रविवार, ३ मे, २०२०

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्तींना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी व येण्यासाठी लागणाऱ्या परवानगीची माहिती ऑनलाईन भरा. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन

जालना,प्रतिनिधी:- लॉकाडाऊनमुळे जालना जिल्ह्यात अडकलेल्या मजुर, परप्रांतीय, विद्यार्थी, नागरिकांना परत त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी तसेच जालना जिल्ह्यातील इतरत्र अडकलेल्यांना व्यक्तींना परत आपल्या मुळगावी येण्यासाठी लागणाऱ्या परवानगीची
 आवश्यक ती माहिती भरण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात आलेला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने पुढील दिलेल्या लिंकवर भरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे. जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना जालना जिल्ह्याच्या बाहेर आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf-3O7dG3TauMolwo6Xen0lDt97Bk1fnVS1D9pWCPQvUEK-lw/viewform  या लिंकवर आवश्यक ती माहिती भरावी.  प्रशासनाला आपली माहिती प्राप्त होताच ती संबंधित राज्याच्या, जिल्हयाच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येऊन त्यांच्याकडून नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त होताच आपण https://covid19.mhpolice.in/ या लिंकवरुन आपली माहिती भरुन आपला प्रवासाचा पास डाऊनलोड करुन घेऊ शकता. 
  तसेच भारताच्या व महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अडकलेल्या व्यक्तींना जालना जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी परत येण्यासाठी परवानगी हवी असल्यास https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSd0ooOZDnCbHnm-wxms3WXP1S50Ht6k909j40TnTXxbfeFRkw/viewform या लिंकवर आवश्यक ती माहिती भरावी. प्रशासनाला आपली माहिती प्राप्त होताच संबंधित राज्याच्या, जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासनामार्फत नाहरकत प्रमाणपत्र पाठविण्यात येईल. त्यानंतर प्रवासासाठी आवश्यक असलेल्या पाससाठी https://covid19.mhpolice.in/ या लिंकवर माहिती भरावी प्रशासनामार्फत आपल्या पासला मंजुरी देण्यात येईल त्यानंतर आपण आपला पास डाऊनलोड करु शकता. नागरिकांनी आपल्या गरजेनुसार वरीलपैकी लिंकवर आवश्यक माहिती भरून  जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02482-223132 येथे संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...