शुक्रवार, २७ मार्च, २०२०

        पोलिस आयुक्तालयातर्फे औरंगाबाद जनतेस आवाहन
       औरंगाबाद/शहर प्रतिनिधी- गणेश आठवले :- आज संपूर्ण जगामध्ये थैमान घातलेल्या कोरणा विषाणूमुळे परिस्थिती अत्यंत गंभीर स्वरूपाची झाली आहे, म्हणून प्रशासनाला
कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजनेचा एक भाग म्हणून १४ एप्रिल २०२० पर्यंत देशात संचारबंदी /जमावबंदी घालण्यात आली आहे, देशात पुढील २१ दिवस लाॅक डाऊन आहे, त्या अनुषंगाने औरंगाबाद शहर पोलीस दलातर्फे शहरांमध्ये जागोजागी चौकाचौकात गल्लीबोळात संचारबंदी/जमावबंदी,चेक पॉईंट व पेट्रोलिंग लावण्यात आली आहे .
औरंगाबाद पोलिस आयुक्त. साहेब मार्फत जनतेला काही आव्हान करण्यात आली आहेत की,कोरोचा प्रसार होऊ नये ही जबाबदारी प्रत्येकावर आहे. नागरिकांनी एकत्र जमू नये सर्व धर्मगुरूंना सर्व धार्मिक स्थळांना विनंती करण्यात आली आहे, मंदिरे, मशिदी,बुद्ध विहारे ,गुरुद्वारा, चर्च इत्यादी ठिकाणी पूजा-अर्चा नमाज/अर्दाज हे फक्त धार्मिक स्थळावरील लोकांनीच करावी.नागरिकांनी पुजा  अर्चा, नमाज ही घरीच करावी . सध्याच्या परिस्थितीमध्ये जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा अफवा पसरू नये.अत्यावश्यक सेवा जसे दूध, भाजीपाला, कृषी विक्री केंद्र किराणामाल पुरवठा केंद्र, बँका, एटीएम, दवाखाने, औषधी दुकाने, पोस्ट ऑफिस, पाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग इत्यादी आवश्यक सेवा 24 तास खुली राहणार आहेत. संबंधित दुकानदारांनी ग्राहकाच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.(दोन ग्राहकांमधील अंतर हे एक मीटर असावे)निर्जंतुकीकरण स्वच्छता याबाबत शासनाने घालून दिलेल्या सूचना पाळाव्यात.
तरी नागरिक शहरामध्ये विनाकारण फिरताना दिसले तर अशा नागरिकां  विरुद्ध उद्यापासून कडक कारवाई करण्यात येणार आहे .नागरिकांनी एका वेळी घरातुन एकाच व्यक्तीने बाहेर पडावे तेही जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी असतील तरच .
जे नागरिक होम क्वारंट्यान आहेत त्यांनी घरीच थांबावे घरांमध्ये देखील इतर लोकांशी संपर्क टाळावा. शहरांमधून आवश्यक नसल्यास प्रवास करू नये, औरंगाबाद शहरामध्ये संचारबंदी/जमावबंदी असताना देखील फिरणाऱ्या व्यक्तीवर साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९६,आपत्ती प्रतिबंध अधिनियम २००५ व भारतीय दंडविधान संहितेच्या अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये सहा महिने ते दोन वर्षापर्यंतचे शिक्षेची तरतूद आहे. या संबंधाने आज रोजी सिटीचौक येथे चार गुन्हे वाहतूक शाखेकडून तीन गुन्हे व उद्यापासून शहरांमध्ये फिरणाऱ्या फिरणार यांवर वाहनांवर ४४३ केसेस दाखल केल्या आहेत. तरी नागरिकांनी घरीच थांबावे व कोरणा विषाणूपासून स्वतःचे स्वरक्षण स्वतः करावे असे आवाहन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...