गुरुवार, २५ जून, २०२०

अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार,सफाई कामगार महिलेच्या जेवणात आढळली पाल !



प्रकृती बिघडल्याने जिल्हा जालना रुग्णालयात हलविले

जालना,ब्युरोचीफ :- अंबड ( जि. जालना ) येथील  उपजिल्हा रुग्णालयातील एका सफाई कामगार महिलेच्या जेवणात चक्क मेलेली पाल आढळून आल्याचा प्रकार गुरुवारी ( दि.२५) दुपारी घडला. विशेष म्हणजे एका पाल महिलेच्या खाण्यात आल्याचे या महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले.दरम्यान, चक्कर यायला लागल्याने या महिलेला जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
      अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दररोज जेवण देण्यात येते. याचे एका व्यक्तीला कंत्राट देण्यात आलेले आहे. दरम्यान, या रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगार शांताबाई धोत्रे यांनी काम दुपारी रुग्णालयात जेवण घेतले. यावेळी त्यांच्या ताटात चक्क मेलेल्या पालीचे पिल्लू आढळून आले. तसेच दुसरे मेलेले पिल्लू त्यांच्या खाण्यात आल्याचे लक्षात येताच या महिलेला उलटी झाली. यावेळी येथील डॉक्टरांनी या महिलेवर उपचार सुरू केले. मात्र शांताबाई धोत्रे यांना चक्कर येत असल्याने डॉक्टरांनी त्यांना जालना येथे हलविले. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे शांताबाई यांचे नातेवाईक राहुल कारके यांनी सांगितले. संबधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
   
तक्रार केल्यास कारवाई - डॉ. तलवाडकर

रुग्णालयातील जेवणात पाल आढळून आल्याचे आणि ती खाण्यात आल्याचे या महिलेचे म्हणणे आहे.त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना जालना येथे हलविण्यात आले आहे. जेवण देणाऱ्या कंत्राटदराविरोधात महिलेने तक्रार केल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. तलवाडकर यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...