बुधवार, ३ जून, २०२०

                      जाफराबाद मध्ये सापडले 5 रुग्ण 
जाफराबाद :- दिनेश जाधव (ता.प्रतिनिधी):- जाफराबाद मधील आदर्शनगर येथे आढळला कोरोनाच्या रुग्ण. जाफराबाद मधील आदर्श नगर कंटेंनमेन झोन घोषित.पुढील तीन दिवस कडकडीत बंद.जाफराबाद तालुक्यात कोरोनाच्या पाचवा रुग्ण मिळाला आहे जाफराबाद येथील वॉर्ड क्रमांक 1 व वॉर्ड क्रमांक 2 या भागातील आदर्श नगर येथे हा रुग्ण आढळून आला आहे मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण एस टी महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहे,हा रुग्ण दिनांक 18,19 तारखेच्या दरम्यान नांदेड येथे काही इतर राज्यातील लोकांना  घेऊन गेला होता त्याकाळात हा रुग्ण कुठेतरी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला आहे असा प्राथमिक अंदाज व्यक्त आहे.जाफराबादेत कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे तहसील प्रशासनाने लगेच शहरातील प्रमुख लोकांची पोलीस ठाणे जाफराबाद येथे बैठक घेऊन काय काय उपाय योजना केली आहे याची माहिती दिली जाफराबाद तालुका प्रशासनाच्या वतीने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पुढील 3,4, व 5 तारखेस तीन दिवस जाफराबाद शहरात प्रशासनाच्या वतीने संचारबंदी लागू करण्यात आली आहे,ज्या ठिकाणी म्हणजेच आदर्शनगर हा पूर्ण भाग कंटेनमेन झोन म्हणून घोषित केले आहे.
जो रुग्ण आढळला त्या रुग्णाच्या जवळून संपर्कात आलेल्याना हिंदुस्थान लॉन्स येथे तर दुरदूरण संपर्कात आलेल्या व्यक्तींना जिजाऊ इंग्लिश शाळेत कॉरिनटाईन केले आहे, कॉरिनटाईन केलेल्यांची संख्या ही 11आहे तसेच त्यांचे स्वब लवकरच घेण्यात येईल असे प्रशासनाणे सांगितले आहे ,संचारबंदीत फक्त दवाखाने व मेडिकल ही अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहे तरी नागरिकांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा तहसीलदार सतीश सोनी,ए पी आय अभिजित मोरे यांनी केली आहे.

   यावेळी या बैठकीत नगरपंचायत मुख्याधिकारी पुजा दुधनाळे,तालुका वैद्यकीय अधीकारी प्रशांत टेकाळे,पी एस आय पोठरे ,नगराध्यक्ष दिपक वाकडे ,सुरेश दिवटे,सुरेश गवळी,बाळकृष्ण हिवाळे, अनिल बोर्डे,बाबुराव लहाने,प्रभु गाढे,अमोल पडघन,निवृत्ती बनसोड,विनोद हिवराळे,मोहन मुळे,गजानन उदावंत शहरातील व्यापारी,नगरसेवक,समाजसेवक,पत्रकार आदी उपस्थित होते.
                                              आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नाला यश



                                      कोरोना चाचण्यांसाठी जालना येथे आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरू 
                                             करण्यास मान्यता मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा


जालना,ब्युरोचीफ :-* कोरोना चाचण्यांसाठी जालना येथे आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी  राज्याचे आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नाला यश आले असून जालना जिल्हा रुग्णालयात ही प्रयोगशाळा सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जालना येथे कोरोना चाचण्यांची सुविधा निर्माण होणार आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे जिल्हावासियांसह मराठावाडा भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
        याबाबत सविस्तर माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, जालना येथील रुग्णांचे नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठवावे लागतात. जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता प्रादर्भाव लक्षात घेता आणि औरंगाबाद येथील प्रयोगशाळेवरील ताण पाहता जालना येथे प्रयोगशाळा होणे गरजेचे होते. त्यासाठी आता मान्यता मिळाली आहे.
        या प्रयोगाशाळेसाठी अंदाजीत खर्च सुमारे १ कोटी रुपयांच्या आसपास असून त्याला मान्यता मिळाल्याने प्रयोगशाळा उभारणीस वेग येईल. आयसीएमआरच्या निर्देशानुसार प्रयोगशाळेची निर्मिती केली जाणार असून लागणारी यंत्रसामुग्री, मनुष्यबळाची उपलब्धता करून देण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

        जालना जिल्ह्यात आरटी-पीसीआर प्रयोगशाळा सुरू होणार असल्याने कोरोना रुग्णांचे नमुने तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना तातडीने उपचार देखील मिळण्यास मोठी मदत होणार आहे. याप्रयोगशाळेमुळे भविष्यातही स्वाई फ्लू, डेंग्यू सारख्या विषाणूसंसर्ग आजारांच्या चाचण्या करण्यासाठी मदत होणार असल्याने जालना जिल्हावासियांसाठी दिलासा देणारी बाब ठरणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
         सलग अडीच महिन्यांपासून अंबरनाथ मध्ये गरजूंना मदत वंचितकडून मदतीचा ओघ सुरूच



अंबरनाथ,ब्युरोचीफ :- कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने अंबरनाथ भागात अनेक गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर दैनंदिन जीवनासाठी लागणारे साहित्य रोगप्रतिकार औषधे इतर राज्यात जाणाऱ्या मजुरांना तयार जेवण, इतर साहित्य, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. गेल्या अडीच महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ पूर्वचे शहराध्यक्ष प्रवीण गोसावी यांनी हा उपक्रम राबवला आहे.** अंबरनाथ परिसरात कामानिमित्त  येऊन तात्पुरता निवारा घेणारे कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कारखाने, लघु उद्योग बंद झाल्याने अनेक कामगार व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली होती. ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी कसेही करून त्यांच्या स्थलांतर केले. मात्र इतर कामगारांचे हाल झाले. अशा लोकांना वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ पूर्वचे शहराध्यक्ष प्रवीण गोसावी, गुंजाई फाउंडेशन, शिवराय फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पाच हजार कुटुंबांना रोगप्रतिकारक औषधांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर अन्नधान्यांचे किट, भाज्या, तयार जेवण, मास्क, स्यानेटायझरचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. तसेच जे मजूर अंबरनाथवरून त्यांच्या गावी जाण्यासाठी निघाले होते, अश्या लोकांसाठी महामार्गावर तयार जेवण, पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या विश्रांतीची सोय देखील करण्यात आली होती. गेले अडीच महिने या साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. अद्यापही अंबरनाथ भागात वंचित बहुजन आघाडीकडून गरजूंना मदत करण्यात येत असल्याचे प्रवीण गोसावी यांनी सांगितले.
               देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती बदलण्यात मोदी अकार्यक्षम - प्रकाश आंबेडकर



पुणे,ब्युरोचीफ :-  देशाची ढासळलेली आर्थिक स्थिती बदलण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकार्यक्षम असून नेमके काय करायला पाहिजे जेणेकरून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल, हेच कळत नसल्याने केंद्र सरकार त्रस्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मार्फत येणार्‍या अफवांना बळी पडू नका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
      जागतिक संघटनेने भारताला पूर्णपणे कंगाल म्हणून घोषित केले आहे. तशीच परिस्थिती चीनची झाली आहे म्हणून लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देता देता यांच्या नाकी नऊ आले आहे. चीन आणि भारत या दोघांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. कोरोना पसरविला म्हणून चीनवर जगभरातून आरोप केला जात आहे. तर भारतात कोरोनाची परिस्थिती कशी हाताळावी हे पंतप्रधान मोदी यांना कळत नाही म्हणून देशातील आर्थिक व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. दोघांनाही त्यांच्या देशातील लोकांना फसवायचे आहे आणि म्हणून जशी गावांमध्ये लुटुपुटूची लढाई होते तशाच पद्धतीने चीनचे अध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान या दोघांची लुटूपुटूची लढाई सीमेवर सुरु झाली आहे. कधी लडाख तर कधी आसाम  तर कधी सिक्कीम, अरुणाचल प्रदेश मध्ये ही लढाई दिसून येते. दोन्ही देशांची परिस्थिती अजून ही युद्धा सारखी झालेली नाही, किंवा दोन्ही देश युद्ध करू शकतात अशी परिस्थिती नाही. त्यामुळे भाजप आणि आर.एस.एस यांनी जो खेळ चालवलाय की चीनकडून आपल्याला धोका आहे. तर त्यांच्या अफवांना बळी पडू नका. मात्र चीनकडुन भारताला धोका निश्चित आहे. पण ते वेगळ्या कारणांमुळे, दोन्ही देश ढासळलेल्या आर्थिक परिस्थिती मुळे त्रस्त झाले असून आर्थिक स्थिती कशी सुधारावी हे या लोकांना कळत नाही. त्यामुळे दोन्ही देश त्रस्त झाले आहेत, त्यामुळे त्यांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे  यांनी दिली.

              गरजूंना अन्नधान्याची मदत तर लाईट बिल माफ करण्यासाठी वंचितकडून निवेदन.



बीड,ब्युरोचीफ :- कोरोना काळात लॉक डाऊन असल्याकारणाने अनेकांना आपल्या गावी स्थलांतर करावे लागले. शिवाय काम बंद झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अशा लोकांना बीड, गेवराई मधील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अन्नधान्याचे किट तसेच मास्कचे वाटप केले. त्याच बरोबर गेवराई मध्ये मागील तीन महिन्यांचे वीज बिल माफ करावे म्हणून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की गरजू लोकांना शक्य ती मदत करण्यात यावी, त्याच बरोबर महामार्गावरून गावी जाणाऱ्या लोकांना जेवण, पाणी आणि विश्रांतीची सोय करण्यात यावी. या आवाहनाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बीड मधील गेवराई तालुक्यातील कार्यकर्त्यांनी ही प्रतिसाद देत महामार्गावर अन्नदान केले, शिवाय लॉकडाऊन असल्याने गरजूंना अन्नधान्याचे कीट आणि मास्कचे वाटप करण्यात आले. वंचितचे गेवराई तालुका अध्यक्ष सय्यद सुभान यांनी हा उपक्रम राबवला असून तालुक्यात अनेकांकडे लाईट बिल भरायला पैसे नाहीत म्हणून गेल्या तीन महिन्याचे लाईट बिल माफ करण्यात यावे, यासाठी गेवराई तहसीलदार प्रशांत जाधवर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष सय्यद सुभान, युवक तालुकाध्यक्ष बंटी सौंदरमल, सतीश प्रधान, सुधाकर केदार, शरद खापरे उपस्थित होते.
                                   परतूर तालुक्यातील दुधना नदीपात्रातून अवैध वाळु वाहतूक.



परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
परतूर ठाणे अंतर्गत रोहीना येथून दुधना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक उत्खनन करून परतुर रोहीना मार्गी ट्रॅक्टर व हायवाने सुरू आहे मात्र याकडे परतुर महसूल विभागाचे दुर्लक्ष दुसून येत आहे नदीपात्रातून दिवस रात्र अवैध वाळू उत्खनन व चोरी करून वाळू माफिया मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक केली जात आहे,या वाळू भरलेल्या ट्रक, ट्रॅक्टरची सर्रासपणे वाहतूक सुरू असून वाळू माफियांवर कुठलेच कार्यवाही केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे त्या मुळे वाळू माफिया याचा फायदा घेत असल्याचे दिसून येते तालुक्यातील रोहिना, मसला, डोलारा,बाबूलतार, दुधना पत्रातून दररोज दिवस रात्र सुमारास १० ते 15 ट्रक व ट्रॅक्टर ने अवैध वाळू वाहतूक करून विक्री केली जात आहे,अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक करून देण्या साठी सबकूच मॅनेज असल्याची चर्चा या परिसरात आहे,त्या मुळे दररोज सुमारास १५ ते २० ट्रॅक्टर व हायवा ने अवैध वाळू वाहतूक सुरू असताना कुठलीच कार्यवाही केली जात नसल्याची माहिती आहे,त्यामुळे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी धाड टाकून वाळू माफियांचे मुस्के आवळण्याची गरज आहे
                 शेतकरी गटांनी बांधावर खत वाटपासाठी घेतला पुढाकार कृषी विभागाच्या पुढाकारातून
                                                     3 हजार शेतकरी गटाची स्थापना.

नांदेड (भगवान कांबळे )  :- खरीप हंगाम लक्षात घेता कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात शेतकऱ्यांची खते-बियाण्यांसाठी शहरात गर्दी होऊ नये म्हणून शेतकरी गटांनी हे साहित्य एकत्रित खरेदी करुन शेतकऱ्यांना ते थेट बांधावर उपलब्ध करुन देण्याचा सुरक्षित मार्ग अवलंबिला आहे. कृषि विभागाच्या पुढाकाराने खते व बियाणांचे प्रातिनिधिक वाटप गुंडेगाव येथे आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बांधावर करण्यात आले.
यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव, कृषि अधिकारी सुनिल सानप, कृषि सहाय्यक चंद्रकांत भंडारे, गुंडेगावचे पोलीस पाटील भगवान हंबर्डे, नामदेव हंबर्डे व निवडक शेतकरी उपस्थिती होते.
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटामार्फत खते-बियाणे खरेदी केल्यास आर्थिक बचतीसह कोरोनाच्या संसर्गापासून त्यांना दूर राहता येईल' असे याप्रसंगी आमदार मोहन हंबर्डे म्हणाले.  उपविभागीय कृषि अधिकारी श्री सुखदेव यांनी शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रयोग, बिजप्रक्रिया, बियाणे निवड, खरीप हंगाम पूर्व तयारी याविषयी मार्गदर्शन केले.
गुंडेगावचे कृषि सहाय्यक चंद्रकांत भंडारे यांनी माती, पाणी परिक्षणाचे महत्व विषद केले व शेतकऱ्यांनी मृद तपासणी करुनच पिकांची लागवड करावी असे सांगितले.
कोरोना संकटापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करुन शेतकऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कृषि सहाय्यक श्री. भंडारे यांनी आभार मानले.

नांदेड जिल्हयात सुमारे 3 हजार शेतकरी गट स्थापन करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला. आतापर्यंत 1 हजार 53 गटांनी 8 हजार 100 टन खते आणि 3 हजार 300 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवले आहेत. या गटांना कृषि विभाग सहाय्य करीत आहे. शेतकऱ्यांच्या वाहतुकीच्या खर्चात यामुळे बचत होण्यास मदत होत आहे. मोठ्या प्रमाणावर एकत्रित खरेदी केल्यामुळे किंमतीमध्ये बचत होत असून सध्या बाजारात मुबलक खते आणि बियाणे उपलब्ध आहेत.  चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...