गुरुवार, २५ जून, २०२०

आराखडा प्रमाणे शहरातील सांडपाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करावी -  देवानंद चित्राल



जालना (प्रतिनिधी):- शहरातील कुंडलिका नदी पात्राच्या दोन्ही बाजुला जालना पलिकेने  सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर असलेल्या (डी.पी.आर.) आराखडा प्रमाणे शहरातील सांडपाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करावी अशी मागणी सफाई अभीयान राबविणार्‍यांच्या वतिने मुख्याधिकारी यांना करण्यात आली. याविषयी सामाजीक कार्यकर्ता देवानंद चित्राल यांच्यासह अनेकांच्या सहिने निवेदन देण्यात आले.समस्त महाजन ट्रस्ट आणि लोकसहभागाने जालना शहरातील कुंडलिका नदी पात्राची सफाई आणि खोलीकरणाचे काम सुरु आहे. या कामाची सर्व सामान्यांकडुन कौतुक तसेच समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या नदीपात्रात शहरातील सांडपाणी सोडल्या जाते त्यामुळे पात्रात पुन्हा पुन्हा घाण होउन स्थिती जैसेथे होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात घाण-सांडपाणी  न सोडता शासकीय गॅझेट मधील नकाशा प्रमाणे नदीपात्राची दोन्ही किनारे मोजणी करुन नकाशातील रुंदी नुसार मार्कींग करणे, तसेच नदीपात्रात कायमस्वरुपी सिमारेषा आखणे आणि वृक्षारोपासाठी जागा निश्चित ‍करुण देणे तसेच पात्रातील अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने कठोर निर्णय लवकरात लवकर घ्यावे अशी मागणी निदेवदनाद्वारे जालना पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली.या निवेदनावर देवानंद चित्राल, शिवशंकर गायकवाड, बालू चाटला, रामेश्‍वर इंदलकर, कैलास फुलारी, वैजयंती मद्दलवार, संदिप वाधमारे, विनोद यादव, अदिंची नावे आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...