बुधवार, १५ एप्रिल, २०२०


खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांचे दवाखाने बंद ठेऊ नयेत
जालना, प्रतिनिधी :- सद्यस्थितीत कोरोना विषाणुच्या साथी व्यतिरिक्त अन्य विषाणुजन्य आजाराच्या साथीही जिल्ह्यात सुरु आहेत. तसेच विविध आजाराने ग्रस्त 
रुग्ण देखील दैनंदिन तपासणीसाठी खाजगी दवाखान्यात येत असतात. काही खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर आपली हॉस्पीटल, दवाखाने, क्लिनिक बंद ठेवीत असल्यामुळे सर्व सामान्य नागरिकांची  गैरसोय होऊन शासकीय यंत्रणेवर भार पडत आहे.जालना जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांनी त्यांचे हॉस्पीटल, दवाखाने, क्लिनीक सलग बंद ठेवण्यात येवू नये. अन्यथा संबंधिताविरुध्द प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच संबंधीत हॉस्पीटलचे व वैद्यकीय व्यवसायीकांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतची कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका परिपत्रकाद्वारे सुचित केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...