रविवार, ५ एप्रिल, २०२०

         कोरोना अलर्ट :  जिल्ह्यात आज प्राप्त 10 रिपोर्ट ‘निगेटीव्ह’
               संस्थात्मक विलगीकरणात 14 नागरिकांची वाढ
                       अलगीकरणात 5 संशयीत दाखल
बुलडाणा, प्रतिनिधी :  जिल्ह्यातून शेगांव, खामगांव व बुलडाणा आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात
दाखल संशयीत व्यक्तींचे तसेच संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या संशयीत 17 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तसेच कालपर्यंत 16 संशयीतांचे नमुने पाठविण्यात आले आहे. अशाप्रकारे 33 संशयीत नागरिकांचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविले. त्यापैकी आज 10 नमुन्यांचे रिपोर्ट प्रात्प झाले असून ते निगेटीव्ह आहेत.  जिल्ह्यात दिल्ली येथील कार्यक्रमातून परतलेल्या 17 व त्यांच्या संपर्कात आलेल्या 13 संशयीत व्यक्तींच्या  नमुन्यांचाही यामध्ये समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली आहे. 
घरामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या  नागरिकांमध्ये आज  भर पडली नाही. त्यामुळे क्वारंटाईनच्या संख्येत आज वाढ नाही. काल दि. 3 एप्रिल 2020 पर्यंत 76 भारतीय नागरिकांना  त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. गृह विलीगकरणातील नागरिकांची आज मुक्तता करण्यात आली नाही. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 76 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात  संस्थात्मक विलगिकरणात आज 14  व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. संस्थात्मक विलागिकरणातून आज मुक्तता करण्यात आलेली नाही. संस्थात्मक विलगीकरणात आज एकूण 36 नागरिक आहेत.
जिल्ह्यात आज बुलडाणा आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात 2, शेगांव 2 व खामगांव येथे 1 संशयीत म्हणून दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे 5 संशयीतांना दाखल करून त्यांचे स्वॅब नमुने  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात सध्या 17 व्यक्ती दाखल आहेत. त्यामध्ये खामगाव 4, शेगांव 4 व बुलडाणा 9 व्यक्तींचा समावेश आहे.  घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 48 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरनातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर  आजपर्यंत 61 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले. तसेच सध्या जिल्ह्यातील 17 नागरिक आयसोलेशन कक्षात दाखल आहेत. अलगीकरणातून आजपर्यंत 18 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली असून यामध्ये बुलडाणा येथील 11 व खामगांव येथील 7 व्यक्तींचा समावेश आहे.
  आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण 86 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 63 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 5 पॉझीटीव्ह व  58  निगेटीव्ह रिपोर्ट  आले आहेत.  तसेच 23 नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे यांनी दिली आहे.                                    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...