शनिवार, ६ जून, २०२०

*शेतकऱ्यांना ची अडवणूक करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कार्यवाही करा-दत्ता पाटील सुरुंग*
*हॅलो रिपोर्टर न्युज*
परतूर प्रतिनिधी/इम्रान कुरेशी
पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पैसे न देता ताळाताळ करीत असून जिल्हा मध्यवर्ती बँकेवर
कार्यवाही करण्या बाबत,निवेदन शिवसेना शहर प्रमुख दत्ता पाटील सुरुंग यांनी जिल्हाधिकारी जालना यांना दिले आहे,निवेदनात म्हटले असे की मागील सहा ते सात महिन्या पासून मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखा जालना येथे शेतकऱ्यांचे पंतप्रधान किसाण सन्मान योजने अंतर्गत निधी जमा झालेली आहे,जिल्ह्यातील मध्यवर्ती च्या ईतर शाखेमध्ये आतापर्यंत पैसे वर्ग व्ह्याला पाहिजे होते, परंतु अधिकाऱ्याच्या आडमुठ्या धोरणा मुळे असे झाले नाही म्हणून जिल्ह्यातील ईतर शाखेतही पैसे नाही, यामुळे शेतकरी नाहक त्रास गेल्या,कितिक दिवसा पासून बँकेत चकरा मारत आहेत त्यांना बँकेत उडवा उडविचे उत्तरे मिळत असून शेतकरी मोठया मानसिक तणावाखाली जीवन जगत आहेत, कोरोना संख्या संसर्गजन्य कोरोना रोगामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाले असून हवाल दिल झाला आहे, तसेच परतूर शहारामध्ये सीसीआय चे  एकच सध्या कापूस खरेदी केंद्र चालू असून खरेदी केंद्र वाढविने जरुरीचे झाले आहे, जर खरेदी केंद्र वाढविले नाही तर शेतकऱ्यांचा कापूस घरीच राहील आणि मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याशिवाय राहणार नाही गेल्या दोन ते तीन महिन्यापासून लॉक डाऊनमुळे संपूर्ण व्यवहार बंद असल्यामुळे उदरनिर्वाहप्रश्न निर्माण झाला आहे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपण च न्याय द्यावा अशी शेवटी निवेदनात शिवसेना शहर प्रमुख दत्ता पाटील सुरुंग यांनी विनंती केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...