मंगळवार, २८ जुलै, २०२०

कलाठिया कंपनी चा गौण खनिज (दगड) उत्खनन व वाहतुकीच तातपुरता परवाना समाप्त झाला असून तरी ही उत्खनन सुरु - राहुल व्ही खरात


अंबड,प्रतिनिधी :- में कलाठिया इंजीनियरिंग ऐंड कंस्ट्रक्शन ली.अहमदाबाद गुजरात या कंपनीस पाचोड-अंबड,घनसावंगी, आष्टी रसत्याच्या कामा करिता दगड या गौण खनिजाच्या 7000 ब्रास इतक्या मर्यादा व वाहतुकीसाठी अल्प मुदतीचा तातपुरता खांनपट्टा परवाना दिलेला होता.त्याची काढण्याची मुदत दि.5/6/2020 पासून ते मुदत दि.20/6/2020 पर्यंत सम्पात होत आहे.सदरिल खान ही मौजे वलखेड़ा गट न.25 आणि 31मध्ये परवानगी देण्यात आली.दगड काढण्याची मुदत समाप्त होऊन एक महीना उलटला तरी देखील उत्खनन सुरुच आहे.
कलाठिया कंपनीला 7000 ब्रास गौण खनिज दगड काढण्याची परवानगी आहे.म्हणून संबधित अधिकारी यांनी कलाठिया कंपनीचा चाललेला भोंगळ कारभार तात्काळ बंद करावा.आणि स्थल पंचनामा करुण ती खान सिल करण्यात यावीत.शासनाने दिलेल्या परवानगी ची पायमल्ली कलाठिया कंपनी करत आहे.त्यामुळे कंपनीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावीत.तसेच वाहतुकीसाठी शासकीय वाहतुक पासेस खनिकर्म अधिकारी यांच्या कडून घेण्यात आल्या का? यांची ही तपासणी करण्यात यावी.दगड उत्खनन परवानगी ची मुदत संपुन ही कलाठिया कंपनी राजरोज पणे सर्व नियम धाब्यावर बसवत आहे.
मर्यादा पेक्षा एक महीना जास्त दगड उत्खन करून अवैध रित्या काढलेला दगड कुठे नेण्यात आला?आणि विशेष म्हणजे या वर नियंत्रण ठेवनारी महसूल यंत्रणा गप्प का?तसेच परवाना दिला असल्याची माहितस्तव प्रत संबधित मंडल अधिकारी,तलाठी यानां ही वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून देण्यात आलेली असते ,मग मुदत संपुन एक महीना उलटला तरी सुद्धा उत्खनन सुरु कसे ?आसे मत रिपब्लिकन सेना युवा जिल्हा आध्यक्ष राहुल व्ही खरात यांनी प्रसिद्धि पत्रकात व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...