बुधवार, २४ जून, २०२०

कापूस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान, अकोला राज्यातील पहिली जिल्हा परिषद


अकोला,ब्युरोचीफ :- अल्पभूधारक सर्वसाधारण शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ देण्यासाठी तसेच त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना कपाशी बिजी२ बीटी बियाणे लागवडीसाठी ९० टक्के अनुदान योजनेला मान्यता देण्यात आली आहे. अशी योजना मंजूर करणारी अकोला जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव आहे. वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या योजनेबाबत सूचना केल्या होत्या.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कृषि अर्थव्यवस्था अडचणीत आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. माणसांचे जीवनमान सर्व शेतीवरच अवलंबून असते. कितीही क्रांती झाली तरी पोटाला लागणारे अन्न जमिनीतून निर्माण होते. त्यासाठी शेतकरी काबाड कष्ट करतो. मात्र समाजाचा व शासनाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था वाईट होत चालली आहे.या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करता, या वर्षी भारतातील कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे म्हणून शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळावा यासाठी अकोला जिल्हा परिषदेने अल्पभूधारक, सर्वसाधारण शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे निश्‍चित केले आहे. २०२०-२१ खरीप हंगामात शेतकऱ्यांना कपाशी बिजी २, बीटी बियाणे लागवडीसाठी 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. 90 टक्के अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी अध्यक्ष प्रतिभा भोजने, सभापती पंजाबराव वडाळ, पशुसंवर्धन समिती व गटनेते यांनी सहकार्य केले. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...