बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२०

हिवरसिंगा केंद्रातील प्रा.शा.हनुमाननगर येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
बीड प्रतिनिधी | औसरमल गौतम
 *जि प प्रा शाळा हनुमाननगर येथे दि. 3 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी ठीक 7 वा. वार्षिक स्नेहसंमेलनाचे (बालधमाल) आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा. मदन जाधव सर, मा. बळी अप्पा गवते ,मा. बालू शेट लाटे व प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच पारूताई सस्ते, माऊली सानप, दत्तात्रय (काका) शिंदे, आदर्श शिक्षक रतन बहिर सर, अमोल पवार, भागवत राख सर, विठ्ठल सानप सर, दत्तात्रय दुधाळ सर, चंद्रकांत (अण्णा) सस्ते, शेषराव सानप, राम मस्कर, दादा फरताडे,विनोद टाकसाळ, महादेव सानप व  बाळू देवकर  शालेय समिती सर्व सदस्य. हिवरसिंगा केंद्रातील सर्व शिक्षक बांधव व पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते*.

प्राथमिक शाळा हनुमाननगर येथे प्रथमच  भव्य दिव्य असा छोट्या मुलांचा बाल धमाल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ शिक्षणाची देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व जिजाऊ वंदनेने करण्यात आली. बालधमाल कार्यक्रमात एकूण 30 विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला होता. त्यामध्ये वेगळ्या प्रकारची एकूण वीस गाणे घेण्यात आली होती. *ढोलकीच्या तालावर* या गीतावर *पंकजा वनवे* या चार वर्षाच्या मुलीने अप्रतिम डान्स केला प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचबरोबर *एकच राजा येथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर* .....या गीताने तर धमालच केली. *तुला फिरवीन गाडीवर* श्रद्धा सानप व आदित्य सस्ते तसेच *तुझ्या रूपाचं चांदणं आदर्श सस्ते व संस्कृती चव्हाण* यांनी अप्रतिम डान्स केला. त्यामुळे हे गाणं वन्स मोर करण्यात आलं. त्याचबरोबर *पिंगा ग पोरी पिंगा, पापा मेरे पापा, लल्लाटी भंडार, मैया यशोदा, सुनो गौरसे दुनियावालो बुरी नजर ना हम पे डाले*, असे छान छान परफॉर्मन्स मुलांनी दाखवले हे पाहण्यासाठी पंचक्रोशीतील पालक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे पालकांनी आनंद उत्सवच साजरा केला. व हा कार्यक्रम डोक्यावर घेऊन 21 हजार रुपयाचे बक्षीस जमा झाले. बालधमाल हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक शिवाजी शिंदे सर,  नागरगोजे जमुना मॅडम शालेय व्यावस्थापन समिती सर्व सदस्य व पालकांनी परिश्रम घेतले. व आभार प्रदर्शन चंद्रकांत सस्ते यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...