रविवार, १९ एप्रिल, २०२०


औरंगाबादचे डीएचओ डॉ. गीते यांच्या कारमध्ये विदेशी दारूसह                           06 लाख रुपये सापडले !
जिल्हा बंदीचे केले उल्लंघन ; बदनापूर जवळ चेक पोस्टवर पोलिसांनी पकडले
जालना,प्रतिनिधी :- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेली जिल्हाबंदी मोडीत काढत चक्क कारमध्ये विदेशी दारू आणि सात लाख रुपयांची रोख  रक्कम घेऊन 
जालन्याकडे निघालेल्या औरंगाबाद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांना  बदनापूर तालुक्यातील वरुडी चेकपोस्टवर पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर l जिल्हा बंदी करण्यात आलेली आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने तेथील कोणत्याही वाहनांना जालना जिल्ह्यात विनापरवानगी येता येत नाही. शनिवारी  ( दि.१८) औरंगाबाद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते हे त्यांच्या ( एम.एच.२० सी. यू. ०३५३ )  महागड्या इर्टीका कारमध्ये विदेशी दारू आणि ६ लाख ७० हजार रुपये रोख रक्कम सोबत घेऊन  जालन्याकडे त्यांच्या मूळगावी बुलढाणा जिल्ह्यात लोणारकडे निघाले होते. त्यांच्या कारवर महाराष्ट्र शासन लिहिलेले होते.जालना जिल्ह्याच्या सीमेवर बदनापूर तालुक्यातील वरुडीनाक्यावर त्यांची गाडी पोलिसांनी अडवून तिची तपासणी केली.यावेळी गाडीत रोख 6 लाख 70 हजार रुपये, 6 हजार रुपये किंमतीची दारू आढळून आली.रोख रक्कम, दारू व 6 लाख रुपये किंमतीची कार, असा एकूण 12 लाख 76 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी डॉ. अमोल गीते यांच्याविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चे 51 (ब), महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या 65 (अ) (ई) आणि भादंवि. 188 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...