शुक्रवार, २७ मार्च, २०२०

          पोलिस मारहाणीनंतर रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू 
                     मुलाकडुन होत कार्यवाही ची मागणी.
माझ्या पप्पा च्या मृत्यूस पोलिस कारणीभूत आहे असा मुलाचा आरोप.
दिवसेंदिवस पोलिसांकडून होणारा बळाचा गैरवापर थांबेल का?
ठाणे प्रतिनिधी :- आरोग्य सेवक व पत्रकार यांच्यावर
 पोलिसाकडून मारहाणीच्या घटना महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत आहेत या घटना कुठे तरी थांबले पाहिजे कारण पत्रकार बांधव आपल्या जिवाची पर्वा न करता बातम्या प्रसार करत आहेत. समाजा मध्ये जागृती निर्माण करतात तसेच आरोग्य कर्मचारीदेखील हे आरोग्य संदर्भात आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत.सेवा करणाऱ्या व समाज जागृती करणाऱ्या बांधवास जर पोलीस प्रशासन आपल्या बळाचा गैरवापर करीत करत असतील तर हे योग्य आहे का ? यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व गृहमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.कारण दिवसेंदिवस पोलीस प्रशासनाचा गैरवापर होताना दिसून येत आहे हा गैरवापर थांबायला पाहिजे अशी मागणी पत्रकार,आरोग्य सेवक व सर्वसामान्य नारिकाकडून होत आहे.
हिंगोली येथील आरोग्य सेविकेची घटना ताजी असताना पत्रकारावर झालेल्या हल्ल्याची घटना तर आज 27 मार्च 2020 रोजी रुग्णवाहिका चालक नरेश शिंदे वय.49 रा.ठाणे यांना पोलिकडून मारहाण झाल्यामुळे त्यांचा मृत्यूझाला आहे.ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात 24 तास उपलब्ध असणारे, गोर गरीब रुग्णांच्या मदतीस तातडीने धावणारे समाजसेवक नरेश शिंदे रुग्णवाहिकेतून जात असताना घडली. या घटनेची सविस्तर माहिती अशी की,बोरिवली येथून श्रीगोंदा होते एका रुग्णाला घरी सोडविण्यासाठी नरेश शिंदे व मुलगा बंटी हे स्वतःची रुग्णवाहिका घेऊन पेशंटला सोडण्यासाठी जात होते. यावेळी त्यांनी रुग्णवाहिका चालविण्यासाठी त्यांचा निलेश (बंटी) नावाचा मुलाला ही सोबत घेतले होते.नरेश शिंदे हे अंबुलान्स घेऊन जात असताना टोल नाका तळेगाव येथे पोलिसांनी टोलनाक्यावर  रुग्णवाहिका थांबवली.पोलिस जवळ आल्यानंतर नरेश शिंदे यांना विचारपूस केली.चेकिंग केली त्यानंतर नरेश शिंदे याचा मुलगा याला खाली उतरण्यास सांगितले त्यानंतर नरेश शिंदे हे पोलिसांना हात जोडून विनंती केली आणि ते म्हणाले की, साहेब त्याला मारू नका मारायचं असेल तर मला मारा त्यानंतर पोलिसांनी त्यांना सांगितले की संचारबंदी लागू आहे आणि तुमच्यावर गुन्हा दाखल होईल त्यामुळे तुम्ही आम्हाला पाच हजार रुपये द्या.आम्ही तुमच्या वर गुन्हा दाखल करत नाही त्यावेळेस नरेश शिंदे हे त्यांना म्हणाले की साहेब माझ्याकडे पाच हजार रुपये नाहीत मी तुम्हाला तीन हजार रुपये देतो पोलिसांनी rs.3000 घेतल्यानंतर त्यांना नरेश शिंदे यांना काठीने मारहाण करून पोलिसांनी पैशे घेऊन सोडून दिले.त्यानंतर रुग्णवाहिका सोडून दिली व काही अंतर कापल्या नंतर बंटी चे वडील नरेश शिंदे यांना त्रास सुरू झाला.त्यांना माराच्या भीतीने आपला जीव गमवा वा लागला आहे. या सर्व घटनेची जबाबदार पोलीस आहेत.
असा आरोप मयत पिता नरेश शिंदे यांचा मुलगा बंटी यांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...