रविवार, २४ मे, २०२०
शुक्रवार, २२ मे, २०२०
विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात महाविद्यालयांना सुचना
जालना,प्रतिनिधी:- सर्व महाविद्यालय प्राचार्य, महाविद्यालये, विद्यार्थ्यांना संस्था प्रमुखांनी आपल्या महाविद्यालय, संस्थेत सन 2019-20 शैक्षणिक वर्षात प्रवेशित अनु- जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी ज्या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती तसेच विद्यावेतन योजनेचे अर्ज ऑनलाईन प्रणालीhttp://mahadbtmahait.gov.in यावर भरण्यात आलेल्या अर्जापैकी मोठ्या प्रमाणात अर्ज महाविद्यालयाचे लॉगिनवर प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.**
सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्था प्रमुखांनी सन 2019-20 शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन नोंदविलेल्या अर्जापैकी परिपुर्ण स्वरुपात पात्र अर्ज मंजुर करुन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांच्या लॉगिनवर पाठविण्यासाठी दि. 26 मे, 2020 ही अंतीम तारीख असल्याचे ऑनलाईन प्रणालीवर कळविले आहे. सदरील अर्जापैकी त्रुटीचे अपात्र मंजुर केल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित केल्या जाईल. तसेच अनुसुचित जाती, इमाव, विजाभज, विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदतीत मंजुर झाले नसल्याने शिष्यवृत्ती पासुन वंचित राहिल्यास महाविद्यालयाचे प्राचार्य पुर्णत: जबाबदार राहतील, याची गांभिर्याने नोंद घ्यावी. तसेच महाविद्यालय स्तरावर प्रलंबित व्दितीय टप्प्याची उपस्थिती नोंदवुन मंजुरी बाबत ऑनलाईन प्रणालीवर तात्काळ कार्यवाही करुन अर्ज या कार्यालयाच्या लॉगिनवर पाठविण्यात यावेत, असे आवाहन कार्यलय अधीक्षक, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी केले आहे.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या 860 नागरिकांना घेऊन विशेष रेल्वे बिहारकडे रवाना
जालना,प्रतिनिधी:- लॉकडाऊनमुळे जालना जिल्ह्यात अडकुन पडलेल्या परराज्यातील नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सोय करण्यात येत असुन यापूर्वी दोन विशेष श्रमिक रेल्वेच्या माध्यमातुन उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथील नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले आहे. आज दि. 22 मे रोजी 1400 नागरिकांना घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या सुरु झाल्याने बऱ्याचशा बिहारी नागरिकांनी या कंपनीमध्ये स्वत:हुन थांबणे पसंत केल्याने प्रवासासाठी आलेल्या 860 एवढ्या नागरिकांना घेऊन विशेष रेल्वे बिहारकडे रवाना झाली आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत अत्यंत शिस्तबद्धरितीने नियोजन करण्यात येत असुन या कामामध्ये जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था प्रशासनाला मदत करत असुन दि. 22 मे रोजीच्या विशेष रेल्वेसाठीही जिल्हा प्रशासनाने अत्यंत चोख असे नियोजन केले होते. बिहार राज्यामध्ये येण्यासाठी बिहार सरकारकडून लेखी परवानगी प्राप्त करुन घेत कामगारांच्या प्रवासाची तिकिटे आरक्षित करण्यात आली. शासनाच्या निर्णयानुसार या सर्व नागरिकांच्या प्रवासासाठी लागणाऱ्या तिकीटाचे पैसे प्रशासनामार्फत अदा करण्यात आले. जालना शहरामधून जाणाऱ्या नागरिकांना व जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये अडकुन पडलेल्या या मजुरांना जालना रेल्वेस्टेशनपर्यंत आणण्यासाठी प्रशासनामार्फत विशेष बसची सोयही करण्यात आली होती. प्रवास करणा-या मजुरांची सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातुन रेल्वे स्थानकावर आरोग्य तपासणीही करण्यात आली. प्रवाशांसाठी चालविण्यात येणा-या या रेल्वेचे पुर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात येवून प्रवास करणा-या प्रत्येकाने चेह-यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्याची खात्री करुन घेण्यात आली. रेल्वेमधुन पाठविण्यात येणा-या प्रवाशांना सोशल डिस्टसिंग बंधनकारक करण्यात आले होते. तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करुन त्यांच्यासोबत खाद्य पदार्थही देण्यात आले.यावेळी नायब तहसिलदार श्री सोनवणे, बालकामगार प्रकल्प अधिकारी मनोज देशमुख, पोलीस निरीक्षक श्री महाजन यांच्यासह महसुल, रेल्वे, पोलीस, आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.
कोरोना पार्श्वभूमीसह सर्वच पातळीवर राज्य सरकार अपयशी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या विरोधात भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन
परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर. महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...
-
मादळमोहीच्या अंखड हरीनामस सप्ताहाचीउत्साहत सांगता संपन्न. मादळमोही | प्रतीनिधी . दि.11..संत सम्राट जगतगुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्या...
-
औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव. गणेश आठवले | औरंगाबाद आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने औरंगाबादच...
-
मादळमोहित सार्वजनिक रक्तदान शिबीरास उत्षपुर्त प्रतीसाद.45 युवकांचे दानत्व मादळमोहि (हँलो रिपोर्टर .न्युज )दि.24. :- महाराष्ट्रात ...




