शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

 Title शास्त्रशुद्ध पद्धतीने कीटकनाशक फावरणी Content


गाव टाकळगव्हान ता गेवराई जि बीड येथे कृषीदूत रोहित नरवडे यांनी शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने कीटकनाशक फावरणी बद्द्ल मार्गदर्शन केले

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

 साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्र लेखनपर पुस्तकाचे  विद्यापीठ कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन

प्रतिनिधी/ जालना

कॅप्शन जोडा

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ प्रमोदजी येवले सर यांच्या हस्ते जगविख्यात विद्रोही बहुजन साहित्यिक अण्णाभाऊ साठे या नावाचे चंद्रकांत कारके यांनी लिहिलेल्या उत्कृष्ट चरित्र लेखनपर पुस्तकाचे प्रकाशन जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज दि 7 आगस्ट रोजी दुपारी 1.30 वा विद्यापीठात संपन्न झाले यावर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून चंद्रकांत कारके यांनी जगविख्यात विद्रोही बहुजन साहित्यिक  अण्णाभाऊ साठे या नावाचे एक चरित्र लेखनपर पुस्तक लिहिले असून या उत्कृष्ट पुस्तकाचे प्रकाशन आज दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ.प्रमोदजी येवले सर यांच्या हस्ते विद्यापीठात प्रकाशीत करण्यात आले यावेळी चंद्रकांत कारके यांच्या सह प्रा अभिजीत पंडित नेते भारत जाधव प्रा पंढरीनाथ रोकडे प्रा वसंतभाई संसारे अभिजीत शिरगोळे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू मा डॉ.येवले सर यांनी पुस्तकाचे प्रकाशन करत श्री चंद्रकांत कारके यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे तोंडभरून कौतुक केले यावेळी सर्वांनी सोसीयल डिस्टंसेसचे पालन करत पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम संपन्न केला

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

 निर्णय न घेतल्यास 10 ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरू - प्रकाश आंबेडकर



पुणे,ब्युरो चीफ - राज्यातील कोरोना रुग्णांना चांगले औषध द्या,  उरलेल्या ९५ टक्के लोकांना का कैद करून ठेवत आहे. राज्यातील एसटी बस सेवा सुरु करा. टपरीवाले, फेरीवाले यांना स्वतःचे आयुष्य सुरू करू द्या, महाराष्ट्राला आता निर्णयाची गरज आहे. शासनाने 10 ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी कोणत्याही वेळेला रस्त्यावर उतरेल ,असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला. पुणे येथील पत्रकार संघात आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.


ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांच्यावर चांगले उपचार करा, त्यांना चांगले औषध द्या, मात्र ५ टक्के लोकांसाठी तुम्ही ९५ टक्के लोकांना का कैद करून ठेवत आहेत, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुणे येथील पत्रकार संघात आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. राज्यात दहा हजार राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा विचार प्रशासन करीत आहे. त्यापेक्षा राज्य परिवहन सेवेला सुरुवात केली तर कर्मचारी कपात करण्याची वेळ येणार नाही. मुंबईत अर्ध्यापेक्षा जास्त बस सुविधा सुरू करायला पाहिजे त्या अद्यापही झालेल्या नाहीत. मुंबईसह इतर मनपा क्षेत्रातही बस सेवा सुरू करण्याची आता गरज आहे. त्याचबरोबर टपरीवाले, फेरीवाले यांना आता स्वतःचे आयुष्य सुरू करू द्या. आज महाराष्ट्राला निर्णयाची गरज आहे. शासनाने दहा ऑगस्ट पर्यंत निर्णय घेतला नाही तर वंचित बहुजन आघाडी केव्हाही आणि कधीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. यावेळी त्यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी व कोरोना नसतांना मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी जाहीर करून हे दाखवून दिले की कोरोना नसताना अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. म्हणजेच कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कमी असल्याचे त्यांनी कागदोपत्री पुराव्यानिशी दाखवून दिले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली. 


शेट्टींच्या स्वाभिमानीचा  "सुधीर कथले" आता बाळासाहेबांच्या वंचितचा शिलेदार


बीड,ब्युरो चीफ - वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालय या ठिकाणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक आणि लढाऊ नेते सुधीर कथले यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाला सर्वोच्च मानत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

बीड जिल्ह्याचे कृतिशील जिल्हाध्यक्ष प्रा. शिवराज बांगर यांच्या कृतिशीलतेवर  विश्वास ठेवात वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचा झेंडा खाली ठेवून वंचित बहुजन आघाडीच्या संघर्षाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला. "यापुढे जो संघर्ष आजपर्यंत मी शेतकऱ्यांसाठी केला तो संघर्ष येणाऱ्या काळामध्ये वंचितांसाठी करणार असून, अनेक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. अशी माहिती सुधीर कथले यांनी दिली.

अंबड शहरातील ओमशांती कॉलनीतील मुख्य रस्त्याला तळ्याचे स्वरूप


अंबड नगरपालीकेचं पावसाळी पुर्व काम पाण्यातच 

अंबड प्रतिनिधी :- अंबड शहरातील ओमशांती कॉलनी मधील हा रस्ता शॉटकट मार्ग या नावाने प्रचीत आहे.या शॉटकट मार्गाने पोलीस ठाणे, उपविभागिय कार्यलय, न्यायालय, एसबीआय बँक, भाजीमंडी, नगरपालीका,ओमशांती विद्यालय,कॉलेज, महीला बचत गट भारत फायन्स आणी मुख्य बाजारपेठे कडे जानारा हा शॉटकट मार्ग आहे.महिला बचत गट भारत फायन्स हे जवळच असल्याने  येथे महिला पादचार्यांची रेलचेल असते.व ग्रामीण भागातील वाहनचालक याच शॉटकट मार्गाने जाण्यास पंसद करतात.पंरतु याच रहदारीच्या शॉटकट मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी जमा झाल्याचे दिसुन येत आहे.पाण्याला जायला वाटच नसल्यामुळे याठिकाणी तळ्याचे स्वरूप आलेले आहे.पादचार्यांना तर या घाणपाण्यातुनच जावे लागत आहे.याचा सर्वाधिक फटका लहान बालके,अबालवृध्द व महिंलाना बसत आहे.वाहनचालकही याच पाण्यातुन मार्गक्रमण करत आहेत.यांची फजिती होत असल्याचे दिसुन येत आहे.


या ठिकाणी रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे पाण्यातुणच जाण्यावाचुन पादचारी आणी वाहनचालकांना गत्यंतर राहत नाही.अंबड नगरपरिषदेच्या पावसाळी पुर्व नियोजनाचा अभाव व हलगर्जीपणा दिसुन येतो एका ठिकाणी जास्त काळ पाणी राहील्यास अस्वस्थता पसरून डासाचा प्रादुर्भाव वाढु शकतो.यातुन रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे या कोरोना च्या काळात जास्त स्वच्छतेवर भर देणे आवश्यक आहे.पंरतु अंबड नगरपालीका कडुन ठोस उपाय योजना केल्या जात नाही. याबाबत नगरपालीकाचा कारभार हाकणाऱ्यां पुढाऱ्यांनी वेळीच कार्यतत्परता दाखवून ओमशांती कॉलनीतील आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी.अशी ओमशांती कॉलनीतील रहवासी जोरदार मागणी करत आहे


रविवार, २ ऑगस्ट, २०२०


पत्रकारांना हेतुपुरस्सरपणे गुन्ह्यात अडकावणाऱ्या पोलीस अधिकारी व प्रदुषण महामंडळ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा - शीतल करदेकर


जालना/प्रतिनिधी :- जालना येथील दैनिक गोकुळनीतीचे संपादक अर्पण गोयल, दैनिक तात्काळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर यांचेसह चार पत्रकारांवर आकसाने गुन्हे दाखल केल्याबद्दल जालन्यासह राज्यभरातील पत्रकारांनी या कृत्याचा कठोर निषेध केला आहे.
हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील अत्याचार आहे आणि ज्यांनी हे चुकीचे कृत्य केले आहे त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच जालन्यातील प्रदुषण तातडीने थांबवावे अशी आग्रही मागणी नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे  यांचेकडे केली आहे.
              याबाबत सविस्तर वृत्त असे की जालना येथील संपादक गोयल व मानकर  दि.२८ जुलै २०२० रोजी प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयात जालना येथील वाढत्या प्रदूषणासंदर्भात माहिती घेण्यासाठी गेले असता तेथील अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके यांनी पत्रकारांना वेळ न देता कुठलीच माहिती उपलब्ध करून न देता उलट कार्यलयातील सेक्युरिटी मार्फत एका आठवड्या नंतर येऊन माहिती घेऊन जाण्याचा सल्ला दिला.वारंवार जालना येथील एमायडीसीमुळे प्रदुषण वाढते आहे. अनेकदा याबाबत  प्रदुषण महामंडळ अधिकार्‍यांचे लक्षात आणून दिले. बातम्या लिहिल्या याचा राग सौ. योगिनी अविनाश बाळंके यांचे मनात होताच. त्यामुळे उडवाउडवीची उत्तरे देणे, आपले कर्तव्य नीट न बजावणे, पत्रकारांना अपमानकारक वागणूक देणे आणि जे चुकीचं काम करतोय याबाबत जराही अपराधी भावना नसणे अशी मनमानी करण्याच्या त्यांच्या वागणुकीची तक्रार करण्यासाठी अर्पण गोयल आणि भरत मानकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे गेले असता त्यांची लेखी कैफियत निवासी जिल्हाधिकारी  मा. निवृत्ती गायकवाड यांच्याकडे मांडण्याचे सांगण्यात आले. त्यांनी पत्रकाराचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांनी दिलेल्या तातडीने प्रदूषण अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके यांना मोबाईलवर कॉल करून पत्रकारांना माहिती देण्याचे सांगितले शिवाय त्या औरंगाबाद येथून अप-डाऊन करीत असल्याने त्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देखील देण्यात आले. प्रदूषण नियंत्रण अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके यांच्या औद्योगिक वसाहत कार्यक्षेत्रात प्रदूषण वाढले असल्याने याबाबत कुठलीच कारवाई ही होत नसल्याने सौ. बाळंके यांची लेखी तक्रार दि.२९ जुलै २०२० रोजी प्रदूषण महामंडळ विभागीय कार्यालय औरंगाबाद येथील कार्यालयात करण्यात आली होती. याबाबतची बातमी दैनिक गोकुळनीती आणि दैनिक तात्काळ राज्यवार्ता यांनी छापली होती. याशिवाय प्रदूषणच्या बाबतीत पर्यावरण मंत्री ना. अदित्य ठाकरे यांना देखील तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टीचा राग मनात धरून प्रदूषण अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात हेतुपुरस्सरपणे  दैनिक गोकुळनीतीचे संपादक अर्पण गोयल, दैनिक तात्काळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर, प्रदूषण महामंडळाच्या कार्यलयात कधीच पाय न ठेणारे पत्रकार विष्णु कदम यांनी बातमी लिहिली यासाठी आणि विष्णु कदम त्यांचे मित्र नीलकंठ कुलकर्णी जे नेहमी त्यांच्या सोबत राहतात त्यांचे नावाने गुन्हा नोंदवण्यात आला.
चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कौठाळे यांनी देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अट्टल गुन्हेगारांना कधीच पकडले नाही परंतु पत्रकार गुन्हेगार असल्याप्रमाणे कुठली ही चौकशी न करता  गुन्हा नोंदविला खरं तर पत्रकार सुरक्षा कायद्याखाली एसीपी दर्जाच्या अधिकार्‍यांनी ही चौकशी करुन, मग गुन्हा दाखल करने आवश्यक होते. मात्र केवळ 'आधी माहिती द्या, मग इतर काम करा' असं म्हटलं  तर सरकारी कामात अडथळा निर्माण होतो का ?   हा मोठा प्रश्न या कार्यतत्पर अधिका-याच्या कार्यशैलीवर निर्माण झाला आहे. पत्रकारांनी बातमीसाठी माहिती विचारणे हा जर गुन्हा ठरत असेल तर भविष्यात शासकीय कार्यलयात जाण्यापुर्वी पत्रकारांना संबंधित पोलिस ठाण्यात अर्ज देऊन  पोलिस संरक्षणं आणि सोबत साक्षीदार  घेऊन जावे लागेल. प्रदूषण महामंडळच्या अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके  जालना येथे कार्यरत झाल्या पासून आजपर्यंत त्यांच्या कार्याचा आढावा  घेतल्यास सर्व सत्य बाहेर येईल. मा. मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीरपणे दखल घेऊन पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा प्रदूषण नियंत्रण  महामंडळच्या अधिकारी सौ. योगिनी अविनाश बाळंके व चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कौठाळे यांचेवर कठोर कारवाई    करण्यात यावी अशी मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आली आहे. पत्रकारांवर गुन्हे व अटक केल्यानंतर तरी जालन्यातील वाढते प्रदुषण  नियंत्रणात येईल का ? हा सवाल आहेच.हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील अत्याचार आहे आणि हे आता थांबायला हवेच अशी ही आग्रहाची मागणी करदेकर यांनी पत्राद्वारे करण्यात आलीआहे. एनयुजे महाराष्ट्र नेहमीच सक्षम समाजासाठी व पत्रकारांच्या सन्मानासाठी काम करीत असून यासाठी याची प्रत मा.गृहमंत्री अनिल देशमुख, मा.पर्यावरण मंत्री, आदित्य ठाकरे,मा. सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना पाठवण्यात आली आहे अशी माहिती एनयुजे महाराष्ट्र कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांनी दिली आहे


जिल्ह्यात 66 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 49 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.



जालना,ब्युरो चीफ :- जालना शहरातील  गोपाळपुरा -1, रहेमान गंज -1, जालना शहर -1, प्रयागनगर -1, संभाजीनगर -3, मंगळबाजार -1, सारथी कॉलनी -2, गोपिकिशन  नगर -3, माणिकनगर -1, अग्रसेन नगर -1, जवाहर बाग -2, ख्रिस्ती कॅम्प -2, कन्हैयानगर -9, खरपुडी -1, पोलास गल्ली  -1, लक्ष्मीनारायणपुरा -1,संभाजीनगर -2, आझाद मैदान -1, कालीकुर्ती -3, पोस्ट ऑफिस -1, जमुनानगर -1, केदारखेडा -1, पारध बु. -1,गोकुळ -1, हडपसावरगाव -3, अकोला -4, अशा एकुण 49 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील  संभाजीनगर -1, जांगडे नगर -1, दुर्गामाता रोड -1, आर.पी. रोड -1, भाग्यनगर -1, सोनल नगर -1, इसार गार्डन -1, मधुबन कॉलनी -1, सकलेचा नगर -1, समर्थनगर -3, डबलजीन -2, रामनगर -1, प्रितीसुधानगर -2, धोका मिल -1, हमालपुरा -1, रामनगर पोलीस कॉलनी -1, बालाजी गल्ली परतुर -4, मोंढा परतुर -2, खतीब मोहल्ला परतुर -1, जिजाऊ नगर परतुर -1, साठे सावंगी ता. अंबड -2, शनिवार पेठ देऊळगाव राजा -1, सिव्हिल कॉलनी देऊळगाव राजा -1, पाचनवडगाव -1, म्हसला ता. परतुर -1, कोठी -2, गणेशनगर बदनापूर -1, गोंदी -1, अंबड शहर -8, खंडोबा मंदिर भोकरदन -4, प्रसादगल्ली भोकरदन -1, जाफ्राबादरोड भोकरदन -5, परदेशी गल्ली भोकरदन -4, देऊगावराजा -2, भातगेडा ता. घनसावंगी -1,सुरगीनगर अंबड -1, नवा मोंढा परतुर -1, गोधी मोहल्ला बदनापूर -1 अशा एकुण 66 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 अशा एकुण 66  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.  
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7593असुन  सध्या रुग्णालयात-515 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2890, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-65 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-13482 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-66 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-2335 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-10944, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-440 एकुण प्रलंबित नमुने-114, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2399.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-38, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2387, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-431,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-36, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-515,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-115,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-49, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1555, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-707 (19 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-25654 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-73 एवढी आहे.
 सुरगी नगर अंबड येथील रहिवाशी असलेल्या 55  वर्षीय पुरुष रुग्णास हृदयविकाराचा झटाका आल्यामुळे व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि.31 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना  दि. 1 ऑगस्ट  2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 2 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 
आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 431 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-72, जे.ई. एस. मुलींचे वसतिगृह-25, जे. ई. एस. मुलांचे वसतिगृह- 8, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-44, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक-12,  राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-11,राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-58, संत रामदास हॉस्टेल -17,   पोलीस प्रशिक्षण केंद्र -4,गुरु गणेश भवन-6, केजीबीव्ही परतुर -17,मॉडेल स्कुल, मंठा-14, केजीबीव्ही मंठा-15, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-40,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-31, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -7,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी -19, शासकीय मुलींचे वसतिगृह, भोकरदन-17,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -10, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-4,
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत  201 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1059 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आ. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 1 लाख 7 हजार,मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 7 लाख 87 हजार 230 असा एकुण 9 लाख 21 हजार  38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

                                               

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.


साश्रु नयनांनी दिला अखेरचा निरोप.



जालना,ब्यूरो चीफ :- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे  यांचे दि 1 ऑगस्ट रोजी रात्री दीर्घ आजाराने मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दि. 2 ऑगस्ट रोजी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पार्थिवास मुखाग्नी दिला.
शारदाताई टोपे यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. कोरोनाच्या अनुषंगाने  कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये सामाजिक अंतराचे पालन करत अत्यंत कमी व्यक्तीच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार संजय जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार सर्वश्री कैलास गोरंट्याल, संतोष दानवे, नारायण कुचे, अंबादास दानवे, संदीप क्षीरसागर,बालाजी कल्याणकर, गुलाबराव देवकर, राजेश राठोड, कल्याणराव काळे, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, चंद्रकांत दानवे, शिवाजीराव चोथे प्रकाश गजभिये, बदामराव पंडित, राजेश विटेकर, ए.जे. बोराडे, पंडितराव भुतेकर, मनोज मरकड, महेबुब शेख, कल्याणराव सपाटे, नानाभाऊ उगले आदींची उपस्थिती होती. 
यावेळी टोपे परिवारातील मनिषाताई टोपे, वर्षाताई देसाई, संग्राम देसाई, बाळासाहेब पवळ, उत्तम पवार, सतीष टोपे, शरद टोपे, संजय टोपे, अमोल टोपे, ॲड संभाजी टोपे, गणेश टोपे, दीपक टोपे, सुरज टोपे, संदीप टोपे, भैय्या टोपे यांनी शारदाताई टोपे यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला.
गेल्या पन्नास वर्षामध्ये माझ्या आईने एका शब्दानेही कोणाला न दुखावता सर्वांना प्रेमच दिले. संपुर्ण आयुष्यामध्ये आईने कुठल्याही गोष्टीची कधीच अपेक्षा केली नाही.  माझ्या जडणघडणीमध्ये वडीलांबरोबरच आईचाही मोठा वाटा होता. निखळ व निरपेक्ष प्रेमाच्या झऱ्याला आज मी मुकलो असल्याची भावना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.
शारदाताई अंकुशराव टोपे यांच्या निधनामुळे टोपे परिवारावर मोठे संकट कोसळले आहे.  केवळ टोपे परिवारच नव्हे तर संपुर्ण परिसरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजेश टोपे हे संपुर्ण महाराष्ट्राला कोरोनामधुन सावरण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. त्यांना आधार देणाऱ्या शारदाताई यांच्या निधनामुळे कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.  टोपे परिवारास हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो तसेच त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असल्याची भावना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केली.
संयमी, अभ्यासु वृत्ती असलेल्या राजेश टोपे यांच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा असलेल्या शारदाताई अंकुशराव टोपे यांच्या निधनामुळे राजेश टोपे हे आईच्या प्रेमापासुन पोरके झाल्याने आपणास तीव्र दु:ख झाले असुन टोपे कुटूंबियांना हे दु:ख सावरण्याची ईश्वर शक्ती देवो अशा शब्दात  राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी खासदार संजय जाधव, आमदार संतोष दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार यांनी पाठवलेल्या शोक संदेशाचे यावेळी सर्वांसमक्ष वाचन करण्यात आले.  
तत्पुर्वी शारदाताई अंकुशराव टोपे यांचे पार्थिव त्यांचे मुळ गाव असलेल्या पाथरवाला येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.  यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनीही तेथे जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.


शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

भीम आर्मी भारत एकता मिशन वर्धा जिल्हा जिल्ह्यातील पुलगाव शहरातील कार्यकारणी गठीत.


वर्धा,ब्यूरो चीफ :-दि. 30/07/2020 ला भीम आर्मी भारत एकता मिशन वर्धा जिल्हा जिल्ह्यातील पुलगाव शहरातील कार्यकारणी गठीत करण्यात आली ,भीम आर्मी भारत एकता मिशन #संस्थापक भाई #चंद्रशेखर आझाद रावण ,याचा आदेशानुसार  जिल्हाध्यक्ष आशिष सोनटक्के यांंच्या मार्गदर्शनाने भीम आर्मी  तालुका उपाध्यक्ष गुलाब खान पठान ,शहर अध्यक्ष अंकुश भाऊ कोचे,शहर उपाध्यक्ष अॅड. नम्रता बागेशवर शहर संघटक शाहिद अखतर प्रसिद्धी प्रमुख  सैय्यद सैफ अली याची नियुक्ती करण्यात आली ,तसे च भीम आर्मी शाखेचे अनावरण करण्यात अगोदर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून  ,फेजर पुरा ,पठाण चोक ,पँथर चोक सेय्यद मोहला येथे शाखा चे उटघाटन करण्यात आले , भीम आर्मी अन्याय ,अत्याचार च्या विरोधात लढणारे संघटन असून गावात जिल्हा तालुका शहरात पर्यत आपल्या शाखा सुरू करण्यात येणार आहे, तेव्हा भीम आर्मी तालुका अध्यक्ष शशांक भगत ,बंटी रंगारी ,प्रशिल पाणबुडे, मनीष प्रधान ,दीक्षित सोनटक्के, आशिष रणधीर ,आझम शेख ,एकता पाटील,मोहम्मद अशकाल, रोशन चव्हाण, सचिन चव्हाण ,मनीष मून ,यश लोहकरे ,मोनू पठाण,शहारुक सेय्यद, नानीर सेय्यद, कुणाल ताकसाडे, अमन संगोळे ,दादाभाई पठाण ,सुशील जांभुलकर,सलिम  शाहरुख सेय्यद,इकबाल खान,किम सेय्यद व भीम आर्मी चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


जिल्ह्यात 82 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह.52 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.


जालना,ब्युरो चीफ :- जालना शहरातील प्रयाग नगर-1, नाथबाबा गल्ली-1, गोपीकिशन नगर -1, बु-हाण नगर -1, नॅशनल नगर-4, जयभवानी नगर -1, आर.पी. रोड-3,  रामनगर पोलीस कॉलनी -3, कबाडी गल्ली -1, व्यंकटेश नगर -2, मस्तगड -1, चंदनझिरा -3, भीमनगर -2, लक्कडकोट -1, नळगल्ली -1, नयाबाजार -1, दर्गा वेस -2, कन्हैयानगर -6, सामान्य रुग्णालय परिसरातील -1, टाऊन हॉल -1, भाग्यनगर -1, मोदीखाना -1, बालाजी नगर -1,कचेरी रोड -1, प्रशांतीनगर -1, गुडला गल्ली -1, जालना शहर -2, कोष्टी गल्ली काद्राबाद -1, अंबड -1, वरुड बु. -1, बुटखेडा -4, अशा एकुण 52 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील मंठा चौफुली-4, फारशी गल्ली -1, नुतन वसाहत-2, हनुमान नगर-2, युसुफ कॉलनी -1, लक्ष्मीनारायणपुरा-1, भाग्यनगर -3, जमुना नगर -5, सोरटीनगर-1, सकलेचा नगर-3, वैभव कॉलनी -3, समर्थ बँकेजवळ-2, पावरलुम जुना जालना-3, काद्राबाद -1, एम.आर.डी.सी. -1, सामान्य रुग्णालय  निवासस्थान -1, महाकाळा ता. अंबड -11, रोहीलागड-1, शहागड -3, सुखापुरी -1, देऊळगाव राजा -1, उज्जैनपुरी ता. बदनापुर -1, निरखेडा-1, रांजणी-1, शनी मंदीर परतुर -1 अशा एकुण 54 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 28 अशा एकुण 82  व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7495 असुन  सध्या रुग्णालयात-484 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2854, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-170 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-13447 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-82 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-2269 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-10868, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-440 एकुण प्रलंबित नमुने-221, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2382.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-56, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-2349, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-496,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-60, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-484,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-102,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-52, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1506, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-691 (18 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-24233 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-72 एवढी आहे.
अंबड शहरातील रहिवाशी असलेल्या 70 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 27 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना  दि. 28 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 31 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला. यावलपिंप्री ता. घनसावंगी  रहिवाशी असलेल्या 70 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना             दि. 27 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना  दि. 28 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांचा 1 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 496 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना-2, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना-59,मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन,वसतिगृह-10,जे.ई. एस. मुलांचे वसतिगृह-8 जे. ई. एस. मुलींचे वसतिगृह-39, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स डी ब्लॉक-63, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स सी ब्लॉक-6, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स बी ब्लॉक-14, राज्य राखीव पोलीस बल क्वॉर्टर्स ए ब्लॉक-58, गुरु गणेश भवन-5, संत रामदास हॉस्टेल -10, मॉडेल स्कुल, परतुर-23, मॉडेल स्कुल, मंठा-2, केजीबीव्ही मंठा-15, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-51,शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-62, शासकीय मुलांचे वसतीगृह,बदनापुर-5, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -5,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, घनसावंगी-17, शासकीय मुलींचे वसतिगृह, भोकरदन-5,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 -24, पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद-1,आय.टी.आय कॉलेज, जाफ्राबाद-8, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद-4.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत  200 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, 880 वाहने जप्त, 1051 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आ. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड 1 लाख 7 हजार,मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 7 लाख 74 हजार 430 असा एकुण 9 लाख 8  हजार 238 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


सामाजिक अंतर न राखणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्यांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाची कारवाई


212 व्यक्तींकडून 46 हजार 800 रुपयांचा दंड वसुल



जालना,ब्यूरो चीफ :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यामध्ये सामाजिक अंतर न पाळणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर पोलीस तसेच जिल्हा प्रशासनामार्फत संयुक्तरित्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दि.1 ऑगस्ट, 2020 रोजी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 212 व्यक्तींकडून 46 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
     यामध्ये जालना तालुक्यात 179 व्यक्तींकडून 42 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे तर बदनापुर 18 व्यक्तींकडून 1 हजार 800, जाफ्राबाद 4 व्यक्तींकडून 800, परतुर 11 व्यक्तींकडून 2 हजार 200 रुपये अशा प्रकारे एकुण 212 व्यक्तींकडून 46  हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
      नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर पडु नये,  सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.


साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


जालना,ब्यरो चीफ :- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यावेळी  अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये, जिल्हा नियोजन अधिकारी अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर,श्रीमती आर.आर. महाजन,  संपदा कुलकर्णी, श्रीमती छाया कुलकर्णी  यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करुन साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले.





धुळ्यात लॉक डाऊनला विरोध, व्यापाऱ्यांनी दिला प्रतिसाद.


धुळे,ब्युरो चीफ :- सर्वसामान्य लोकांनी आता जगायला सुरवात करावी. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद मध्ये केले होते. त्यांच्या आवाहनाला आज धुळे  वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रतिसाद देण्यात आला. शहरातील दुकानदारांना आवाहन करण्यात आले जगायचं असेल तर आपले सर्व व्यवसाय सुरू ठेवावे लागतील हे सरकार भांडवलदारांचे सरकार असून या सरकारला तुमच्याशी काही देणे घेणे नाही.

स्वतःला   सिद्ध करावे लागेल मुलाबाळांसाठी घराबाहेर पडा लहान-मोठे व्यवसाय सुरू करा. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यानी सर्वांना बाळासाहेबांची भूमिका समजावून सांगितले. त्यामुळे अनेक भागात व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत आपापली दुकाने उघडी केली.


रस्त्यावर भाकरी खाऊन वंचितने लॉकडाऊन तोडले.


बीड,ब्युरो चीफ :- राज्यभरात भाजपचे आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीकडून रस्त्यावर बसून चटणी भाकर खात सरकारचा निषेध केला गेला.

लॉकडाऊनने गोरगरिबांचं कंबरडे मोडल्याचे सांगत आजपासून शासनाचा कसलाच लॉकडाऊन पाळण्यात येणार नसल्याची शपथ यावेळी घेण्यात आली. तसेच रस्त्यावरच भाकरी खात लॉकडाऊन तोडण्यात आला. आज पासून कोणीही मास्क घालणार नाही, किंवा फिजिकल डिस्टन्स पाळणार नाही.
असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर यांनी जाहीर केले आहे. या प्रसंगी राज्य महासचिव भीमराव दळे प्रशांत बोराडे  सम्यकचे जिल्हाध्यक्ष अजय साबळे,    बाळासाहेब वाघमारे इत्यादी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.


उद्या पासून टाळेबंदीला न जुमानता जनतेने सामान्य जिवनास प्रारंभ करावा  - राजेंद्र पातोडे



अकोला,ब्युरो चीफ :- कोरोनाच्या नावावर देशातील लोकशाही कुलूपबंद करण्याचा सरकारचा डाव असून नागरिकांच्या जगण्यावर बंधने आणली आहेत.जनतेला टाळेबंदी नकोय म्हणून सामान्य जीवन जगण्यास प्रारंभ करावा, ही भूमिका ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली आहे.सबब व्यापारी, कामगार, लहान मोठे व्यवसायी, नौकरदार,टपरीधारक,फेरीवाले,

ऑटो रिक्षा या सहीत सर्व नागरिकांनी आपल्या सुरक्षेच्या उपाय योजनांसह आपले दैनिक व्यवहार सुरु करून सरकारची ही दडपशाही अमान्य करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी केले आहे.  


जनता मेटाकुटीला आलेली असताना सरकारने सहावा लॉकडाउन जाहीर केला आहे. गोरगरीब जनतेच्या जगण्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना शून्य असून वाढता मृत्यदर आटोक्यात आणण्यासाठी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. देशात केवळ ३ टक्के मृत्युदर असून मृत्युदर कधीही शून्य असू शकत नाही. त्यामुळे सरकार आणि चॅनेल्स भिती घालण्याचे काम करीत आहेत. कोरोना पूर्वी व कोरोना नंतर होणारे मृत्युदर तपासले असता असे लक्षात येते की कोरोना आधी मृत्युदर हा आताच्या मृत्युदरा पेक्षा १८ टक्के अधिक होता. त्यामुळे कोरोनाची भीती न बाळगता जनतेने आपले सण, दैनिक व्यवहार सुरळीत सुरु करणे गरजेचे आहे. व्यापारी, कामगार, लहान मोठे व्यवसायी, नौकरदार, टपरीवाले, फेरीवाले, ऑटो रिक्षा या सहीत सर्व नागरिकांनी आपल्या दैनिक व्यवहाराला प्रारंभ करावा. सरकारची ही दडपशाही अमान्य करावी. आपापली दुकाने उघडी करावी. जनतेने देखील शारिरीक अंतर, मास्क व सॅनिटायजरचा वापर करीत खरेदी आणि सण साजरे करणे, सामाजिक सौहार्द आणि स्वास्थ टिकविण्यास प्रारंभ करावा.

येणारे सण साजरे करण्यासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्था सरकारने सुरु करावी तसेच सरकारने शास्त्रीय माहिती देणे गरजेचे आहे. सरकार युरोपियन मॉडेलवर चर्चा करते. परंतु आशिया खंडातील चीन, भूतान, म्यानमार यांनी कोरोना कशा पद्धतीने आटोक्यात आणले यावर सरकार बोलत नाही. लोक मोठ्या संख्येने बेरोजगार होत आहेत. त्यांचे रोजगार हिरावले जात आहेत.देशातील जनतेच्या हितासाठी लस बाजारात आणावी किंवा उपायपयोजना आखाव्यात, हे करण्या ऐवजी  लॉकडाऊन करीत आहे. ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीने व्यापारी, फेरीवाले, लहान व्यवसायी, नौकरदार यासह सर्व सामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तारखेपासून पक्षाचे कार्यकर्ते " मी हा लॉकडाउन मानत नाही" हा निर्धार करून बाहेर पडणार आहेत. जे व्यवसायी आपले व्यवसाय करू इच्छितात त्यांना व्यापार व व्यवसाया करीता पोलीस आणि प्रशासनाचा त्रास होऊ दिला जाणार नाही. त्यासाठी प्रखर आणि लढण्याची भूमिका वंचित घेत आहे.जनतेने देखील टाळेबंदी झुगारून लावावी व आपले जीवन सामान्यरित्या सुरू करावे, असे आवाहन देखील वंचित बहुजन आघाडीने केले आहे.



अकोल्यातील हॉटेल - रेस्टॉरंट मालकांचे लॉकडाउनविरोधात ॲड प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा !


अकोला,ब्यूरो चीफ :- शासनाने ३१ जुलै नंतर लॉक डाऊन वाढविला तर वंचीत बहुजन आघाडी त्याला विरोध करेल, असे ऍड प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केल्यानंतर अनेक संघटना पुढे येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसायांना याचा फटका बसलेला आहे. हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायाला तर याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायीक आर्थिक संकटात आले असून यामध्ये काम करणाऱ्या मजुरांवर तर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे मालकांना मोठ्याप्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच लॉकडाउन तोडो अभियानाची घोषणा केली. त्या अनुषंगाने काल रात्री अकोला जिल्ह्यातील हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांनी ॲड बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे . तसेच संपूर्ण व्यावसायिक या लॉकडाउन तोडो अभियानात सहभागी होऊन वंचित बहुजन आघाडीच्या भुमीकेसोबत राहण्याची ग्वाही दिली. यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते. अशी माहिती राज्याचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.


  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...