बुधवार, १५ एप्रिल, २०२०

कामगारांनी कोणत्याही दलाल किंवा एजंटाच्या प्रलोभनास बळी पडू नये
जिल्हा कामगार अधिकाऱ्यांचे आवाहन.
जालना,प्रतिनिधी :- कोविड-19 च्या अनुषंगाने महाराष्ट्रच नव्हे तर संपुर्ण जगावर कोरोनाची आपत्ती आलेली आहे. त्याच कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. परंतु काही लोक या परिस्थितीचा उपयोग करुन कामगारांची दिशाभुल करत असल्याचे सरकारी कामगार कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील महाराष्ट्र ईमारत व इ्रतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, जालना येथील नोंदीत व अनोंदीत कामगारांनी कोणत्याही दलाल किंवा एजंटाच्या प्रलोभनास बळी पडू नये. एजंट किंवा दलाल पैशाची मागणी करत असेल तर त्याच्याविरुद्ध आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी,असे आवाहन टी.ई.कराड, जिल्हा कामगार अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...