रविवार, १० मे, २०२०

लॉकडाऊन च्या काळात मग्रारोहयोच्या माध्यमातुन 19 हजार 758 मजुरांना  रोजगार


 


जालना,प्रतिनिधी:- महात्मा गांधी राष्ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत  दरवर्षी रोजगार हमीची कामे सुरु होतात. मात्र कोरोना विषाणुचा प्रसार व लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर  जालना जिल्हा प्रशासनाने मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे सुयोग्य नियोजन केलेले आहे. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश मजुर हे स्वगृही परतले असलया कारणाने वित्तीय वर्ष 2020- 21 मध्ये सर्व मजुरांना त्यांच्या काम मागणी प्रमाणे कामे उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील  प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पुरेशा प्रमाणात शेल्फवर कामे उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक काम मागणा-या मजुरांना त्यांच्या काम मागणी प्रमाणे कामे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली  उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर  यांनी सर्व  तालुकास्तरीय यंत्रणा प्रमुखांना निर्देश दिलेले आहेत. योजने अंतर्गत जालना जिल्ह्यात आज रोजी 349 ग्रामपंचायतीमध्ये 1213 विविध प्रकारची कामे सुरु असुन त्यावर 19758 मजुर प्रतिदिन काम करीत आहेत. यात बदनापुर तालुक्यात सर्वाधिक  241 कामे, भोकरदन तालुक्यात 210, घनसावंगी तालुक्यात 182, जालना तालुक्यात 185, परतुर तालुक्यात 133, जाफ्राबाद तालुक्यात 122, अंबड तालुक्यात 75, तर मंठा तालुक्यात 65 कामे सुरु आहेत.दि. 2 मे 2020 रोजी  843  कामे सुरु झाली असुन  8 हजार 661 मजुरांची  उपस्थिती आहे.  दि. 3 मे 2020 रोजी  878  कामे सुरु झाली असुन  तेथे 9 हजार 775 मजुरांची  उपस्थिती आहे. दि. 4 मे 2020 रोजी  850  कामे सुरु झाली असुन  तेथे 9 हजार 89 मजुरांची  उपस्थिती आहे. दि. 5  मे 2020 रोजी 973   कामे सुरु झाली असुन  तेथे 12 हजार 143 मजुरांची  उपस्थिती आहे. दि. 6  मे 2020 रोजी   1 हजार 21   कामे सुरु झाली असुन  तेथे 14 हजार 174 मजुरांची  उपस्थिती आहे. दि. 7  मे 2020 रोजी   1 हजार 66 कामे सुरु झाली असुन  तेथे 15 हजार 430मजुरांची  उपस्थिती आहे. दि. 8 मे 2020 रोजी   1 हजार 64   कामे सुरु झाली असुन  तेथे 15 हजार 818 मजुरांची  उपस्थिती आहे. दि. 9 मे 2020 रोजी   1 हजार 146 कामे सुरु झाली असुन  तेथे 17 हजार 241 मजुरांची  उपस्थिती आहे. दि. 10  मे 2020 रोजी   1 हजार 213   कामे सुरु झाली असुन  तेथे 19 हजार 758 मजुरांची  उपस्थिती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...