बुधवार, २४ जून, २०२०

रांजणी परिसरात सोयाबीनच्या पेरणीला आला वेग, शेतक-यांची आधुनिक यंत्रांना पसंती


रांजणी प्रतिनिधी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी व परिसरात सोयाबीनच्या पेरणीला वेग आला असून शेतकरी वर्ग पेरणीसाठी जुन्या तिफन व फराटा ऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने आधुनिक पध्दतीने पेरणी करताना दिसत आहे. त्यामुळे आधुनिकतेचा शेती कामावर देखील प्रभाव पडत असल्याचे दिसत आहे.
काही वर्षापूर्वी ग्रामीण भागात बैलांच्या सहाय्याने फराट किंवा तिफनने पेरणी केली जायची. त्यामुळे शेतामध्ये आठ ते पंधरा दिवस शेतक-यांना मुक्काम करावा लागत होता. यामुळे शेतांना एखाद्या गावासारखे स्वरुप येत होते. परंतु माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात सर्वत्र आधुनिक परिवर्तन होत आहे. याला शेती सुध्दा अपवाद राहिली नाही. आधुनिकतेच्या या युगात कोणाकडे वेळ नाही. प्रत्येकाला घंटो का काम मिनटो में करण्याची सवय लागली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच शेतकरी तिफन ऐवजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात जास्त पावसामुळे शेतीची कामे खोळंबली होती. त्यामुळे सोयाबीनची पेरणी सुध्दा लांबणीवर पडली होती. सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी वर्ग पेरणीची कामे आटोपण्याच्या तयारीत असून लवकर पेरणी होण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग करताना दिसत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...