रविवार, ३ मे, २०२०


                  मालेगाव येथुन आलेल्या चार जवानांच्या 
                         स्वॅबचे अहवाल पाझिटीव्ह.



मुंबई येथुन परतुर येथे आलेल्या तरुणाचा अहवालही पॉझिटीव्ह

जालना,प्रतिनिधी:- मालेगाव जिल्हा नासिक येथे जालना येथील राज्य राखीव बलगट क्र. 3 चे जवान बंदोबस्तासाठी गेले होते.  यापैकी जालना येथे परत आलेल्या चार जवानांच्या स्वॅबचा अहवाल दि. 1 मे, 2020 रोजी प्रयोगशाळेकडून पॉझिटीव्ह आला आहे. तसेच परतुर येथील २४ वर्षीय तरुण मुंबई येथुन आला असुन या युवकाच्या स्वॅबचा अहवालही पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.कोरोनाचा पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या चार जवानांपैकी एक जवान जालना शहरातील चौधरीनगर परिसरातील रहिवाशी असल्यामुळे उप विभागीय अधिकारी, जालना यांनी चौधरीनगर, सनसिटी, पोद्दार शाळेच्या मागील व खरपुडी शिवारातील चौधरीनगरलगत असणारी घरे हा संपुर्ण भाग एक किलोमीटर परिसराती क्षत्र प्रतिबंधित म्हणुन घोषित केले असुन या क्षेत्राच्या सीमा व त्यामधील क्षेत्र तसेच चौधरीनगरमध्ये जाणाऱ्या सर्व बाजुच्या रस्त्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात एकुण 1035  व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 60 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 712 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 23 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 907 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -05 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 08 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 871, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 120, एकुण प्रलंबित नमुने-24 तर एकुण 652 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 31, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 405 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या 18, सध्या अलगीकरण  केलेल्या व्यक्ती -278, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-20, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 60, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 37, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 190 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 278 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-28, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-19, पोलीस प्रशिक्षण केंद्र-112, मंठा येथे 13, परतुर-08, जाफ्राबाद-6 तर भोकरदन येथे 03 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यात अडकुन पडलेल्या ऊसतोड कामगारांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत असुन दि. 1 मे, 2020 पर्यंत जालना तालुक्यामध्ये सांगली येथुन 15 व सातारा येथुन 04 असे एकुण 19 कामगार, बदनापुर तालुक्यामध्ये बीड येथुन 11 व पुणे येथुन 28 एकुण 39 कामगार, परतुर तालुक्यात सांगली येथुन 51 व कोल्हापुर 37 एकुण 88 कामगार, मंठा तालुक्यात सांगली-72 कोल्हापुर 19, व सातारा येथुन 6 असे एकुण 97 कामगार, घनसावंगी तालुक्यात सांगली-66,पुणे-36, कोल्हापुर-50 व सातारा-150 असे एकुण 302 कामगार, तर अंबड तालुक्यात बीड-28, पुणे-45,सांगली 176,कोल्हापुर-119, सातारा-354, सोलापुर-73,  लातुर-2 व अहमदनगर येथुन 07 असे एकुण 804 कामगार दाखल झाले आहेत.  जालना जिल्ह्यात परजिल्ह्यातुन आतापर्यंत 1 हजार 349 कामगार दाखल झाले आहेत.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 458 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 79 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 539 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 59 हजार 400 असा एकुण          2 लाख 86 हजार 208 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात, जिल्ह्यात जाण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत https://jalna.gov.in/tofromjalna/  लिंक तर पोलीस विभागाचा प्रवासासाठी परवाना मिळण्यासाठी http://covid19.mhpolice.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असुन या मध्ये माहिती भरावी. परराज्यात व परजिल्ह्यात जाण्यासाठी दोन्ही प्रकारच्या परवानग्या आवश्यक आहेत. या परवाग्या केवळ ऑनलाईन पद्धतीने दिल्या जाणार असल्याने कोणीही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करुन नयेत.  तसेच जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंदणी करुन नये. नोंदणी केल्याचे आढळल्यास संबंधितावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...