शुक्रवार, २९ मे, २०२०



                     अंबड पंचायत समिती कार्यालयातील कृषी विस्तार अधिकारी राजेंद्र देशमुख 
                                          यांना पाच हजाराची लाच घेताना गजाआड.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या विहिरीच्या कामाचा धनादेश काढण्यासाठी तक्रार कडून 5 हजार रुपयांची लाच



अंबड़/अरविंद शिरगोळे :- अंबड पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकारी राजेंद्र देशमुख (वय 57 वर्षे) यांना आज गुरुवारी ता.28 डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या विहिरीच्या कामाचा धनादेश काढण्यासाठी तक्रार कडून 5 हजार रुपयांची लाच घेताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने देशमुख यांच्या अंबड शहरातील चांगले नगर येथील राहत्या घरी त्यांना रंगेहाथ पकडल्याने अंबड शहरात धडधडी उडाली आहे. या कारवाईमुळे पंचायत समितीचे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ चालू आहे. लॉक डाऊन मध्ये सर्व काही थांबलेले असताना लाचखोर अधिकाऱ्यांची दुकानदारी सुरूच असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की यातील अंबड तालुक्यातील खडकेश्वर येथील तक्रारदार यांनी तक्रार दिली की त्यांच्या वडिलांचे नाव असलेल्या शेतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेमध्ये विहीर खोदण्यासाठी दोन लाख 50 हजार रुपये मंजूर झाले. असून दोन लाखाचे बिल काढण्यासाठी अंबड पंचायत समितीचे कृषी विभागाचे विस्तार अधिकारी राजेंद्र विठ्ठलराव देशमुख यांनी यापूर्वी 10 हजार रुपये घेतले व उर्वरित राहिलेले 50हजार रुपयांचे बिल काढण्यासाठी आलोसेश्री देशमुख यांनी पुन्हा तक्रारदार यांच्याकडून 1 हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर कामासाठी तक्रारदार लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जालना येथे संपर्क साधून तक्रार दिली सदर तक्रारीवरून आज गुरुवारी (ता.28) रोजी पडताळणी केली असता राजेंद्र देशमुख देशमुख यांनी तक्रारदार यांच्याकडे  पाच हजार रुपयाची लाचेची मागणी निष्पन्न झाली. शहरातील चांगले नगर येथे राहत्या घरी देशमुख यांनी तक्रारी कडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद वारिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबादचे पोलीस उपअधीक्षक रविंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस.एस.शेख व कर्मचारी मनोहर खंडागळे, गणेश चेके, शिवाजी जमदाडे, ज्ञानदेव झुंबड, अनिल सानप, सचिन राऊत, ज्ञानेश्वर म्हस्के, चालक प्रवीण खंदारे, आरेफ़ शेख, यांच्या पथकाने ही कामगिरी पार पडली आहे अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...