यामध्ये घरोघरी जाऊन सकाळी 6 ते 9 या कालावधीत विक्री करावी, एका ठिकाणी थांबुन विक्री करता येणार नाही. सर्व शासकीय रास्त भाव दुकान व राष्ट्रीयकृत बँका केवळ रास्त भाव दुकानदार यांचेकडुन चलनाद्वारे पैसे भरणा करुन घेण्यासाठी, पाणी जार,
पाणीटँकर सप्लाय, परवानाधारक भाजी व फळ विक्रेते(गल्ली, कॉलनी व सोसायट्यामध्ये घरोघरी जाऊन सकाळी 6ते 9 या कालावधीत विक्री करावी, एका ठिकाणी थांबुन विक्री करता येणार नाही),  सर्व राष्ट्रीयकृत बँक – सर्व प्रकारच्या शासकीय चलान भरण्याकरिता, ऑनलाईन किराणा (फक्त घरपोहोच),  सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये त्यांचे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने.आदेशाचे पालन न करणा-या व्यक्ती, अधिकारी,कर्मचारी, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे समजण्यात येईल आणि पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक, जालना व उपविभागीय दंडाधिकारी, सर्व उपविभाग जिल्हा जालना, सर्व तालुका दंडाधिकारी जिल्हा जालना, मुख्याधिकारी सर्व नगर परिषद व नगर पंचायती जिल्हा जालना यांच्यावर राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये नमूद केले आहे.  हे आदेश दि. 31 मे रोजीच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू राहतील.

            वृत्तपत्रांना तात्काळ जाहिरातीच्या माध्यमातून पॅकेज जाहीर करा प्रेस ऑफ कॉन्सिलच्या
                                     मागणीला प्रेस क्लब जालन्याचा जाहिर पाठींबा.



जालना (प्रतिनिधी) :- कोरोना व्हायरसच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्रासह संपुर्ण भारतात लॉकडाऊन लागू केले आहे. यामुळे वृत्तपत्र मालक/प्रकाशक/संपादक यांना मोठे आर्थीक नुकसान सहन करावा लागत आहे. ज्याचा विपरीत परिणाम पुढच्या दोन वर्षापर्यंत होण्याची शक्यता आहे. प्रत्येक वृत्तपत्राला शासनाने 30 हजार चौरस सें. मी. जाहिरातीच्या स्वरूपात आर्थीक पॅकेज प्रदान करावे अशी मागणी प्रेस ऑफ कॉन्सिल महाराष्ट्र मुंबई यांनी शासन दरबारी केल्याने ही मागणी योग्य असून या मागणीला जालना प्रेस क्लबच्या वतीने जाहिर पाठींबा देण्यात आला. सध्या जिल्हा बंदीमुळे पेपर रोल, रिम, प्लेट, शाही रसायन उपलब्ध होत नसल्यामुळे सर्व वृत्तपत्र बंद पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे आर्थीक नुकसान झाले आहे. तसेच मुद्रण बंद झाल्यामुळे ग्राहक, वाचक, वार्षीक वर्गणीदारापर्यंत वर्तमानपत्र पोहचले जात नाही. वृत्तपत्राचा मोठा महसुल बुडला आहे. तरी तात्काळ मा. मुख्यमंत्री यांनी संबंधीत मागणी  मंजुर करावी कारण ते पण एक संपादक आहे. या पाठींब्याला प्रेस क्लब जालनाचे अध्यक्ष भरत मानकर, कार्याध्यक्षा आयशा खान, सचिव विष्णू कदम, जेष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, मकरंद जहागीरदार, अविनाश कव्हळे, पारसनंद यादव, लहु गाढे, महेश बुलगे, दिपक शेळके, भगवान साबळे, संतोष भुतेकर, बद्रीनारायण उपरे, बालाजी अढीयाल, अविनाश मगरे, दशरथ कांबळे, अर्पण गोयल, इलियास भाई, लियाकत भाई, मनोज पटवारी, किशोर शर्मा, विजय खताडे, अंकुश गायकवाड, सुहास कुलकर्णी, संजय भरतीया, सिताराम तुपे, प्रशांत कसबे, सुभाष भालेराव व इतर सर्व पत्रकारांनी या मागणीला पाठींबा जाहिर केला आहे. 


                     अंबड पंचायत समिती कार्यालयातील कृषी विस्तार अधिकारी राजेंद्र देशमुख 
                                          यांना पाच हजाराची लाच घेताना गजाआड.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या विहिरीच्या कामाचा धनादेश काढण्यासाठी तक्रार कडून 5 हजार रुपयांची लाच



अंबड़/अरविंद शिरगोळे :- अंबड पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी राजेंद्र देशमुख (वय 57 वर्षे) यांना आज गुरुवारी ता.28 डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या विहिरीच्या कामाचा धनादेश काढण्यासाठी तक्रार कडून 5 हजार रुपयांची लाच घेताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने देशमुख यांच्या अंबड शहरातील चांगले नगर येथील राहत्या घरी त्यांना रंगेहाथ पकडल्याने अंबड शहरात धडधडी उडाली आहे. या कारवाईमुळे पंचायत समितीचे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ चालू आहे. लॉक डाऊन मध्ये सर्व काही थांबलेले असताना लाचखोर अधिकाऱ्यांची दुकानदारी सुरूच असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की यातील अंबड तालुक्यातील खडकेश्वर येथील तक्रारदार यांनी तक्रार दिली की त्यांच्या वडिलांचे नाव असलेल्या शेतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेमध्ये विहीर खोदण्यासाठी दोन लाख 50 हजार रुपये मंजूर झाले. असून दोन लाखाचे बिल काढण्यासाठी अंबड पंचायत समितीचे कृषी विभागाचे विस्तार अधिकारी राजेंद्र विठ्ठलराव देशमुख यांनी यापूर्वी 10 हजार रुपये घेतले व उर्वरित राहिलेले 50हजार रुपयांचे बिल काढण्यासाठी आलोसेश्री देशमुख यांनी पुन्हा तक्रारदार यांच्याकडून 1 हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदार लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली सदर तक्रारीवरून आज गुरुवारी (ता.28) रोजी पडताळणी केली असता राजेंद्र देशमुख देशमुख यांनी तक्रारदार यांच्याकडे  पाच हजार रुपयाची लाचेची मागणी निष्पन्न झाली. शहरातील चांगले नगर येथे राहत्या घरी देशमुख यांनी तक्रारी कडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद वारिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबादचे पोलीस उपअधीक्षक रविंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.एस.शेख व कर्मचारी मनोहर खंडागळे, गणेश चेके, शिवाजी जमदाडे, ज्ञानदेव झुंबड, अनिल सानप, सचिन राऊत, ज्ञानेश्वर म्हस्के, चालक प्रवीण खंदारे, आरेफ़ शेख, यांच्या पथकाने ही कामगिरी पार पडली आहे अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती


                                        बुलडाणा जिल्ह्यातील तीन रुग्णांची कोरोनावर मात..!





बुलडाणा,ब्युरोचीफ दि २९:- सामान्य रुग्णालय खामगाव येथे दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये आलमपुर ता नांदुरा , जळका भडंग ता खामगाव व गोपाळ नगर खामगाव येथील रुग्णांचा समावेश आहे.  त्यापैकी आज सायंकाळी तीन रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये आलमपुर ता नांदुरा येथील २० वर्षीय युवक, जळका भडंग  येथील २५ वर्षीय पुरुष व गोपाळ नगर, खामगाव येथील ६० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. कोरोनावर मात देत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात 32 झाली आहे. मागील दहा दिवसांपासून कुठलेही लक्षण नसल्यामुळे शासनाच्या नवीन निकषानुसार या रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.सामान्य रुग्णालय खामगाव येथे रुग्णांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या हस्ते डिस्चार्ज पेपर देण्यात आला. याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अधीक्षक डॉ. टापरे उपस्थित होते.  रुग्णालयातून बाहेर पडताच रुग्णांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.  कोरोना वर मात केल्यामुळे आनंदित भावमुद्रेत रुग्ण घरी परतले. शासनाने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना घरपोच सोडले.




‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

*💥यावर्षी ‘वारी’ हेलिकॉप्टर, विमानातून; पायी पालखी सोहळा रद्द!*
-------------
पुणे: कोरोना संकटामुळे यंदाचा पायी पालखी वारीचा सोहळा रद्द करण्यात आला आहे. दिंड्यांना ही परवानगी नाकारली आहे. वारकरी आणि प्रशासनाचे एकमत झालं असून आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने पंढरपूरला देवभेटीस जाणार आहेत.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात होते. दरम्यान त्यांच्या उपस्थितीमध्ये वारीबाबत बैठक झाली. या बैठकीत पायी वारी सोहळ्याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या.  त्यानंतर आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात, असा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत दशमीला निर्णय स्पष्ट होईल.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...