शनिवार, २७ जून, २०२०

समाजभान नावाने फेसबूक आयडी तयार करून पैसा लुटणार्‍याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी

जालना (प्रतिनिधी):- सामाजिक कामासाठी समाजभान नावाने विविध फेसबूक आयडी तयार करून ऑनलाईन पध्दतीने पैसा गोळा करण्याचे काम केले जात असून संबंधीतांविरूद्ध कारवाई करण्यात यावी अशी तक्रार पोलिस निरिक्षक अंबड, व पोलिस अधिक्षक जालना, सायबर क्राईम, जालना यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, देशाला लागलेला महारोग भ्रष्टाचार रोखण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून विविध पध्दतीने जनजागृतीद्वारे आम्ही प्रयत्न करीत आहोत. भ्रष्टाचार करण्याच्या विविध पध्दती आहेत हे आम्हाला समाजभान नावाने लक्षात आले. दादासाहेब थेटे हे शिवाजी प्राथमिक शाळा, इंदिरानगर झोपडपटटी पाण्याचे टाकी खाली शाळेत शिक्षक आहेत मी पण एक शिक्षक असून शाळेच्या गुणवत्ता करिता मुलींच्या शिक्षणाकरिता, शिक्षकांचे प्रशिक्षण, योगाभ्यासाचा प्रचार आणि प्रसार, विविध शासकीय उपक्रम राबवून आदर्श काम उभे केले आहे. तसेच सर्व राष्ट्रीय उपक्रमांत प्रशासकीय आदेशान्वये अनेक उपक्रम राबविले आहेत. सामाजिक उपक्रमात भाग घेवून सर्वसामान्य लोकांना सोबत घेवून पर्यावरण तसेच पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी कोटयावधीचा प्रशासकीय तसेच सामाजिक संस्थाकडून निधी मिळविण्यासाठी यशस्वी प्रयत्न करून जलक्रांती करिता वेळप्रसंगी सत्याग्रह करुन जलसंवर्धनाची कामे करण्यासाठी सहभाग घेऊन आदर्श कामासाठी सदगृहस्थांची टीम बनवून भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराला विरोध करून जनतेला न्याय देण्यासाठी विविध आंदोलन, सत्याग्रह केले. परंतू थेटे हे या जमा केलेल्या पैशातून बॅनर लावून जाहिरातबाजी करत आहे. ज्यातून समाजाला कुठलाही फायदा नाही असे राजकीय पुढार्‍यांचे कार्यक्रम घेत असल्याचे निदर्शनास आल्याने हा पैसा कोठून व कसा जमा करत असेल त्याचा तपास करायला सुरूवात केली. दिनदुबळ्यांचा कैवारी गोरगरीबांचा मसिहा असल्याचे चित्र निर्माण करून प्रभाव पाडण्यासाठी फेसबूकवर बोगस नावाने अनेक अकाउंट उघडून ऑनलाईन पध्दतीने पैसा मागणी करत असल्याचे मला कोव्हीड - 19 च्या संचारबंदी काळात गरजुंना अन्नधान्य दान करण्याच्या कार्यात लक्षात आले. 200 ते 300 लोकांना जालन्याहून खिचडी आणायची आणि आठशे लोकांना वाटली असे खोटे सांगुण लोकांना पैशासाठी आवाहन करायचे यामुळे मला यांच्या सामाजिक कार्यात भ्रष्ट विचारांची खात्री पटली. सामाजिक कार्यकर्तेच्या बैठकीत विनंतीही केली होती की सामाजिकार्यात दुकानदारी करू नाही. परंतू अंबड तालुक्यात नौकरीला असतांना त्यांच्या शाळेवर व्हीजीट केली होती दोन्ही वेळेला प्रार्थनेला उपस्थित नसल्याचे व उशीरा आल्याचे निदर्शनास आले. गुणवत्तेच्या दृष्टीने विशेष असे काहीच हालचाल असल्याचे दिसून आले नाही. आणि आज ही काही शाळेत विशेष लक्ष असल्याचे दिसून येत नाही. सामाजिक कामा निमित्ताने निस्ते बाहेर लक्ष असल्याने ज्याठिकाणचा पगार सुरू आहे त्याठिकाणी 100 % जीव ओतून काम न करता फक्त पगार पुरते काम कुरून एकप्रकारे शाळेच्या कामात फक्त हजेरी लावून गणवतेत कमी राहणे आणि बाहेर सामाजिक कामासाठी पैसा मागणी करून जमा झालेल्या पैशातून 50 % खर्च करायचा असे प्रकार करत असल्याचे दिसून येत आहे. असेही या निवेदनात शेवटी म्हटले आहे. यावेळी निवेदनावर देवा चित्राल, अ‍ॅड. आशा गाडेकर, चंद्रकांत आढाव, अंकुश चव्हाण आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...