शनिवार, २७ जून, २०२०

प्रकाश आंबेडकरांवर टीका करणाऱ्याला वंचितचा दणका,गावकाऱ्यांसमोर मागितली माफी

लातूर,ब्युरोचीफ :- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबूक च्या माध्यमातून टीका करण्यात आली होती. मसलगा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर या ठिकाणी राहणारा प्रवीण जाधव या तरुणाने  फेसबुकवर बाळासाहेबांबद्दल वादग्रस्त टीका केली होती. याची माहिती मिळताच लातूरचे वंचित बहुजन आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष युवराज योगी यांनी संबंधित तरुण राहत असलेल्या गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी संपर्क साधला. पोलीस पाटील, सरपंच त्या मुलाचे वडिल या व्यक्तींना फोनवरून घटनेची माहिती दिली. गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळींनी प्रवीण जाधवला गावासमोर बोलावून घेतले. गावातील लोकांनी प्रवीण जाधवला जाब विचारून व्हिडिओ तयार करून माफी मागायला सांगितली. फेसबूकच्या माध्यमातून जी टीका केली त्या गावचे पोलीस पाटील सरपंच आणि सर्व गावातील मंडळीं समोर प्रवीण जाधव याने व्हिडिओ तयार करून बाळासाहेबांची माफी मागितली. लातूरच्या सर्व कार्यकर्त्यानी फेसबुकवर बाळासाहेबांच्या विरोधात पोस्ट पाहिल्यानंतर रात्रभर प्रवीण जाधवची माहिती घेऊन सकाळी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना याची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कारवाईला सुरवात केली, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच प्रवीण जाधव आणि गावकऱ्यांनी माफी मागितल्याने या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला. लातूर निलंग्यातील वंचित बहुजन आघाडी तसेच भारिप बहुजन महासंघाचे सर्व कार्यकर्ते यांनी या मुजोर प्रवीण जाधवला धडा शिकवला.


उपचारास डॉक्टरांचा नकार, वंचितचे स्वखर्चाने केली मदत


परभणी,ब्युरोचीफ :- हात व पाय मोडलेल्या अवस्थेत डॉक्टरांची मदत मागणाऱ्या दोन महिलांना कोणीही मदत करीत नाही. या महिला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदतीची याचना करतात पण कोणीही त्यांना मदत करायला पुढे येत नाही. अश्यातच वंचितच्या कार्यकर्त्यांना याबाबत फोन येतो. माहिती मिळते आणि काही मिनिटातच कार्यकर्ते हॉस्पिटल मध्ये धाव घेऊन या महिलांना सर्वोतोपरी मदत करतात. हा सर्व प्रकार परभणी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात घडला असून अनेकांनी माणुसकी सोडली असली तरी वंचितच्या कार्यकर्त्यानी केवळ एका फोनवर रुग्णालयात येऊन मदत केली. आजही माणुसकी जीवंत असल्याचे वंचितच्या कार्यकर्त्यानी दाखवून दिले.


वंचित बहुजन आघाडी भटके विमुक्तचे राज्य समन्वयक डॉ. धर्मराज चव्हाण यांना माहिती  मिळाली की दोन महिलांना डॉक्टरची मदत हवी आहे, एका महिलेचा पाय तर दुसऱ्या महिलेचा हात मोडला असून या दोन्ही महिलांना कोणीही मदत  करायला तयार नाही. टाकळी येथील मातंग समाजाची महिला हात मोडलेल्या अवस्थेत रुग्णालयाबाहेर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदत मागते डॉक्टरही तिला मदत करीत नाही.  तोपर्यंत वंचितचे कार्यकर्ते धर्मराज चव्हाण  सिद्धार्थ कांबळे, संपत नंद, अरुण गिरी, अशोक चंद्र मोरे, बी. आर. आव्हाड हे रुग्णालयात येतात त्या महिलेला कोरोना आहे की नाही याची काळजी न करता संबंधीत महिलेला रुग्णालयात दाखल करून तिच्या उपचाराचा सर्व खर्च स्वतः करतात. दुसऱ्या महिलेचा पाय मोडल्याने तिलाही मदत करून सर्व खर्च वंचितचे कार्यकर्ते करतात. दुसऱ्या दिवशी डॉ. धर्मराज चव्हाण व कार्यकर्त्यानी रुग्णालयात दोन्ही महिलांना भेट देऊन त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. शिवाय त्यांना आर्थिक मदतही केली. ही मदत तुम्हाला बाळासाहेबच्या वंचित बहुजन आघाडीने केली आहे,असे सांगितल्यावर त्या महिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते...


जिल्ह्यात 37 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर 16 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना,ब्युरोचीफ :- शहरातील खडकपुरा परिसरातील 06, सुवर्णकार नगर परिसरातील 04, मंगळबाजार
01,खरपुडी नाका 01, जिल्हाधिकारी कार्यालयातील 01, राजेंद्र प्रसाद रोड, बडी सडक 01, भोकरदन शहरातील 02, अशा एकुण 16 रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला तर श्री कॉलनीतील 07, गुडलागल्ली 05, कृष्णकुंज 01, दानाबाजार 02, जुना जालना 01, मंगळबाजार 01, कोष्टी गल्ली 1, कडबी मंडी 1, माऊलीनगर 01, बगडीया नगर 01, बागवान मस्जिद 01, कोठारी नगर 01,वाटुरफाटा येथील 01,  जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील 12, रोकडा हनुमान परिसर भोकरदन 01 अशा  एकूण 37  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण–3941 असुन  सध्या रुग्णालयात-117,व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-1520, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–109, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या -5005, एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने–37 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-462, एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-4429 रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-408 एकुण प्रलंबित नमुने-110, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1390.14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–18, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती –1252, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-38, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-239, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-22, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-117, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-55, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-16, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-317, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या -123, तर संदर्भित रेफर केलेली रुग्ण संख्या-09, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-11815, तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 13 एवढी आहे. आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 239 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे प्रमाणेःपोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-02,शासकीय मुलींचे वसतिगृह  मोतीबाग जालना_08,संत रामदास वसतिगृह जालना-36,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जालना-18, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह जालना-37, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय जालना-18,मॉडेल स्कूल परतुर-05,डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अंबड-01, शासकीय मुलींचे वसतीगृह अंबड-10,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-03,मुलींचे शासकीय वसतीगृह भोकरदन-03, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी -02,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह भोकरदन इमारत क्र 02-16, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -00,हिंदुस्थान मंगल कार्यालय जाफ्राबाद-09,जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद 00, जे बी के विद्यालय टेंभुर्णी 28, शेठ इ बी के विद्यालय टेंभुर्णी 30, ज्ञानसागर विद्यालय जाफ्राबाद 13. लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत - 171 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन 886 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 828 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली  4 लाख 17 हजार 630 असा   एकुण 4 लाख 44 हजार 438 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  


पेट्रोल - डिझेल दर वाढ विरोधात काँग्रेस पक्षाचे सोमवारी आंदोलन


जालना (प्रतिनिधी) :- अखिल भारतीय काँगे्रस कमिटीच्या वतीने श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचा वाढविलेला दर मागे घेण्यासाठी देशभरात आंदोलन पुकारण्यात आले आहे. या अनुषंगाने दि. 29 जून सोमवार रोजी सकाळी 11. 30 वा. जुना जालना गांधी चमन येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली आहे.केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे अन्यायकारक दर वाढविल्यामुळे त्याचा माल वाहतूकीवर मोठा परिणाम होऊन जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे. आणि प्रत्येक क्षेत्रात महागाई वाढली आहे. यामुळे जनसामान्याचे सगने कठीण बनले आहे. केंद्र सरकारने इंधन दर वाढ ताबडतोब मागे घ्यावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे आजी-माजी प्रदेश पदाधिकारी, माजी जिल्हाध्यक्ष, जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. कैलास गोरंट्याल, आ. राजेश राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमूद, गटनेते गणेश राऊत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, राम सावंत, राहुल देशमुख, विमलताई आगवाले, विजय जर्‍हाड, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, आनंद लोखंडे, गुरूमीतसिंग सेना, शेख शमशु आदी पदाधिकार्‍यांनी केले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.


जालना,प्रतिनिधी :- राष्ट्रवादी भवन जालना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी मा.नंदकिशोर जांगडे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तसेच राजेंद्र जाधव युवक शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ज्ञानेश्वर धानोरे , (उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस)  दशरथ तोडुळे, कुणाल शिरसागर , प्रा .शिंदे सर आदी उपस्थित होते


समाजभान नावाने फेसबूक आयडी तयार करून पैसा लुटणार्‍याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी

जालना (प्रतिनिधी):- सामाजिक कामासाठी समाजभान नावाने विविध फेसबूक आयडी तयार करून ऑनलाईन पध्दतीने पैसा गोळा करण्याचे काम केले जात असून संबंधीतांविरूद्ध कारवाई करण्यात यावी अशी तक्रार पोलिस निरिक्षक अंबड, व पोलिस अधिक्षक जालना, सायबर क्राईम, जालना यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, देशाला लागलेला महारोग भ्रष्टाचार रोखण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून विविध पध्दतीने जनजागृतीद्वारे आम्ही प्रयत्न करीत आहोत. भ्रष्टाचार करण्याच्या विविध पध्दती आहेत हे आम्हाला समाजभान नावाने लक्षात आले. दादासाहेब थेटे हे शिवाजी प्राथमिक शाळा, इंदिरानगर झोपडपटटी पाण्याचे टाकी खाली शाळेत शिक्षक आहेत मी पण एक शिक्षक असून शाळेच्या गुणवत्ता करिता मुलींच्या शिक्षणाकरिता, शिक्षकांचे प्रशिक्षण, योगाभ्यासाचा प्रचार आणि प्रसार, विविध शासकीय उपक्रम राबवून आदर्श काम उभे केले आहे. तसेच सर्व राष्ट्रीय उपक्रमांत प्रशासकीय आदेशान्वये अनेक उपक्रम राबविले आहेत. सामाजिक उपक्रमात भाग घेवून सर्वसामान्य लोकांना सोबत घेवून पर्यावरण तसेच पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी कोटयावधीचा प्रशासकीय तसेच सामाजिक संस्थाकडून निधी मिळविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करून जलक्रांती करिता वेळप्रसंगी सत्याग्रह करुन जलसंवर्धनाची कामे करण्यासाठी सहभाग घेऊन आदर्श कामासाठी सदगृहस्थांची टीम बनवून भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराला विरोध करून जनतेला न्याय देण्यासाठी विविध आंदोलन, सत्याग्रह केले. परंतू थेटे हे या जमा केलेल्या पैशातून बॅनर लावून जाहिरातबाजी करत आहे. ज्यातून समाजाला कुठलाही फायदा नाही असे राजकीय पुढार्‍यांचे कार्यक्रम घेत असल्याचे निदर्शनास आल्याने हा पैसा कोठून व कसा जमा करत असेल त्याचा तपास करायला सुरूवात केली. दिनदुबळ्यांचा कैवारी गोरगरीबांचा मसिहा असल्याचे चित्र निर्माण करून प्रभाव पाडण्यासाठी फेसबूकवर बोगस नावाने अनेक अकाउंट उघडून ऑनलाईन पध्दतीने पैसा मागणी करत असल्याचे मला कोव्हीड - 19 च्या संचारबंदी काळात गरजुंना अन्नधान्य दान करण्याच्या कार्यात लक्षात आले. 200 ते 300 लोकांना जालन्याहून खिचडी आणायची आणि आठशे लोकांना वाटली असे खोटे सांगुण लोकांना पैशासाठी आवाहन करायचे यामुळे मला यांच्या सामाजिक कार्यात भ्रष्ट विचारांची खात्री पटली. सामाजिक कार्यकर्तेच्या बैठकीत विनंतीही केली होती की सामाजिकार्यात दुकानदारी करू नाही. परंतू अंबड तालुक्यात नौकरीला असतांना त्यांच्या शाळेवर व्हीजीट केली होती दोन्ही वेळेला प्रार्थनेला उपस्थित नसल्याचे व उशीरा आल्याचे निदर्शनास आले. गुणवत्तेच्या दृष्टीने विशेष असे काहीच हालचाल असल्याचे दिसून आले नाही. आणि आज ही काही शाळेत विशेष लक्ष असल्याचे दिसून येत नाही. सामाजिक कामा निमित्ताने निस्ते बाहेर लक्ष असल्याने ज्याठिकाणचा पगार सुरू आहे त्याठिकाणी 100 % जीव ओतून काम न करता फक्त पगार पुरते काम कुरून एकप्रकारे शाळेच्या कामात फक्त हजेरी लावून गणवतेत कमी राहणे आणि बाहेर सामाजिक कामासाठी पैसा मागणी करून जमा झालेल्या पैशातून 50 % खर्च करायचा असे प्रकार करत असल्याचे दिसून येत आहे. असेही या निवेदनात शेवटी म्हटले आहे. यावेळी निवेदनावर देवा चित्राल, अ‍ॅड. आशा गाडेकर, चंद्रकांत आढाव, अंकुश चव्हाण आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. 


गुटखा माफियावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा - पत्रकार सुरक्षा समितीची मागणी


जालना / प्रतिनिधी :- पत्रकार दै.जंग चे शेख मुसा गेल्या 15 ते 20 वर्षापासुन पञकारिता क्षेञात असुन,जिवाची कसलीही तमा न बाळगता सत्य आणि निर्भिड पञकारीता करत आले आहे,या दरमियान त्यांना अनेक वेळा गुंडा करवी धमक्या मिळाल्या आहेत,सध्या मानवी आरोग्यास घातक अशा प्रतिबंधित गुटखा विषयी लिखाण करत असतांना गुटखा माफीया सतिष जैस्वाल यांचा भाउ नामे उमेश जैस्वाल यांने शेख मुसा याच्या एका मिञा कडे फोनवर संभाषण केले की,एस पी कितने दिन का है,दो ढाई महीने उसके बाद तो हम ही है,उसको पांच हजार देने के बजाये पांच लाख देकर हमेशा की किटकिट खत्म कर देंगे अशी गर्भित आणि पाच लाखात सुपारी देवुन कायमचा काटा काढण्याची भाषा केली आहे.सध्या सतिष जैस्वाल वर 10-12 गुन्हे असुन त्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करणे गरजेचे आहे माञ आपल्या विभागातील काही कर्मचारी व अन्न, औषध आणी भेसळ विभागाचे अधिकारी त्यां माफीयास पाठीशी घालत असल्याने शेख मुसा यांनी संदर्भातील बातम्या त्यांच्या हिंदी दैनिक वैचारिक जंग मध्ये प्रकाशित करत असल्याने त्याने ही धमकी दिली आहे. या गुटखा माफिया वर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार सुरक्षा समिती (महाराष्ट्र राज्य)जालना जिल्ह्याच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर जिल्हाध्यक्ष तथा साय दै.राजुरेश्वर चे जिल्हा प्रतिनिधी गोपाल त्रिवेदी,एम सी एन न्यूज चे जिल्हा प्रतिनिधी सुयोग खर्डेकर, गदिर टाइम्स चे संपादक खलील खान,एस बी एन न्यूज चे राहुल मुळे,सा. लोकधिकारचे सय्यद अफसर, दै.कालदण्ड चे संपादक शेख चांद पी.जे.,एम सी एन न्यूज चे सुनील खरात,प्रेस फोटोग्राफर जावेद तांबोली, सा. लोकधिकारचे शब्बीर पठाण,जालना न्यूज टाइम्स चे गौरव बुट्टे, सा. घानेवाडी दर्पणचे संपादक शिवाजी बावणे,दै.आणीबाणीचे सीताराम तुपे,दै.आनंद नगरीचे तुकाराम पिठोरे, दै.पुण्य नगरीचे बाबासाहेब म्हस्के,दै.पल्लवरंग चे संपादक अमित कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
राज्यात गुटखाबंदी लागू करण्यात आली असताना जालना येथून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक - विक्री केली जाते. जालना येथील ' दैनिक वैचारिक जंग' या हिंदी भाषिक वर्तमापत्राचे आवृत्ती संपादक शेख मुसा यांनी गुटखा विक्रीच्या विरोधात बातम्या प्रकाशित केल्या. त्यामुळे त्यांना येथील गुटखा मफिया सतीश जैस्वाल यांच्या भावाने पत्रकार मुसा यांच्या मित्राकडे जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली असून याबाबत पत्रकार शेख मुसा यांनी शुक्रवारी ( दि.२६ ) पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांना निवेदन दिले आहे.
     याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात पत्रकार शेख मुसा यांनी म्हटले की, दैनिक वैचारिक जंग या वृत्तपत्रातून मी अवैध गुटखा विक्रीबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या आहे. मानवी आरोग्यास घातक असल्याने प्रतिबंधित केलेल्या गुटखा विक्रीबाबत लिखाण करीत असल्याने येथील गुटखा माफिया सतीश जैस्वाल याचा भाऊ उमेश जैस्वाल याने माझ्या एका मित्राकडे धमकी दिली आहे. पाच लाख रुपयांची सुपारी देऊन माझा काटा काढण्याची भाषा या क्लिप मध्ये वापरण्यात आली आहे.हा  गर्भित इशारा या गुटखा माफियाच्या भावाकडून मला देण्यात आला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.

     चौकट : -
...तरीही मोक्का नुसार कारवाई आवश्यक
या निवेदनात पत्रकार शेख मुसा यांनी संबंधित गुटखा माफिया सतीश जैस्वाल याच्या विरोधात जालना शहरातील सदर बाजार, कदीम जालना ,चंदन झिरा पोलीस ठाण्यात ३२८, २७२,२७३,१८८ या कलमानुसार तब्बल आठ गुन्हे दाखल असून न्यायालयात चार खटले दाखल आहेत. त्यानुसार त्याच्यावर मोक्का / एम पी डी ए कायद्यानुसार तडीपारीची कारवाई होणे आवश्यक होते. मात्र, तो आजही जालना जिल्ह्यात खुलेआम गुख्याची विक्री करून नागरिकांचे आरोग्य बिघडवित आहे. कारवाईस्तव हे निवेदन पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्याकडे सादर करण्यात आल्याचेही यात म्हटले आहे.


'एस पी कितने दिनका हैं.. दो ढाई महिने' !
पत्रकार शेख मुसा यांना दिलेल्या धमकीच्या या ऑडिओ क्लिप मध्ये पुढील संवाद आहे.
'एस पी कितने दिनका हैं.. दो ढाई महिने' ! तो हम ही हैं... इसको पाच हजार देने के बजाय पाच देकर इसकी किट किट ही खतम कर देंगे '..अशा शब्दात ही
धमकी पत्रकार शेख मुसा यांच्या   मित्राकडे दिल्याचे मुसा यांनी सांगितले.


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...