शनिवार, २ मे, २०२०

         मुस्तकीम हमदुले फाऊंडेशनतर्फे 500 गरजूवंतांना
                             रेशनचे किट वाटप.


  
जालना/प्रतिनिधी:-लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर  जालना शहरात आमदार कैलाश गोरंट्याल यांच्या सुचनेनुसार मुस्तकीन हमदुले फाऊंडेशन च्या वतीने 500 गोरगरीब नागरिकांना रेशनची किट देण्यात आली. यामध्ये गहू, तांदुळ, तेल, साखर, मिरची पावडर, मसाल्याच्या पुड्या, साबन, मीठ यांचा समावेश होता.मुस्तकीन हमदुले फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक शेख शकील यांच्यातर्फे चाली ग्रुप व मुस्तकीन हमदुले  फाऊंडेशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी ही मदत वाटप केली. यावेळी नगरसेवक शेख शकील यांच्यासह सदस्य शेख वसीम, नजीर अंन्सारी, शोएब खान, शैबाज खान, अमजद खान, फहाद काझी, अजमल अंन्सारी, मुबारक बेग, शाहरूख खान, आबदे, नेहाल, अरबाज सऊद, झुलफेखार बेग, सोहल आदिंसह अनेकांची उपस्थिती होती. जूना जालना, संजयनगर, मिल्लतनगर, बाजार गल्ली यासह शहरातील विविध भागात हातावर पोट भरणारे गरीब, शेतमजूर, कष्टकरी, अपंग, विधवा महिला, निराधार, वयस्कर मंडळी, बांधकाम कामगार, बिगारी कामगार, परप्रांतिय कामगार  व सर्व धर्मीयांना सदरच्या किट वाटप करण्यात आल्याची माहिती संयोजक नगरेसवक  शेख शकील यांनी सांगितले.
--


दिलासादायक ! कोरोनामुळे मृत महिलेच्या जवळच्या संपर्कातील दोन्ही मुलांचे अहवाल निगेटिव्ह

नांदेड( भगवान कांबळे):- राज मोहल्ला परिसरातील एका ५५ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा नांदेडात गुरूवारी रात्री मुत्यू झाला.मात्र या महिलेच्या सोबत नांदेड येथे असलेल्या दोन्ही मुलांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे  वैघकीय अधिक्षक डाॅ संजय हरबडे यांनी दिली आहे .त्यामुळे  सेलूकरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. शहरातील राज मोहल्ला परिसरातील एक महिला दुर्धर आजार असल्याने उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेऊन लाॅकडाऊन मुळे औरंगाबाद येथील एका भागात राहत होती. २७ एप्रिल रोजी एका खाजगी वाहनाने ही महिला  घरी परतली होती. प्रकृती अतिशय नाजूक असल्याने सदरील महिलेला उपचारासाठी परभणी येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर या महिलेला नांदेडात हलविण्यात आले होते. तेथे त्या महिलेचा स्वॅब घेऊन चाचणी केली असता कोरोना पाॅझेटीव्ह अहवाल प्राप्त झाला होता. त्यानंतर सेलू शहरात दोन दिवसाची संचारबंदी लागू केली आहे.
दरम्यान, या महिलेच्या  सोबत नांदेडात असलेल्या दोन्ही मुलांचे स्वॅब घेण्यात आले होते. गुरूवारी रात्री या महिलेचा मृत्यू झाला असला तरी शुक्रवारी सकाळी या दोन्ही मुलांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे.  या महिलेच्या सेलू येथील कुटूंबातील १९ आणि सहवासात आलेल्या १७ आशा ३६ व्यक्तीचे स्वॅब अहवाल येणे बाकी आहे. नांदेडात महिला कोरोना पाॅझेटीव्ह आढल्याने प्रशासनाने बुधवारी रात्रीच राज मोहल्ला परिसर सील केला आहे. या परिसरातील एक हजार घरे कंनटमेंट झोन मध्ये घेतली आहेत. तसेच आरोग्य विभागाच्या २० पथकाकडून सर्व्हेक्षण सुरू केली आहे. सदरील महिलेच्या कुटूंबात १९ आणि सहवास आलेल्या १७ आशा ३६ व्यक्तीचे स्वॅब घेऊन चाचणी साठी औरंगाबाद येथील प्रयोग शाळेत पाठवले आहेत. तसेच या सर्व व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. आता या ३६ व्यक्तीचे स्वॅब अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शनिवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेऊन शनिवारी रात्री पर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे.४ हजार नागरिकांचे सर्व्हक्षण
राज मोहल्ला आणि परिसरातील ६६८ घराचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून शुक्रवारी दुपारी पर्यंत ४ हजार ४९ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे पथक या भागातील घरोघरी जाऊन लक्षणा बाबत विचारणा करत आहे.


               लाँकडाऊन मुळे चहाविक्रेत्यांना फटका

सिंधीकाळेगाव (प्रतिनिधी) :-कोरोना संसर्गजन्य विषानुमुळे संचारबंदी तसेच लाँकडाऊन असल्याने तालुक्यातील चहाच्या टपर्या बंद आहेत त्यांच्यासमोर कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचे मोठे संकट आहे एक चहा विक्रेता 1 ते 2 हजार रुपयांचा चहा विक्री करून त्याचा उदरनिर्वाह करतो. आता चहाची दुकान बंद असल्याने चहा विक्रेत्याला चांगलाच फटका बसला आहे.शहरासह तालुक्यात चहा पिणार्यांची  मोठी संख्या माञ 22मार्च रोजी जनता कफ्रर्यु आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या लाँकडाऊनमुळे चहाच्या टपर्या बंद आहेत परिणामी चहा विक्री करून कुटूंब चालविणार्या या चहा विक्रेत्यासमोर कुटूंबियांचा उदरनिर्वाह करण्याची मोठी जबाबदरी पेलण्याचे संकट उभे टाकले आहेत.दरम्यान कोरोनाचे संकट टाळण्यासाठी लाँकडाऊन महत्वाचे आहे. चहाची दुकाने बंद असली तरी त्याचा फटका आमच्यासारख्या काही चहा विक्रेत्यांना बसला आहे. माञ ही वेळ निघुन जाईल आणि पुर्वी सारखे व्यवसाय आणि उद्योग सुरु होतील. माञ त्यासाठी आपन प्रत्येकाने घरात राहुन प्रशासनास सहकार्य करावे. असे चहा विक्रेते शाम गिराम यांनी सांगितले.

पासोडी येथे जिवन आवश्यक वस्तु व सनिटाझर वाटप
जाफ्राबाद/प्रतिनिधि : पासोडी,ता:जाफ्राबाद कोरोना संकट दिवसोदिवस वाढत चालले आहे त्यामुऴे निराधार ,अपंग,विधवा व गरजु लोकांना आपले कुंटुब चालवणे अवघड झाले आहे.

यांच पार्शभुमीवर वाॅटर कप विजेता गांव पासोडी मध्ये राजपुत भामटा सामाजिक प्रतीष्टान व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातुन गावातील गरजु लोकांना जिवन आवश्यक वस्तुची कीट उपलब्ध करुन देण्यात आली तसेच संपुर्ण गावातील नागरीकांना सनीटायझरच्या बाटल्या देण्यात आल्या .या कीटमध्ये १० कीलों गहु,२कीलो तादुळ,१कीलो गोडतेल,१००ग्रॅम मसाला,१०ग्रॅम हळद, १कीलो मीठ,१ माचीस बाॅक्स या प्रमाणात वस्तु उपलब्ध करुन दील्या यावेळी सुरेश दिवटे (भाजपा तालुका अध्यक्ष) चंदनसिंग ताटु (सरपंच),प्रेमसिंग धनावत ( तंठामुक्ती समिति, अध्यक्ष) पंडित सर, देवसिंग रेकनोत, तेजनकर साहेब, विजय ताटु,कीरण व्यास,बादल बारवाल, उपस्थित होते.व हे सर्व।  किराणा वस्तू देत असतांना  योग्य अंतर ठेवून  किट  देण्यात आले व कोरोना विषयी माहिती दिली. योग्य  नविन अनोळखी व्यक्ती किंवा बाहेर गावातुन  कोणीही येऊ नाही अशी माहिती या वेळी देण्यात आली.

वाढदिवस साजरा न करता गोरगरीबांना गहू, तांदुळ, तुरताळ वाटप
जालना/प्रतिनिधी:- लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर जालना नगर पालिकेचे मा. बांधकाम सभापती श्रावण भुरेवाल यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता त्यावर होणार्‍या खर्चातून गोरगरीबांना 20 क्किंटल गहू, 
तांदुळ व तुरदाळ वाटप केली.जालना शहरातील मंठा चौफुली परिसर,अमरछाया टॉकीज परिसरात हातावर पोट भरणारे गरीब, शेतमजूर, कष्टकरी, अपंग, विधवा महिला, निराधार, वयस्कर मंडळी, बांधकाम कामगार, बिगारी कामगार, परप्रांतिय कामगारांना  गहू, तांदुळ व तुुरदाळ वाटप केली.अत्यंत शिस्तबध्द, पध्दतीने श्रावण भुरेवाल यांच्याकडून खिचडीचेही वाटप करीत असून, कार्यकर्त्यांनी जनतेसमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे. शासनाने घेतलेल्या वेळोवेळीच्या निर्णयाचे जनतेने पालन केले आहे. प्रशासनाला मदत केली आहे. घरात बसून राहिल्यामुळे अनेक कुटुंबांना मदतीची गरज होती. ही बाब लक्षात घेवून श्रावण भुरेवाल यांनी ही मदत केली आहे. यावेळी कपील भुरेवाल व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहे.

गुरुवार, ३० एप्रिल, २०२०


नांदेड च्या पहिला कोरोना बाधीत रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह तरीही मृत्यूने गाठलेच
नांदेडमधील ६४ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान अंत
नांदेड( भगवान कांबळे) :  जवळपास महिनाभर कोरोनामुक्त असलेल्या नांदेड शहरात  पिरबुऱ्हाणनगर येथील ६४ वर्षीय नागरिक कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. या बाधित नागरिकाला इतरही विविध आजार होते. या इतर गंभीर आजाराने या रुग्णाचा पिच्छा सोडला नाही. कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही गुरुवारी दुपारी दीड वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्च चिकित्सक डॉ़ निळकंठ भोसीकर यांनी सांगण्यात आले.
या ६४ वर्षीय रुग्णाच्या माध्यमातून कोरोनाने नांदेडमध्ये शिरकाव केला होता. त्यानंतर  पिरबु-हाणनगर परिसर प्रशासनाने पुर्णत: सील करीत तीन कि.मी. परिसर कंटेनमेन्ट झोन म्हणून घोषित केला होता. २०० आरोग्य कर्मचा-या मार्फत ३ कि.मी. परिसरातील ५० ते ६० हजार नागरिकांच्या आरोग्याची तपासणीही सुरु करण्यात आली.  

कोणताही प्रवास न केलेल्या या ६४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग नेमका कोणापासून झाला याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे होते. कोरोना बाधित व्यक्तीचे कुटुंबीय सदर व्यक्ती गेल्या दोन महिन्यापासून घरामध्येच असल्याचे सांगत होते. या बाधितास मधुमेह, अस्थमा आदी आजार होते. या आजाराचे उपचार  केले जात होते. मागील आठ दिवसात त्यांनी शहरातील पिरबु-हाणनगर येथे आणि सहयोग नगर येथील एका रुग्णालयात उपचारही घेतले होते.  त्यानंतर प्रकृती बिघडल्याने ते पुन्हा खाजगी रुग्णालयात गेले होते. मात्र, त्यांना सदर खाजगी रुग्णालयाने शासकिय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार २० एप्रिल रोजी ते नांदेड येथील शासकिय रुग्णालयात दाखल झाले. येथे त्यांचा तातडीने स्वॅब घेण्यात आला. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर  सदर व्यक्ती   कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले होते.  त्यानंतर सदर पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील जवळपास १४ व्यक्तींना प्रशासनाच्या वतीने क्वारंटाईन करण्यात आले होते.  त्यानंतर या सर्वांचे स्वॅब तपासणी अहवालही निगेटीव्ह आले. पाठोपाठ या रुग्णाचाही पहिला अहवाल निगेटीव्ह आल्याने नांदेडकरांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र इतर आजाराशी झुंज देत असतानाच गुरुवारी दुपारी या ६४ वर्षीय व्यक्तीचे उपचारादरम्यान निधन झाले.


      कालावधी लॉकडाऊनचा… मासळी उत्पादनाचा…!
       लॉकडाऊन कालावधीत 85.64 क्विंटल उत्पादन
शारिरीक अंतराच्या नियमाचे पालन करीत केली मासेमारी
मत्स्यव्यवसाय विकास विभागाने दिल्या 72 पासेस

बुलडाणा,प्रतिनिधी :-दि. 30 : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. शारिरीक अंतर पाळण्याच्या नियमांची वैयक्तिक आयुष्यातही अंमलबजावणी होत आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे अनेक व्यवसाय बंद झाले. त्यामध्ये मासेमारी व्यवसायाचाही समावेश होता. मात्र मत्स्यव्यवसाय विभागाने लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करीत मच्छिमार सहकारी संस्थांना मासेमारी करण्याची परवानगी दिली. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम झाला असून कालावधी जरी लॉकडाऊनचा असला तरी मासळी उत्पादनाचा असल्याचा प्रत्यय त्यामुळे येत आहे.बुलडाणा जिल्ह्यात  27 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी 30 एप्रिल 2020 पर्यंत  तलाव अथवा जलाशयांच्या ठिकाणी मासेमारी करून 85.46 क्विंटल मत्स्योत्पादन घेतले आहे. यावेळी मच्छिमारांनी लॉकडाऊनमधील पाळावयाच्या नियमांचे पालन केले आहे. उत्पादित केलेल्या मासळीची विक्रीही करण्यात आली आहे. तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या जिल्हा कार्यालयाने मासळी पकडणे, मासळीची वाहतूक करणे व विक्री करण्यासाठी 72 पासेस दिल्या आहेत. त्यामुळे मासेमारी करताना मच्छिमार संस्थांना सहजता आली.  लॉकडाऊन कालावधीत 23 मार्च ते आज 30 एप्रिल 2020 पर्यंत जिल्ह्यातील एकूण 100 तलाव अथवा जलाशयांमध्ये मच्छीमार सहकारी संस्था ठेकेदारांपैकी 27 मच्छिमार सहकारी संस्थांनी मासळीचे उत्पादन केले आहे.लॉकडाऊनच्या कालावधीत मासेमारी उत्पादन, वाहतूक व विक्री सुरू असल्यामुळे रोजगाररही उपलब्ध झाले आहेत. मत्स्यव्यवसाय विभागाने केलेल्या कार्यवाहीमुळे रोजगार उपलब्ध होवून मासळीचे उत्पादनही घेण्यात आले. असा दुहेरी उद्देश यशस्वी  झाला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनानेही घेतलेले महत्वाचे निर्णयही कारणीभूत ठरले आहे. मासेमारी करताना तलाव, जलाशयांजवळ शारिरीक अंतर, तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधण्यात आला. तसेच दाटीवाटीने गर्दी न करता मासे विक्री करण्यात आली.

असे झाले तलाव निहाय मासळीचे उत्पादन जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आज 30 एप्रिल पर्यंत विविध तलावांमधून मासळीचे सहकारी मच्छीमार संस्थांनी घेतलेले उत्पादन पुढीलप्रमाणे आहे : मांडवा ता. सिं.राजा : 2.20 क्विंटल, कोराडी ता. मेहकर :  2.53, धनवटपूर ता. मेहकर :  2.77, धानोरी ता. चिखली  :  1.10, लव्हाळा ता. मेहकर : 0.80 क्विं, नळगंगा ता. मोताळा : 12 , दहीद ता. बुलडाणा : 1, पलढग ता. मोताळा : 1.50, व्याघ्रा ता. मोताळा : 1,  धामणगांव बढे ता. मोताळा :  4, पिंप्री गवळी ता. खामगांव : 3.59, गारडगांव ता. खामगांव : 3.50, कंडारी  ता. नांदुरा : 4.50, लांजुड ता. खामगांव : 3.63, पिंपळगांव नाथ ता. मोताळा : 3, येळगांव ता. बुलडाणा : 10, धामणगांव देशमुख  ता. मोताळा : 3, गंधारी ता. लोणार : 1.17, शिवणी जाट ता. लोणार : 0.70, पिंपळनेर ता. लोणार 2.50, झरी ता. बुलडाणा : 3.50, टाकळी ता. खामगांव : 4.90, बोरजवळा ता. खामगांव : 4.10, ब्राम्हणवाडा ता. चिखली : 3, किन्ही मोहदरी ता. चिखली : 1, राजुरा ता. जळगांव जामोद :  3 आणि खळेगांव ता. लोणार : 1.65 क्विंटल उत्पादन घेण्यात आले आहे.  अशाप्रकारे एकूण 85.64 क्विंटल मासळी उत्पादन झाले आहे.
                                                            

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...