रविवार, १५ मार्च, २०२०

         जगदंबा इंग्लिश स्कूलमध्ये कोरोणाविषयी जनजागृती प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांनी कोरोणापासून बचाव ची केली तयारी.
विहामांडवा (प्रतिनिधी) मोहम्मद शेख :-:पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंढाळा येथील जगदंबा इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थी
व शिक्षकांनी कोरोना वायरस पासून बचावासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता मुलांनी कोरणा विषयी माहिती देऊन कोरोना आजार टाळण्यासाठी प्रत्यक्षात केले जाणाऱ्या उपयोग उपाय योजनेचे प्रात्यक्षित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कोरोना वायरस चे लक्षणे, डोकेदुखी, सर्दी व खोकला, श्वसनाचे त्रास, किडनी फेल, ताप व त्यापासून बचावासाठी साबण व पाण्याने स्वच्छ हात धुणे, शिंकताना रुमालाचा वापर करणे, सर्दी व खोकला झालेले व्यक्तीपासून दूर राहणे व तोंडाला मास्क किंवा रुमाल वापरणे, त्याच प्रमाणे हस्तांदोलन टाळणे, रुमाला पासुन मास्क तयार करणे, एकमेकात सुरक्षित अंतर ठेवणे व जमिनीवर मातीत खेळल्यानंतर  साबणाने स्वच्छ धुणे या कोरोना पासून बचावाच्या गोष्टी प्रत्यक्षात प्रात्यक्षिक करून दाखवले त्याचप्रमाणे शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला व कोरोना नावाची मानवी साखळी तयार करत पुराणापासून बचाव करणे करण्यासाठी लागणाऱ्या उपायोजना व घोषना देत जनजागृती केली. यावेळी शाळेचे सचिव प्रशांत नरके हे उपस्थित होते उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका प्रियंका थोटे पर्यवेक्षिका मयुरी खोबरे,संतोष रखे,कल्याणी कुलकर्णी,संतोष बांगर, मोनिका बोडके,अविनाश बांगर,प्रगती पहाडे, संदीप बर्वे,वैष्णवी देशमाने, ऐश्वर्या जाधव,सुंदर थोरे,जयश्री डिक्कर हे प्रयत्न करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...