गुरुवार, १८ जून, २०२०

उदगीर ग्रामीण पो.स्टेशनच्या हद्दीत  दावणगाव  कुमदाळ शिवारात अढळला अर्धवट जळालेला मृतदेह


  उदगीर: ता. प्रतिनीधी (जीवन भोसले) हँलो रिपोर्टर
प्राथमिक मिळालेली माहीती असी कि, उदगीर तालूक्यातील  दावणगाव व कुमदाळ (हेर)  शिवारात  एका 25 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह अढळला असून  ही माहीती दावणगाव येथिल पो. पाटील भदरशेट्टे यांना मिळाली असता त्यांनी उदगीर पोलीसांना सदर घटनेच्या संदर्भात माहीती दिली .
उदगीरचे पोलीस उपविभागीय अधिकारी मधुकर जवळकर  व ग्रामीणचे पोलीस निरीक्षक  दिपककूमार वाघमारे  व त्यांच्या टिम ने तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला . सदर मृतदेह मोठ्या प्रमानात जळाल्या मुळे त्याची ओळख  पटली नाही ,सदर घटनेचा पंचनामा सुरू आहे.
दावणगाव ते करखेली जाणारा  रोडलगत  दावणगाव कुमदाळ हेर, शिवारात  25 वयोगटातील इसमाचा कोणीतरी  अनोळखी व्यक्तीने   मारून टाकुन, त्याला जाळले आहे, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने  त्याला या ठिकानी टाकला आहे. अनोळखी मृतदेह आढळल्याची  फिर्याद दिली असता  त्याचा   पुढील तपास  चालु   आहे असे ग्रामीण पो. स्टेशनचे  पोलीस निरीक्षक दिपककुमार  वाघमारे यांनी सांगीतले.


जालना जिल्ह्यातील उप विभागीय अभियंता दूरसंचार कार्यालय परतूर येथे लॉकडाऊनचे निमित्त करून ३ महिन्यापासून कामात हलगर्जीपणा केल्यामुळे यांच्यावर  कारवाई करावी - प्रकाश सोळंके




जालना,ब्युरोचीफ :- जालना जिल्ह्यातील, परतुर दूरसंचार कार्यालयातील उप विभागीय अभियंता तीन महिन्यापासून हेडकॉटरला थांबत नाहित, यामुळे शासकीय कार्यालयातील नेटवर्क कनेक्शन बीएसएनएलच्या असल्यामुळे कामकाज ऑनलाईन काम करतांनी अनेक वेळा अडथळे निर्माण कामकाजात विलंब होत असल्यामुळे जनतेचे व शासकीय ऑनलाइन काम करणाऱ्यांचे  मोठे नुकसान होत आहे, या दूरसंचार यंत्रणेचा आहे खासगी दूरसंचार कंपन्यांचे काही आर्थिक संबंध आहे का ? अनेक वेळा दूरसंचार चे ग्राहक ऑफिस मध्ये जाऊन बीएसएनएल सेवेबद्दल तक्रार केल्यास स्थानिक उपलब्ध असल्याने अधिकारी सिम कार्ड दुसऱ्या कंपनीचा घ्या असे स्पष्ट उत्तर देतात, याचीसुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे, अनेक वेळा बीएसएनएल रेंज नसते, खाजगी कंपन्या जेवढे सेवा देण्यासाठी सतर्क राहतात तेवढे बीएसएनएल अधिकारी सेवा देण्यास निष्काळजीपणा करतानी दिसत आहे, केंद्र सरकार दूरसंचार यंत्रणेवर एवढा मोठा खर्च करीत आहे, परंतु दूरसंचार अधिकारी याचा गैरफायदा घेऊन दूरसंचार वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिशाभूल करीत आहे, 


परतूर येथील उपविभागीय दूरसंचार अधिकारी व त्यांची यंत्रणा सतत गैरहजर असल्याने बीएसएनएल सेवा अनेक वेळा खंडित होऊन बीएसएनएल ग्राहकांना खूप मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो, परतुर येथील दूरसंचार अधिकाऱ्यांना दूरसंचार विभागाने राहण्यासाठी कॉटर्स उपलब्ध करून दिलेले आहेत, परंतु हे कोर्टस नुसते नावाला असून याठिकाणी अनेक दूरसंचार अधिकारी हेडकॉटर थांबत नसून औरंगाबाद याठिकाणी जाणे-येणे करतात, या तीन महिन्यात ते कार्यालयात दोन किंवा तीन वेळा आले असतील, बाकी ते कोठे काम करतात हा खरा चौकशीचा विषय आहे, परतुर येथील उपविभागीय दूरसंचार कार्यालयातील परिसरात कोठेही सी सी टीव्ही कॅमेरे लावल्याने नाहीत, कारण सीसीटीव्ही कार्यालयात असल्यास कोण कामावरती येऊ आपले कर्तव्य पार पाडीत आहेत हे कॅमेरा कैद होईल म्हणून या ऑफिसमध्ये सी सी टीव्ही कॅमेरे नाहीत.*
जालना जिल्ह्यातील परतुर येथील दूरसंचार उपविभागीय अधिकारी यांच्यासह यांची यंत्रणा कामात हलगर्जीपणा करीत, तीन महिन्यापासून कार्यालयात अनेक वेळा हजर नसल्यामुळे यांच्यावर कारवाई करण्यात अशी मागणी
मनसे जिल्हाध्यक्ष जालना प्रकाश सोळंके यांनी निवेदनात म्हटले आहे.
               


                                        

प्रकाश आंबेडकरांनी अरविंद बनसोडच्या कुटुंबियांची घेतली भेट!


न्यायालयीन लढाईत आम्ही सोबत


नागपूर,ब्युरोचीफ :- अरविंद बनसोड हत्याप्रकरणी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शिवाय आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी वकिलांशीही भेटून चर्चा केली.उच्चशिक्षित अरविंद बनसोड यांची हत्या 27 मे रोजी नागपूरमध्ये करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच पोलिसांची भूमिकाही संशयास्पद होती. राज्यभर गाजलेल्या या हत्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आवाज उठविला. राज्यभर निषेध करण्यात आले. सरकारला इशारा देण्यात आल्यानंतर या प्रकरणात कारवाई करीत अटकसत्र सुरू करण्यात आले. आज आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता. यावेळी अरविंद बनसोडचे कुटुंब या ठिकाणी उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या आवारातच अरविंदच्या कुटुंबीयांची आणि वकिलांची भेट घेऊन चर्चा केली. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी काय  प्रयत्न करता येतील, ते केले जातील असे आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिले.राज्यात मागासवर्गीयांवर हल्ले वाढत असून त्याच्या विरोधात बुधवरी राज्यभर वंचित बहुजन आघाडी तर्फे जिल्हा,तालुका स्तरावर  निवेदने देऊन या सरकारचा निषेध करण्यात आला.  हे हल्ले थांबले नाही तसेच सर्व प्रकरणात योग्य ती कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

बुधवार, १७ जून, २०२०

मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने शिला संतोष मोरे यांची अमरावती महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड


अमरावती,ब्युरोचीफ :- मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने शिला संतोष मोरे यांची अमरावती महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.हि निवड मानवहित लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सचिन साठे साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली.महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सौ रंजनाताई बलसाने यांच्या नेतृत्वाखाली शिला संतोष मोरे यांची अमरावती महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.व पक्षाच्या वतीने त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा. देण्यात आल्या.

खासगी आस्थापनांनी कौशल्य विकास विभागाच्या पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन


जालना,ब्युरोचीफ :- कोरोना प्रार्दुभावामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय व इतर जिल्हयातील कर्मचारी,मजुर,कारागीर स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे औद्योगीक क्षेत्रातील आस्थापना,खाजगी आस्थापना  खाजगी स्थानीक बेरोजगार युवक युवतींना  नौकरीची संधी प्राप्त होणार असल्यामुळे अशा बेरोजगारासाठी औद्योगीक क्षेत्रातील आस्थापना, खाजगी आस्थापना यांनी  त्यांना  लागणा-या मनुष्यबळासाठी विभागाच्या - वेब पोर्टलवरील सुविधाचा लाभ घ्यावा या साठी आस्थापनांनी www. mahaswayam.gov.in या पोर्टल वर नोंदणी  करुन प्राप्त होणा-या युझर  ID व पासवर्ड चा  वापर करुन त्यांच्या कडील रिक्त पदे अधिसुचीत करुन पात्र बेरोजगाराची यादी प्राप्त करुन घेवून पात्र रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दयावी. तसेच ज्या आस्थापनांनी यापुर्वीच नोंदणी केलेली आहे त्यांनी वरील पोर्टलचा लाभ घ्यावा. विभागाच्या पोर्टलवरुन रिक्त पदे अधिसुचीत करणे, शैक्षणिक पात्रतेनुसार कुशल मनुष्यबळाबाबतची माहिती तसेच रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमाअतर्गत रिक्त पदे अधिसुचित करणे व आस्थापनातील मनुष्यबळाची माहिती भरणे (ER -1) इ. सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच www.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर रोजगारासाठी इच्छुक सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांची नोंदणी करण्यात येते. त्या मध्ये नोंदणी कृत उमेदवाराचे नांव, पत्ता, शैक्षणिक पात्रता, ईमेल व मोबाईल नंबर इत्यादीची माहिती आस्थापनांना  प्राप्त होऊ शेकते.
ज्या सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त करावयाची आहेत अशा उमेदवारांनी EMPLOYMENT या  OPTION वर क्लिक करुन वरील संकेत स्थळावर नोंदणी करावी तसेच ज्या उमेदवारांनी नोदणी आधार लिंक केली नाही त्यांनी नोंदणी आधार लिंक करावी. सदर नोंदणी ही विनामुल्य आहे.आस्थापना व उमेदवारांना नोंदणी बाबत काही अडचण असल्यास त्यांनी जिल्हा कौशल्य, विकास रोजागर व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना येथील दुरध्वनी क्रमांक 02482 - 225504 वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य, विकास रोजागर व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.          


सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या 12 व्यक्तींवर कारवाई


जालना,ब्युरोचीफ :- सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करता फिरणा-यांवर पोलीस प्रशासन व नगर परिषदेमार्फत दि. 17 जुन 2020 रोजी संयुक्तरीत्या एकुण 12 व्यक्तींवर कारवाई करत 4 हजार 800 रुपयांचा रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे पोलीस ठाणे सदर बाजार येथे एक गुन्हा दाखल करण्यात आला असुन 79 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  कोरोना व्हायरस (COVID – 19)ला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांबरोबरच सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व दुकानदार यांनी आपल्या दुकानात येणा-या ग्राहकामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची दक्षता घ्यावी. दुकानासमोर विशिष्ट अंतरावर चुन्याने मार्कींग करुन घ्यावी. दुकानात कुठल्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असेही पोलीस प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे. 


जिल्ह्यात सात व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर सात रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना,ब्युरोचीफ :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन राममंदिर परिसर, जाफ्राबाद येथील -1, जालना शहरातील संभाजीनगर परिसरातील-1, लक्कडकोट परिसरातील-1, मोदीखाना परिसरातील-1 लक्ष्मीनारायणपुरा परिसरातील-3, असे एकुण 7 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे तर दि. 17 जुन 2020 रोजी जालना शहरातील समर्थनगर परिसरातील 1,  राज्य राखीव पोलीस दलातील 1 जवान, जिल्हा सामान्य रुग्णालयातील 1 डॉक्टर, भाग्यनगर  परिसरातील 1, जामवाडी ता. जालना येथील 1, नानक निवास जालना येथील 1, आदर्श नगर जाफ्राबाद येथील 1 अशा एकुण 7 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.जामवाडी ता. जालना येथील रहिवासी असलेला 60 वर्षीय पुरुष रुग्ण चार ते पाच दिवसांपासुन आजारी होता. त्याने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र त्याची तब्येत गंभीर झाल्यामुळे त्यास शहरातील एका खाजगी रुग्णालयात दि. 16 जुन 2020 रोजी आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी संबंधित रुग्ण गंभीर असल्यामुळे त्याला सामान्य रुग्णालयात संदर्भित (Refer) केले. संबंधित रुग्णास दि. 16 जुन 2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. ताबडतोब त्यांच्या लाळेचा नमुना घेऊन प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल दि. 17 जुन 2020 रोजी प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–3492 असुन सध्या रुग्णालयात -97, व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती -1321, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–161, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -4202, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने–7 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -316, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -3759, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-399, एकुण प्रलंबित नमुने -123, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1215.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–11, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती –1119,आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-14, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-315, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत–23,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 97, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-128, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-7, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -192, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 110, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या -05, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 8754, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 09एवढी आहे.  कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण -315 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये : - पोलीस प्रशिक्षण केंद्र–98, मोतीबाग शासकीय मुलींचे वसतिगृह -25, संत रामदास वसतिगृह जालना-30, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना- 23, मुलींचे शासकीय निवासी वसतिगृह जालना- 35, मुलींचे शासकीय वसतिगृह भोकरदन -2,             डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड – 8, शासकीय मुलींचे वसतिगृह अंबड-36, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापुर- 14, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी – 2, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह घनसावंगी-6, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह इमारत क्र.2 भोकरदन- 13, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद- 12, हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-8, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना – 3.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 169 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 821 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 825 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 33 हजार 430 असा एकुण 3 लाख 60 हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...