सोमवार, ११ मे, २०२०

मा.खा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जालना जिल्ह्यात विविध उपक्रम.


जालना,प्रतिनिधी :- कोरोनाचे संकट देशात असताना आज गोर गरीब जनतेचे भयंकर हाल होत असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जालना शहरात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने  66 गरजू कुटुंबाना रेशन व जिवन आवश्यक किटचे वाटप करण्यात आले.वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहरातील जिल्हा महिला बाल रूग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह उपस्थिती होती.जालना तालुक्यातील विरेगांव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्थानिक पातळीवरील पदाधिकारी यांच्या कडून अन्नदाना उपक्रम राबविण्यात आला.                  अंबड येथील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गरजूंना भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले.परतुर तालुक्यातील आष्टी परिसरातील कामगार उपासमार होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी फळ व धान्य वाटप केले.                               यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी दीपक डोके, महेंद्र बनकर,रत्नाकर लांडगे,विष्णु खरात, दिपक घोरपडे, विनोद दांडगे, सचिन कांबळे,प्रशांत दासुद, राहुल खरात, संजय शिलवंत,नितीन उन्हाळे, सचिन पगारे,अजय कांबळे, नाना जाधव, अच्युत पाईकराव, सचिन पट्टेकर,अर्जुन जाधव, विलास नरवडे, नितीन बाळराज, राजाभाऊ    दाहिजे,सुरज सोनवणे, भैय्यासाहेब पारखे,कांतीराम आढाव,बाळु शिंदे,प्रविण मोरे, सखाराम तांबे  सचिन पटेकर परमेश्वर पटेकर,अमोल ढाकरगे ,शिवाजी साळवे, कैलाश उमप, सिद्ध  पटेकर ,आदर्श पटेकर, सुरज साळवे, अजय थोरात, विलास पाटोळे, रोहित साळवे , रामेश्वर थोरात, आक्षय थोरात,समर्थ काळे, रवी उमप आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...