रविवार, २२ मार्च, २०२०

बुलढाणा जिल्ह्यातील शहरी भागात आजपासून जमावबंदीचे आदेश जीवनाश्यक वस्तूची दुकाने वगळता जिल्ह्यातील व इतर सर्व दुकाने बंद पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकाच ठिकाणी जमाव करता येणार नाही.
बुलढाणा /प्रतिनिधी :-राज्यात  कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह सर्व शहरी भागात आजपासून ते 31 मार्च 2020 चे मध्यरात्रीपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले असून 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एका ठिकाणी जमाव करता येणार नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत.
नोवेल कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच या विषाणूचा संसर्ग होवून जीवित हानी होवू नये, या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. आजपासून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसह सर्व शहरी भागात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकाच ठिकाणी जमाव करता येणार नाही.किराणा, अन्नधान्य, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, दूरसंचार, विद्युत, पिण्याचे पाणी विक्री करणारी दुकाने, बँक व पेट्रोलपंप आदी जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने 100  टक्के बंद राहतील. शासकीय व निमशासकीय कार्यालयात केवळ 5 टक्के कर्मचाऱ्यांवर कामकाज चालेल. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील. आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये. तसेच होम क्वारंटाईनमध्ये असणारे हातावर शिक्का असणारे व्यक्ती यांनी 15 दिवस घराबाहेर पडू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीने अफवा, अपप्रचार व भिती निर्माण होईल अशी प्रतिक्रीया व्हॉट्सॲप, ट्विटर व फेसबुक आदी कोणत्याही पद्धतीने प्रसारीत करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

                 कलम 144 नुसार यावर असणार मनाई
जिल्ह्यातील खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, उरूस, जत्रा, मनोरंजनाचे कायर्क्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा. कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणूक, मेळावे, सभा, आंदोलने, मोर्चे, देशातंर्गत व परदेशी सहली. दुकाने, सेवा, आस्थापना, उपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, पब, क्रिडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा व संग्रहालये. खाजगी ट्रॅव्हल्स, बसेस, राज्य परिवहन महामंडळ बसेस, रूग्ण व अत्यावश्यक सेवेची वाहने सोडून अन्य व्यावसायिक वाहने. सर्व धार्मिक स्थळे भाविकांकरीता बंद राहतील, परंतु नित्य पुजा अर्चा 5 पेक्षा कमी व्यक्तींद्वारे सुरू राहील.

              कलम 144 यांना लागू असणार नाही
शासकीय / निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम / आस्थापना, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रूगणालये, पॅथॉलॉजी लॅबोरटरी, सर्व प्रकारचे वैद्यकीय दवाखाने, नर्सिंग कॉलेज, बँक, एटीएम व वित्तीय संस्था, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी. शासकीय धान्य गोदाम, शासकीय स्वस्त धान्य दुकाने, अत्यावश्यक किराणा सामान, जिवनावश्यक वस्तू विक्रीची ठिकाणे, दुध, भाजीपाला व फळे विक्रेते, औषधालय, दवाखाने, औषधी कंपन्या, रूग्णवाहिका, पाच पेक्षा कमी व्यक्ती एकावेळी उपस्थित राहतील असे जनावरांचे खाद्य व औषधे विक्री ठिकाण. प्रसारमाध्यमांशी संबंधीत व्यक्ती, पत्रकार तसेच प्रसार माध्यमांचे कार्यालये, पोस्ट ऑफीसेस, टेलिफोन, इंटरनेट सेवा देणारे कर्मचारी, विद्युत व उर्जा तथा पेट्रोलीयम विभागाचे कर्मचारी, पिण्याचे पाणी पुरवठा कर्मचारी. जिवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणारी वाहने (ट्रक), शासकीय / निमशासकीय कर्तव्यावर असणारे व 5 टक्के उपस्थितीचे आदेश असणारे अधिकारी / कर्मचारी.

              कोणाशी चार हात करण्यास धर्माबाद थांबलं
             धर्माबाद मधून जनता कर्फ्यू ला मोठा प्रतिसाद
धर्माबाद प्रतिनिधी (भगवान कांबळे):- कोरोना व्हायरसचा
प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार धर्माबाद  मधील जनतेने  रविवारी  जनता कर्फ्यूमध्ये उस्फुर्त सहभाग नोंदवत रविवार घरातच राहणे पसंत केले.दर रविवारी बाजार राहतो त्यामुळे गर्दीने खचाखच असणाऱ्या  मुख्य पानसरे चौक नेहरू .चौक व मूख्य रस्त्यावर आज भयाण शांतता पाहयला मिळाली.धर्माबाद शहरात व तालुक्यात 357 जण मुंबई पुणे  हैद्राबाद येथील कंपन्या मध्ये काम करण्यासाठी गेलेले नागरीक आप आपल्या गावी परत आले. व 9 जण बाहेर देशावरून माय देशी परतले व त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने धर्माबाद तालुक्यातील नागरीकाला दिलासा मिळाला आहे.  मागील पंधरा दिवसांपासून कोरोना व्हायरस च्या प्रसारामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. सदर कोव्हीड 19 व्हायरस रोखण्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. शासनाने सूचित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे.  धर्माबाद  शहरातील बहुतांश प्रतिष्ठाने दुकाने शनिवारी दूपारपासूनच बंद होती. दरम्यान रविवारी 100% धर्माबाद  बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले.शहरातील पानसरे  चौक,  बसस्थानक- रेल्वेस्थानक, फूलेनगर, शिवाजीनगर, सराफा रोड आदी ठिकाणांवर आज शुकशुकाट पाहायला मिळाला धर्माबाद  शहरातील व्यापाऱ्यांनी शनिवार सह रविवार बाजारपेठ 100% बंद ठेवले आहे. त्यामुळे सलग दोन दिवस पहिल्यांदा धर्माबाद  शहर व परिसरात अघोषित संचारबंदी सदृश्य चित्र पाहायला मिळेल. रविवारी शहरात विनाकारण रस्त्याने फिरणार्‍या तरुणांना समज देण्याचे कामही पोलिसांनी केले. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता व जनतेनी पूर्ण सहकार्य केले व पोलिसांचा तगडा बंदोबस्त धर्माबाद उपविभागीय  पोलिस अधिकारी मा.सूनील पाटील साहेब यांच्या आदेशानुसार धर्माबाद पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सोहन माच्छरे साहेब यांनी तेलंगाणा बाॅर्डर सह शहरातील चौका चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व उपविभागीय पोलीस अधिकारी सूनील पाटील  माछरे साहेब तहसिलदार शिंदे साहेब यांचे फिरतं पथक तालुक्यात व शहरात फिरत होते. यात पोलिस प्रशासनाचे सर्व कर्मचारी उन्हात उभे आहेत  म्हणुन पोलिस बांधवांना जनतेनी लिंबू शरबत  पाणी नाश्ता आसे आणि परिने अनून देऊन सोय केली व माछरे साहेब यांनी सर्वांना सुरूची जेवण दिले. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सन्नगले सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक  उजगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक कराड साहेब व सर्व पोलिस कर्मचारी बांधवांनी आप आपली भूमिका चोख बजावले त्याबद्दल पोलिस प्रशासनाचे तहसिल प्रशासनाचे ग्रामीण रूग्णालयातील डाक्टर   व नगर परिषद चे सर्व जनते कडुन स्वागत होत आहे.
                                जिल्ह्यात कलम 144 लागू  
      "जनता कर्फ्यू " 23 मार्चच्या सकाळी पाच वाजेपर्यंत वाढ.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना व दुकाने 31 मार्च पर्यंत बंद
       जालना प्रतिनिधी :- शासना करोना विषाणूचा (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून
खंड १,३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे.  जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात (कोव्हीड १९) नियंत्रण आणण्यासाठी व त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. जालना जिल्ह्यात सर्व प्रकारचे दुकाने, हॉटेल, धाबे, परमिट रूम, बेकरी, स्वीट मार्ट, चाट भांडार, इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्र कोव्‍हीड १९ उपाययोजना नियम, २०२० लागू केले आहे.
        महाराष्‍ट्र राज्याचे मुख्यमंत्री  निर्देशाने जालना जिल्‍हयातील महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळ च्‍या सर्व बसेस व खाजगी बससेवा आज दिनांक २२ मार्च २०२० रोजी रात्री १२.०० पासुन ते दिनांक ३१ मार्च २०२० रोजी पर्यंत बंद करण्‍यात येत आहे. आणि संदर्भ क्र. ६ अन्‍वये रविवार, दिनांक २२ मार्च २०२० रोजी पाळण्‍यात आलेला "जनता कर्फ्यू", मा.मुख्‍यमंत्री यांचे निर्देशान्‍वये दिनांक २३ मार्च २०२० रोजी सकाळी ०५.०० वाजेपर्यंत लागू राहील.
          जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जालना रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहीता १९७३ चे कलम १४४ नुसार संपुर्ण जालना जिल्ह्यातील क्षेत्रात ०५ किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींना एकत्र जमण्‍यास दिनांक २३ मार्च २०२० रोजी सकाळी ०५.०० वाजेपासुन ते दिनांक ३१ मार्च २०२० रोजीपर्यंत प्रतिबंध करीत आहे. तसेच प्रतिबंधात्‍मक आदेश खालील १ ते १० बाबीस लागू होणार नाहीत.  शासकीय / निमशासकीय कार्यालये (अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर कार्यालये ५% कर्मचारी सह), सर्व बँका व वित्‍तीय  सेवा व तद्संबंधीत आस्‍थापना, अन्न, दुध, फळे व भाजीपाला, किराणा पुरविणा-या आस्थापना, दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने व तद्संबंधीत आस्‍थापना, प्रसार माध्यमे, मिडिया व तद्संबंधीत आस्‍थापना,दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणा-या आस्थापना, मोबाईल कंपनी टॉवर व तद्संबंधीत आस्‍थापना,विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलिअम व उर्जा संसाधने व तद्संबंधीत आस्‍थापना,पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणा-या आस्थपाना, वरील सर्व अत्यावश्यक सेवा देणा-या संबंधातील आय. टी. आणि आय.टी.ई.एस. आस्थापना,. वरील सर्व अत्‍यावश्‍यक सेवा संबंधीत वस्‍तु आणि मनुष्‍यबळ, वाहतूक करणा-या ट्रक/वाहन (आवश्‍यक स्‍टीकर लावलेले), जालना जिल्‍हयातील उर्वरीत सर्व आस्‍थापना व दुकाने दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत बंद करणे बाबत आदेशीत करीत आहे.
       पोलीस अधिक्षक, जालना यांनी वर नमुद १ ते १० बाबीशी संबंधीत वाहतुक वगळता इतर सर्व प्रकारच्‍या वाहनास जिल्‍हयाच्‍या हद्दीत येण्‍यास प्रतिबंध करुन परत पाठवावे. या जिल्‍हयातील सर्व धार्मिक स्‍थळे, जनतेसाठी बंद राहतील परंतू सदरील धार्मिक स्‍थळी दैनंदीन प्रार्थना सुरु राहतील. त्‍याचप्रमाणे जिवनावश्‍यक वस्‍तुंची अवैध साठेबाजी व काळाबाजारी होणार नाही याची दक्षता पोलीस विभाग, पुरवठा विभाग आणि अन्‍न व औषध प्रशासन विभाग यांनी घ्‍यावी. तसेच करोना विषाणू च्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजना संदर्भात घरात अलगीकरण केलेल्‍या व्‍यक्‍तीं व त्‍यांच्‍या संपर्कात आलेल्‍या सर्व व्‍यक्‍ती यांचे वैद्यकिय निरीक्षण काटेकोरपणे करण्‍याची आणि त्‍यांना इतरांपासुन विलग ठेवण्‍याची तसेच घरात अलगीकरण केलेल्‍या संशयी‍त रुग्‍णाच्‍या हातावरील शिक्‍के १४ दिवस राहतील याची खात्री जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक व जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी,जि.प.जालना यांनी करावी.अ आदेशाचे पालन न करणा-या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था, अथवा समूह आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ तसेच भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार निक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्‍यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशानुसार कळविले आहे.


                                        (  छाया शाम गिराम सिंधीकाळेगाव )
 सिंधीकाळेगाव. (प्रतिनिधी) :- कोरोणा चा प्रादुर्भाव रोखण्या साठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यु चे अावाहण केले होते .  त्याला ग्रामीन, भागात सूद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दररोज सूसाट वाहणारा जालना नांदेड हायवेवर रविवारी अशा प्रकारे शुकशुकाट दिसून आला.

                                                                     

शनिवार, २१ मार्च, २०२०

प्रधानमंत्री मोदी यांच्या आव्हानास साथ देऊयात,जालना जिल्ह्यात ''जनता कर्फ्यु "चे अनुकरण करू या जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे
जालना प्रतिनिधी :- प्रधानमंत्री  मोदी यांच्या
आवाहनास साथ देउुया.जालना जिल्ह्यातील आपण सगळे नागरीक 'जनता कर्फ्यू'चे अनुसरण करत रविवार 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9  या वेळेत घराबाहेर पडू नये असे जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे  यांनी सांगितले आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील आवाहनाचा सारांश :कोरोना व्हायरसच्या संकटा विषयी देशाला संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, संपूर्ण जग एका खोल संकटातून जात आहे. प्रधानमंत्री श्री. मोदींनी नागरिकांना घरी राहून संयम बाळगण्याचे आणि कोरोनाव्हायरस (साथीच्या रोग) साथीच्या आजाराला शक्य तेवढे पुढे पाऊल  टाकू न देण्याचे आव्हान केले. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी सकाळी 7 ते नऊ या वेळेत सर्व नागरिकांना 'जनता कर्फ्यू'चे अनुसरण करण्याचे आवाहन केले.कोरोनाचे हे वाढते संकट,  130 कोटी लोकसंख्येच्या आणि विकासासाठी धडपडणार्या भारतासारख्या देशासाठी सामान्य घटना नाही. या जागतिक संकटावर मात करण्याचा आपला संकल्प आणखी मजबूत करावा लागेल, नागरिक म्हणून आपली सर्व कर्तव्ये पार पाडणे आणि केंद्र आणि राज्य सरकारांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे. आज आपण सर्वांनी स्वतःला संसर्ग होऊ नये आणि इतरांनाही संसर्ग होण्यापासून रोखण्याचा संकल्प केला पाहिजे.जरी असे काही देश आहेत ज्यांनी जलद निर्णय घेऊन आणि शक्य तितक्या आपल्या लोकांना दूर करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे. आत्तापर्यंत आपण कोरोना साथीच्या आजारापासून वाचवण्यासाठी ठोस उपाय शोधू शकला नाही, किंवा लसदेखील विकसित केलेली नाही.अशा परिस्थितीत काळजी घेणे खूप स्वाभाविक आहे. कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित देशांच्या अभ्यासानुसार आणखी एक बाब समोर आले आहे. या देशांमध्ये, रोगाचा प्रसार सुरुवातीच्या काही दिवसांनंतर जवळजवळ स्फोट झाला आहे. कोरोनामुळे संसर्ग झालेल्या लोकांची संख्या जगात वेगवान वेगाने वाढली आहे.भारत सरकार या परिस्थितीवर सतत नजर ठेवून आहे .हे लक्षात ठेवून, मी आपणा सर्वांना आवाहन करतो की पुढील काही आठवड्यांसाठी तुमच्या घरातून बाहेर जावू नका. शक्य असेल तर, घरातूनच आपला व्यवसाय, नोकरीशी संबंधित कामे करण्याचा प्रयत्न करा.जे लोक सरकारी सेवा, आरोग्य सेवा, लोकांचे प्रतिनिधी, माध्यम कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना बाहेर पडणे आवश्यक आहे. बाकी सर्वांनी  गर्दीपासून, समाजातील इतर लोकांपासून स्वत: ला वेगळे ठेवले पाहिजे.यासाठी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9  या वेळेत सर्व नागरिकांना 'जनता कर्फ्यू'चे अनुसरण करण्याचे आवाहन केले. 
उद्या च्या जनता कर्फ्यु चे पालन करा - बालाजी बच्चेवार माजी जि.प.सदस्य
नांदेड /प्रतिनिधी (भगवान कांबळे) :- देशाचे पंतप्रधान
नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यु च्या आव्हानाला स्वयं स्फुर्तपने प्रतिसाद देवून रविवार दि. 22मार्च लक्षात ठेवा सकाळी 7 ते रात्री 9 वाजे पर्यंत घराबाहेर न पडता सहभागी होण्याचे आव्हान भाजप नेते बालाजी बचेवार यांनी केले आहे.आपणा सर्वांना माहितच आहे की, संपूर्ण जगात 'करोना' विषाणूच्या प्रादुर्भावाने जगात हाहाकार माजविला आहे.  या जागतिक महामारीच्या समुळ उचटनासाठी आपण ही सज्ज झाले पाहिजे; यासाठी आपण सर्वजण मिळून एकत्रितपणे याचा सामना करने गरजेचे आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काल यासंदर्भात देशाला उद्देशून केलेले संबोधनही आपण ऐकलं असेलच. त्यांनी येत्या रविवारी, दि.22 मार्च रोजी 'जनता कफ़र्यू'चे ही आवाहन त्यांनी केले आहे. याबरोबरच आपण कोणती खबरदारी घ्यावी व जनता कर्फ्यु का महत्वाचा अस आहे याविषयीही त्यांनी सर्वांना संबोधित ही केले आहे.   आशा महा संकटसमयी सर्व देशवासीयांनी एकत्रित कृती करून एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजवावे, अशी आशा आहे.
त्याबरोबरच दुसरीकडे  हजारो लोक मोठी जोखीम घेऊन जनतेची सेवा सातत्याने करीत आहेत, जसे डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी, पोलिस, मीडिया बांधव, सरकारी कर्मचारी, रेल्वे आणि हवाई वाहतुकीशी संबंधित लोक  या सर्वांबद्दल दि. 22 मार्च रोजी सायं. 5 वाजता कृतज्ञता व्यक्त करावी असे मा.पंतप्रधानांनी आवाहन केले आहे.
'मी निरोगी तर माझा देश निरोगी ' हे आपण विसरता कामा नये. चला, आपण सर्वजण एकत्रितपणे संकल्प करून या. जागतिक अपतीचा सामना करू या.  सर्वांनी एक सामूहिक जबाबदारी म्हणून याचे सर्वांनी काटेकोर पणे पालन करावे असे आव्हान भाजपा नेते तथा  माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बचेवार यांनी केले आहे.
ग्रामपंचायत कार्यालय नाळविहिरा पंचायत समिती जाफराबाद यांनी दिली कोरोना विषयी माहिती.
जाफराबाद प्रतिनिधी :-नळविहीरा येथील सरपंच सौ.मिनाबाई रमेश पाटील गाडेकर  यांनी कोरोना विषयक जनजागृती केली.
या गावातील सर्व नागरिकांना आव्हान केले कि आपल्या आरोग्यासाठी आपल्याला 31 मार्च पर्यंत तरी सहकार्य करणे गरजेचे आहे.सर्वप्रथम आपल्या गावातील शाळा पुढील आदेशपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावीतसेच उद्याच्या जनता कर्फ्यु मुळे व त्यानंतरही आपण अतिशय आवश्यक काम असेल तरच बाहेर पडा बाहेरगावी शक्यतो जाऊच नका व आपल्या गावात पण एका ठिकाणी अनावश्यक गर्दी करू नका राज्यभरात कोरोना व्हायरस ची साथ पसरलेली आहे.गावातील सर्व ग्रामस्थांना याव्दारे कळविण्यात येते कि,गावामध्ये
१० लोकांपेक्षा अधिक लोकांचा जमाव करण्यात येऊ नये, शक्यतोवर गर्दी टाळावी व कोरोना व्हायरसला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खालील प्रमाणे खबरदारी घ्यावी. हि विनंती
कोरोना व्हायरसची लक्षणे :-
१) श्वास घेण्यास अडचण.
२) खोकला.
३) ताप.
४) डोकेदुखी.
५) घशात(गळ्यात) खवखव.   
६) शिंका येणे.   
७) अशक्तपणा वाटणे.
प्रतिबंधात्मक उपाय : -
 १) साबण व पाणी वापरून आपले  हात वारंवार स्वच्छ धुवावे.
२) शिकंताना व खोकलतांना
    आपल्या नाकावर व तोंडावर
    रुमालचा वापर करावा.
३) शिळे अन्न तसेच शितपेय घेऊ नये.
४) गरम पाणी प्यावे.
५) सर्दी  किंवा फ्लू  सदृश लक्षणे असलेल्या लोकांशी जवळीकचा संपर्क टाळावा.
६) घर व परिसराची स्वच्छता ठेवावे.
७) शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
आजाराची लक्षणे दिसल्यास उपायासाठी आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. पुणे, मुंबई, औरंगाबाद किंवा आपल्या देशातील कोणत्याही मोठ्या शहरातुन आलेल्या ‌प्रत्येक व्यक्ती ने खबरदारी म्हनुण शासकीय रुग्णालयात चिकीत्सा करुन घ्यावी
सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य,ग्रामविकास अधिकारी व सर्व कर्मचारी.
ग्रामपंचायत कार्यालय  नळविहीरा ता.जाफराबाद जिल्हा जालना  असे यावेळी नळविहीरा सरपंच मीनाताई गाडेकर यानी  गावकऱ्यांना  माहिती दिली

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...