शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

अकोल्यातील हॉटेल - रेस्टॉरंट मालकांचे लॉकडाउनविरोधात ॲड प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा !


अकोला,ब्यूरो चीफ :- शासनाने ३१ जुलै नंतर लॉक डाऊन वाढविला तर वंचीत बहुजन आघाडी त्याला विरोध करेल, असे ऍड प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केल्यानंतर अनेक संघटना पुढे येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसायांना याचा फटका बसलेला आहे. हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायाला तर याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायीक आर्थिक संकटात आले असून यामध्ये काम करणाऱ्या मजुरांवर तर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे मालकांना मोठ्याप्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच लॉकडाउन तोडो अभियानाची घोषणा केली. त्या अनुषंगाने काल रात्री अकोला जिल्ह्यातील हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांनी ॲड बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे . तसेच संपूर्ण व्यावसायिक या लॉकडाउन तोडो अभियानात सहभागी होऊन वंचित बहुजन आघाडीच्या भुमीकेसोबत राहण्याची ग्वाही दिली. यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते. अशी माहिती राज्याचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...