बुधवार, २४ जून, २०२०

अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नांना गटनेता विजय पवार यांची समर्थ साथ


प्रभागातील धार्मिक स्थळांचे करून घेतले निर्जतुंकीकरण

*जालना,प्रतिनिधी :-* माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या विशेष प्रयत्नांतून जालना शहरातील धार्मिक स्थळांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. त्याच अनुषंगाने श्री खोतकर यांच्या प्रयत्नांना साथ देत पालिकेचे शिवसेनेचे गटनेते विजय पवार यांनी प्रभाग क्र 13 मध्ये हा उपक्रम राबविला असून त्यांच्या नियंत्रणाखाली या भागातील सर्व धार्मिक स्थळ परिसरात फवारणी करण्यासह स्वच्छता मोहिम राबविण्यात आली आहे.शहरातील अनेक भागात कोरोना रूग्ण आढळण्याचे प्रमाण गत काही दिवसात वाढले आहे. त्याचीच दखल घेऊन माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नियोजनानुसार शहरातील धार्मिक स्थळांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. प्रामुख्याने औषध आणि धुराची फवारणी करून संबंधीत परिसरात स्वच्छता राहण्यावर मोहिमेअंतर्गत विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मोहिमेला समर्थ साथ देण्याचा गटनेता विजय पवार यांचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने प्रभाग क्र 13 मधील सर्व धार्मिक स्थळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आलेले आहे. या परिसरांमध्ये विजय पवार यांच्या नियंत्रणाखाली धूर व औषध फवारणी केली गेली आहे. शिवाय धार्मिक स्थळांसोबत प्रभाग परिसरातही साफ सफाई राखण्यावर श्री पवार यांचे विशेष लक्ष असून कुठल्याही परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नाही अशी ग्वाही श्री पवार यांनी दिली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...