सोमवार, ११ मे, २०२०

संचारबंदी चे उल्लंघन, सोशल डिस्टन्सचा धज्या जुगार अड्ड्यावर छापा, जालना बीड रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोरील भिसे हॉस्पिटल झाला जुगार अड्डा.


अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या पथकाची कारवाई.



अंबड / अरविंद शिरगोळे, राहुल कारके  :- अंबड शहरातील गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेले डॉ.बळवंत भिसे यांच्या घरातील जुगार अड्ड्यावर आज दि.१० रविवार  रोजी पोलीसांनी  छापा घातला.यामध्ये आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून  ३९ हजार ३५० रुपये जप्त करण्यात आले. जालना बीड रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोरील भिसे हॉस्पिटल दवाखान्याच्या वरील बाजूस डॉ. भिसे  राहतात त्यांच्या घरात एका खोलीमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे आज दिनांक 10 मे रविवार रोजी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या पथकाची कारवाई, पोलिस उपनिरीक्षक (सिंघम)सुग्रीव चाटे व त्यांच्या पथकाने छापा घातला. या वेळी आठ जण जुगार खेळत असताना आढळून आले. यामध्ये मनोहर गुलाबराव मते, डॉ.बळवंत हरदासराव भिसे, द्वारकादास मेहरबान जाधव, राजकुमार उत्तम चंद्रमाला, डॉ.संजय लक्ष्मीनारायण भंसाली,   चुनीलाल नथू चव्हाण, गोपाल जगन्नाथ चौधरी, गुलाब नानू राठोड, यांना ताब्यात घेऊन अंबड पोलिसांमध्ये यांच्या विरोधात मुंबई जुगार कायदा व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन डॉक्टर विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी व नगर परिषद कर्मचाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश असल्यामुळे अंबड शहरात या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली आहे व संचारबंदीचे उल्लंघन केले असून डॉक्टर व राजकीय कार्यकर्त्यांवर  कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. अंबड शहरात चांगलीच खळबळ उडाली असून खमंग चर्चा सुरु आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...