रविवार, १५ मार्च, २०२०

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्याच्या अध्यक्षपदी महेंद्र बनकर तर सचिवपदी मनोहर उघडे यांची निवड.
जालना (प्रतिनिधी):- गेल्या 42 वर्षाची परंपरा असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2020 च्या  अध्यक्षपदी रेल्वे कर्मचारी तथा भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध 
निवड करण्यात आली तर सचिव पदी मनोहर उघड यांची निवड करण्यात आली. शासकीय विश्राम गृह जालना येथे आयोजीत एका बैठकीत ही निवड कण्यात आली आहे.जालना शहरात गेल्या 42 वर्षापासून अखंडपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला सुरु आहे. या व्याख्यानमालेस नामवंत साहित्यिकांसह मान्यवरांच्या अनमोल अशा मार्गदर्शनाची मेजवाणी जालनेकर श्रोत्यांना व्याख्यान मालेच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात येत असते.त्यानुशंगाने दि. 15 मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. बी.एम. साळवे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये सुधाकर सेठ रत्नापारखे, अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, एन.डी. गायकवाड, व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष अरुन मगरे, माजी सचिव सुहास साळवे यांची उपस्थिती होती. सदर बैठकीत माजी सचिव सुहास साळवे यांनी 2019 चा हिशोब सादर केला. मागील व्याख्यानमालेचा हिशोब सर्वानुमते मान्य करण्यात आला. यावेळी संजय हेरकर, अनुराधा हेरकर, फकीरा वाघ, महेंद्र रत्नपारखे,  विलास रत्नपारखे, कैलास बनसोडे, महेंद्र बनकर, सुनिलभाऊ साळवे, बबनराव रत्नपारखे, पप्पू चत्रे, सिध्दार्थ के. मोरे, रनजीत रत्नपारखे, सुनिल बनकर,  मनोहर उघडे, परमेश्वर उघडे, सुहास साळवे, जे.एस. कीर्तीशाही, विजय कांबळे, योगेश रत्नपारखे, सचिन कांबळे, अशोक रगडे,  शिवाजी सहारे, दिपक डोके, अ‍ॅड. कैलास रत्नपारखे, संदीप रत्नपारखे, कपील खरात, सतिष वाहुळे, संदीप साबळे,  मिलींद बोर्डे, किशोर जाधव, राहुल वाहुळे, प्रकाश हिवाळे, प्रकाश मोरे, विलास भिंगारे, तेजराव खरात, सुधाकर मोरे, सुनिल साळवे, अमित साळवे, करण सदावर्ते, राहुल रत्नपारखे, प्रमोद म्हस्के, प्रमे जाधव, एस.एस. कांबळे, माधवराव पात्रे, मंगलदास बागुल, डी.आर. धामने, जयसेन बनकर, राहुल धिवार, अर्जुन जाधव, आत्माराम यादव, बाळु बोर्डे, सर्जेराव खरात, गौतम वाघमारे, नितीन गोदाम, संघदीप कुलतर्खे, सिमोन सुतार,  तेजराव मोरे, सुनिल रत्नपारखे, राजेंद्र जाधव, अशोक लबडे, मधुकर बोबडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...